जागतिक सामाजिक न्याय दिवस.

ठळक घटना

१७९२: जॉर्ज वॉशिंग्टन यांनी टपाल सेवा कायद्यावर सही केली. अमेरिकन टपाल खाते अस्तित्त्वात आले.

१९१३: ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेराची स्थापना.

१९६२: जॉन ग्लेनने फ्रेंडशिप ७ या उपग्रहातून पृथ्वीप्रदक्षिणा केली व हे करणारा प्रथम अमेरिकन ठरला.

१९७८: शेवटचा ऑर्डर ऑफ व्हिक्टरी सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.

१९८७: मिझोरम व अरुणाचल या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला.

जन्म

१८४४: ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ लुडविग बोल्टझमन.

१९०१: इजिप्तचे पहिले अध्यक्ष मिसर मुहम्मद नागुईब.

१९०४: रशियाचे पंतप्रधान अलेक्सी कोसिजीन.

१९२५:  जपानी सुमो ४४ वे योकोझुना तोचीनिशिकी कियोटाका.

१९५१: इंग्लंडचे पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन.

मृत्यू

१९०५: भारतातील सर्कस उद्योगाचे जनक विष्णुपंत छत्रे.

१९१०: इजिप्तचे पंतप्रधान ब्युट्रोस घाली.

१९५०: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅ. शरदचंद्र बोस.

१९७४: नाट्यसमीक्षक के. नारायण काळे.

१९९३: प्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट्स लॅम्बोर्गिनी कारचे निर्माते फारूशियो लॅम्बोर्गिनी.

१९९४: मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू त्र्यं. कृ. टोपे.

१९९७: माणूस साप्ताहिकाचे संपादक ग. माजगावकर.

२००१: माजी केंद्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजित गुप्ता.

२०१२: संत साहित्याचे अभ्यासक, शोधक डॉ. रत्‍नाकर मंचरकर.