अळशी, जवस
हल्ली ज्याच्या गुणधर्माचा बराच बोलबाला आहे अशी एक गोष्ट म्हणजे जवस. ‘लायनम युसिटॅटिसिममं अस शास्त्रीय नाव असलेल्या जवसाच्या रोपापासून या बिया मिळतात. इंग्रजीत यांना फ्लॅक्ससीड्स असं नाव आहे. याचा अर्थ ‘अत्यंत उपयोगी’ असा होतो. खरोखरच आरोग्याच्या दृष्टीने जवस अत्यंत उपयुक्त असंच आहे. मेसोपोटेमियामधे उगम असलेलं जवस मानवाला अश्मयुगापासून माहीत आहे. 7क्क्क् वर्षापासून जवस खाण्यासाठी आणि त्यापासून मिळणा:या लिनन तंतूसाठी वापरलं जात आहे. भारतातील उत्खननात ािस्तपूर्व 14क्क् ते 12क्क् मधील अवशेषात जवसाच्या बिया तसेच धागे सापडले आहेत. ािस्तपूर्व 4क्क् मधील बौद्ध व जैन वा्मयात आणि ािस्तपूर्व 3क्क् मधील कौटल्याच्या अर्थशास्त्रत जवसाचा संस्कृतमधील उल्लेख ‘अथसी’ असा केलेला आढळतो. या अथसीवरूनच अळशी हे नाव जवसाला पडलं असावं. म्ह
जवसामधे 9 टक्के आद्र्रता, 2० टक्के प्रथिने, 34 टक्के स्निग्ध पदार्थ आणि 36 टक्के काबरेहायड्रेट्स असतात. जवसाच्या बियांचा पृष्ठभाग कडक असतो आणि तो चकाकतो. जवसाच्या दोन जाती असतात. एकाच्या बिया सोनेरी, तर दुस:याच्या लालसर तपकिरी रंगाच्या असतात. जवसाला विशिष्ट स्वाद असतो. त्यामधे प्रचंड प्रमाणात ओमेगा-3 मेदाम्ले, उत्तम प्रमाणात मँगनीज, चांगल्या प्रमाणात चोथा, मॅगAेशियम आणि फोलेट व थोडय़ा प्रमाणात तांबे, फॉस्फरस आणि व सहा जीवनसत्व असतात.बियांमध्ये ८० ते ८५ टक्के एंडोस्पर्म ११ ते १७ टक्के कोंडा आणि २ ते ३ टक्के एब्रियो असतो.
वनस्पतीजन्य पदार्थामध्ये सर्वात जास्त प्रमाणात ओमेगा-3 मेदाम्ले जवसात असतात. त्यातील गुणधर्मामुळे अस्थमा, ऑश्चिओआरथ्रायटिस, अर्धशिशी, ओश्चिओपोरॉसिस या आजारांमधे जवसाचा चांगला फायदा होऊ शकतो. खरं तर हाडांसंबंधी कोणत्याही रोगामध्ये जवसाचा उपयोग होतो. जवसासंबंधी केलेल्या एका वैद्यकीय संशोधनातील निकषांनुसार जवसाचा नियमित वापर करणा:या रुग्णांच्या एकूण कोलेस्टेरॉल पातळीत तसेच विघातक (एल.डी.एल.) कोलेस्टेरॉल पातळीत फरक पडून ती कमी झालेली दिसते. असाही एक निष्कर्ष आहे की, ओमेगा-3 मेदाम्लांमुळे रक्तात गुठळ्या होण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
जवसाच्या नियमित सेवनाने भरपूर ओमेगा 3 मेदाम्ले पोटात जाऊन कोलेस्टेरॉलवर नियंत्रण मिळाल्याने उच्च रक्तदाबावरही नियंत्रण मिळते. जवसामधे भरपूर चोथा असल्याने मलोत्सर्जासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. तसेच हा चोथा पाण्यात मिसळला की एक थलथलीत घट्ट पदार्थ तयार होतो. त्यामुळे अन्न हळूहळू पुढे ढकलले गेल्याने रक्तातील साखरेची पातळी एकदम वाढत नाही.
जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजी या कर्करोगविषयक नियतकालिकातील शोधनिबंधातील निष्कर्षानुसार जवसातील ओमेगा-3 मेदाम्लांमुळे पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगाला प्रतिबंध होतो. जवसाचा उपयोग स्त्रियांसाठीही खूप होतो असं आढळलं आहे. त्यामुळे शरीरात हार्मोन्ससारखी रसायने तयार होतात, ज्यामुळे स्तनांच्या कर्करोगाला प्रतिबंध होतो. जवसाचा उपयोग रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमधे अचानक येणा:या गरम लहरींचे (हॉट फ्लशेस) प्रमाणही कमी झाल्याचे आढळले आहे. डोळे कोरडे पडण्याचा रोग अमेरिकेत ब:याच प्रमाणात आढळतो. जवस रोज आहारात असेल तर यालाही प्रतिबंध होतो असं आढळलं आहे.
जवस कढईत थोडंसं भाजून त्यात ऑलिव्ह तेलावर परतलेला कढीपत्ता आणि लाल मिरच्या, थोडे भाजलेले तीळ, थोडी चिंच व मीठ असं सगळं एकत्र करून मिक्सरवर कोरडी चटणी बनवून ठेवावी. एका वेळी तीन दिवस पुरेल एवढीच चटणी बनवावी. हवाबंद डब्यात फ्रीजमधे ठेवावी. रोज सकाळ-संध्याकाळ एक टेबलस्पून खावी. जवसाचे कितीही फायदे असले, तरी त्याचं सेवन नियमित पण बेतातच करावं. विशेषत: गरोदर स्त्रीला जवस शक्यतो देऊच नये.
१) अस्थमा, कफ, कुष्ठरोग, त्वचेचे विकार, आमांश, जुलाब, लचक भरणे, क जीवनसत्त्व अभाव, अपचन, कटिवात या आजारांत बियांचा वापर लाभदायक आहे.
२) आळीवाची मुळे कडू व तिखट असून, गरमीच्या आजारात लाभदायक आहेत.
३) बिया फुफ्फुसाची कार्य सुधारण्यात मदत करतात. बियास मसाल्याचा सुगंध असून चव तिखट आहे.
४) आळीव मध्ये मुख्य प्रमाणात सलफोराफेन हे आयसोथायोसिनेट आढळते, याचा उपयोग कर्करोगाच्या उपचारामध्ये केला जातो.
५) डोळे व हृदयाच्या विकारात फायदेशीर असणारे ल्युटीन व झियाझांथीन हे दोन कॅरोटिनाईड हे रासायनिक घटक आळीव मध्ये उच्च प्रमाणात असतात. १३) नियमितपणे अाळीवचे सेवन केल्याने रक्तक्षय बरा होण्यास मदत होते. आळीव बिया व मध यांची पेस्ट करून घेतल्यास आमांश बरा होतो. कोंब आलेल्या आळीव बिया खाल्ल्यास आमांश व जुलाबामध्ये आतड्यांचा दाह कमी होण्यास मदत होते.
६) आळीव बिया बुद्धीवर्धक आहेत, कारण त्यात ॲरचिडिक व लिनोलेईक हे स्निग्ध आम्ल चांगल्या प्रमाणात असते.
७) स्तनदा मातांसाठी आळीव जीवनसत्त्व व खनिजांचा चांगला स्रोत आहे.
तेलबियांमधील पोषणमूल्य
तेलबिया —- उष्मांक टक्के —- पाणी टक्के —- प्रथिने टक्के —- तेल टक्के —- खनिजे टक्के —- तंतुमय पदार्थ टक्के —-कर्बोदके टक्के —-कॅल्शिअम (मि.ग्रॅ./१०० ग्रॅम) —- फॉस्फरस (मि.ग्रॅ./१०० ग्रॅम) —- लोह (मि.ग्रॅ./१०० ग्रॅम)
आळीव —- ४४५ —- ३ —- २५ —- २४ —- ६ —- ८ —- ३३ —- ३७७ —- ७२३ —- १००
जवस —- ५३० —- ६ —- २० —- ३७ —- २ —- ५ —- २९ —- १७० —- ३७० —- ३
कारळे—- ५१५ —- ४ —- २४ —- ३९ —- ५ —- ११ —- २७ —- ३०० —- २२४ —- ५७
तीळ —- ५६३ —- ५ —- १८ —- ४३ —- ५ —- ३ —- २५ —- १४५० —- ५७० —- ९
तेलातील आवश्यक विविध स्निग्धाम्ले (टक्के)
दुर्लक्षित तेलबिया —- लिनोलेनिक —- लिनोलेईक —- ओलिईक —- इकोसानॉईक —- पालमिटिक —- ॲरॅचिडीक —- स्टिअरीक
आळीव —- ३४ —- २२ —- ११.८ —- १२ —- १०.१ —- ३.४ —- २.९
जवस —- ५३.२१ —- १७.२५ —- १८.५१ —- – —- ६.५८ —- – —- ४.४३
कारळे—- – —- ५७.१ —- १५.२ —- १.७१ —- १८.९ —- – —- ६.५७
तीळ —- ०.४८ —- ३८.२९ —- ४१.६८ —- ०.१५ —- १२.९६ —- ०.५३ —- ५.७६