शिक्षक दिन- मलेशिया.
महत्त्वाच्या घटना
१२०४: बाल्डविन नववा पहिला लॅटिन सम्राट झाला.
१६०५: पॉल पाचवा पोपपदी.
१६६५: पुरंदर किल्ल्यास दिलेरखानाने घातलेला वेढा तोडण्याच्या प्रयत्नात मुरारबाजी यांचा मृत्यू.
१८६६: अमेरिकेत पाच सेन्ट किंवा निकेल हे नाणे व्यवहारात आणले.
१८९९: क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर यांना फाशी.
१९१८: अमेरिकेत सरकारवर टीका करणे हा तुरुंगवासास पात्र गुन्हा ठरवण्यात आला.
१९२०: पोप बेनेडिक्ट पंधराव्याने जोन ऑफ आर्कला संत ठरवले.
१९२९: पहिले ऑस्कार पुरस्कार वितरीत.
१९२९: हॉलिवूडच्या अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर, आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेतर्फे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. हा पहिला अकादमी पुरस्कार होतो याचेच पुढे ऑस्कर असे नाव पडले.
१९६९: सोविएत रशियाचे व्हेनेरा-५ हे मानवविरहित अंतराळयान शुक्रावर उतरले.
१९७५: सिक्कीम भारतात विलीन झाले.
१९७५: जपानची जुंको तबेई ही माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बनली.
१९७५: सिक्कीममधील जनतेने कौल दिल्यावर भारताने सिक्कीमला देशाचा भाग करून घेतले.
१९९२: स्पेस शटल एन्डेव्हरची प्रथम अंतराळयात्रा सफल.
१९९३: बचेन्द्री पालच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेने सात मुलींसह अठरा गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला व नवा जागतिक विक्रम नोंदविला.
१९९६: भारताचे १० वे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी सूत्रे हाती घेतली. मात्र आवश्यक पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांचे सरकार केवळ १३ दिवस टिकले.
२०००: बॅडमिंटन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी तसेच खेळांचे दूरचित्रवाणी प्रसारण सुलभ करण्यासाठी या खेळातील गेम १५ ऐवजी ७ गुणांचा करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाच्या क्वालालंपूर येथील बैठकीत घेण्यात आला. मात्र २००६ मधे हा नियम परत बदलला गेला.
२००५: कुवेतमधे स्त्रियांना प्रथमच मतदानाचा हक्क प्राप्त झाला.
२००७: निकोलाय सारकॉझी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.
२०१४: नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकांमधे बहुमत प्राप्त केलं.
जन्मदिवस / वाढदिवस
१८२४: आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य केरुनाना लक्ष्मण छत्रे. (मृत्यू: १९ मार्च १८८४)
१८३१: मायक्रोफोन चे सहसंशोधक डेव्हिड एडवर्ड ह्यूजेस . (मृत्यू: २२ जानेवारी १९००)
१९०५: अमेरिकन अभिनेते हेन्री फोंडा यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑगस्ट १९८२)
१९२६: गायिका माणिक वर्मा . (मृत्यू: १० नोव्हेंबर १९९६)
१९३१: भारतीय राजकारणी व परराष्ट्रमंत्री के. नटवर सिंह यांचा जन्म.
१९४४: महाराष्त्रातील एक प्रसिध्द लोकनेते अभयसिंह राजे भोसले यांचा जन्म
१९७०: अर्जेंटिनाची टेनिस खेळाडू गॅब्रिएला सॅबातिनी यांचा जन्म.
१९७५: निरोशन बंदरतिलके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू / पुण्यतिथी
१६६५: पुरंदर किल्ला लडविताना मराठेशाहीतील स्वामीनिष्ठ सरदार मुरारबाजी देशपांडे यांचे प्राणार्पण
१८३०: फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फोरियर यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १७६८
१९२६: महमद सहावा, शेवटचा ओस्मानी सम्राट.
१९५०: कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री अण्णासाहेब लठ्ठे . (जन्म: ९ डिसेंबर १८७८)
१९७७: माली देशाचे पहिले अध्यक्ष मादीबो केएटा. (जन्म: ४ जुन १९१५)
१९९०: द मपेट्स चे जनक जिम हेनसन . (जन्म: २४ सप्टेंबर १९३६)
१९९४: साहित्य समीक्षक माधव मनोहर यांचे निधन.
१९९४: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक फणी मुजुमदार . (जन्म: २८ डिसेंबर १९११ – फरिदपूर, बांगला देश)
२०००: माधव गोविंद काटकर, मराठी कवी.
२००८: ओपस वन व्हाइनरी चे सहसंस्थापक रॉबर्ट मोन्डवी यांचे निधन. (जन्म: १८ जुन १९१३)
२०१४: टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रुसी मोदी . (जन्म: १७ जानेवारी १९१८)