जागतिक आरोग्य दिन

घटना

१८७५: आर्य समाजाची स्थापना झाली.

१९०६: माऊंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे नेपल्स शहर बेचिराख झाले.

१९३९: दुसरे महायुद्ध – इटालीने अल्बेनिया पादाक्रांत केले.

१९४०: पोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे पहिले कृष्ण्वर्णीय अमेरिकन ठरले.

१९४८: जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्थापना झाली.

१९८९: लठ्ठा नावाच्या विषारी दारूने बडोदा येथे १२८ जणांचा बळी गेला.

१९९६: श्रीलंकेचे क्रिकेटपटू फलंदाज सनथ जयसूर्या यांनी सिंगरकरंडक स्पर्धेत १७ चेंडूंत अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम केला.

जन्म/वाढदिवस

१५०६: ख्रिस्ती धर्मप्रसारक सेंट फ्रान्सिस झेविअर. (मृत्यू: ३ डिसेंबर १५५२ – साओ जोआओ, चीन)

१७७०: स्वच्छंदतावादाचे प्रणेते आणि इंग्लिश कवी विल्यम वर्डस्वर्थ. (मृत्यू: २३ एप्रिल १८५०)

१८६०: केलॉग्ज चे मालक विल केलॉग. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९५१)

१८९१: जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेविड लो. (मृत्यू: १९ सप्टेंबर १९६३ – लंडन, इंग्लंड)

१९२०: भारतरत्‍न सतार वादक पंडित रविशंकर. (मृत्यू: १२ डिसेंबर २०१२)

१९२५: केंद्रीय कृषिमंत्री व कामगार नेते चतुरानन मिश्रा. (मृत्यू: २ जुलै २०११)

१९३८: भाजपाचे लोकसभा सदस्य काशीराम राणा. (मृत्यू: ३१ ऑगस्ट २०१२)

१९४२: हिंदी चित्रपट अभिनेते जितेंद्र.

१९५४: हाँग काँगचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते जॅकी चेन .

१९८२: भारतीय वंशाचा अमेरिकन व्यावसायिक कुस्तीगीर सोंजय दत्त.

मृत्यू/पुण्यतिथी

१४९८: फ्रान्सचा राजा चार्ल्स (आठवा) . (जन्म: ३० जून १४७०)

१९३५: भारतीय शास्त्रज्ञ डॉ. शंकर आबाजी भिसे . (जन्म: २९ एप्रिल १८६७)

१९४७: फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड. (जन्म: ३० जुलै १८६३)

१९७७: चित्रपट अभिनेते, लेखक आणि गीतकार राजा बढे . (जन्म: १ फेब्रुवारी १९१२)

२००१: जगप्रसिद्ध जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९२२ – एर्नाकुलम, केरळ)

२००४: प्रसिद्ध ओडिसी नर्तक केलुचरण महापात्रा. (जन्म: ८ जानेवारी १९२६)