आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन / जागतिक एड्स लस दिन
महत्त्वाच्या घटना
१४९८ : वास्को-द-गामा भारतातील कालिकत बंदरात दाखल झाला.
१८०४ : नेपोलिअन बोनापार्ट फ्रान्सचा सम्राट झाला.
१९१२: पूर्णपणे भारतात बनवलेला पुंडलिक हा मूकपट प्रदर्शित झाला.
१९३८: प्रभात चा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रदर्शित झाला.
१९४०: प्रभात चा संत ज्ञानेश्वर हा चित्रपट मुंबई व पुणे या ठिकाणी एकाच दिवशी प्रदर्शित झाला.
१९७२: दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.
१९७४: भारताने पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली.
१९९०: फ्रान्स च्या टीजीव्ही रेल्वे ने ५१५.३ किमी/ताशी वेगाने धावण्याचा नवीन जागतिक विक्रम केला.
१९९१: रशियाच्या सोयुझ अंतराळातुन भ्रमण करणारी हेलन शेरमन ही महिला पहिली ब्रिटिश अंतराळयात्री बनली.
१९९५: स्थानिक ठिकाणचे ५,००० रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसर्या दिवशी ती रक्कम ग्राहकास काढण्याची मुभा द्यावी, असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने दिला.
१९९८: पुण्याच्या सुरेन्द्र चव्हाणने जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले.
२००९: श्रीलंका सरकारने एलटीटीई ला पराभूत करून सुमारे २६ वर्षच्या युद्धाला संपवले.
जन्मदिवस / वाढदिवस
१०४८: पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी ओमर खय्याम . (मृत्यू: ४ डिसेंबर ११३१)
१६८२ : छत्रपती शाहूराजे भोसले, संभाजीराजे व माहाराणी येसुबाई यांचे पुत्र. (मृत्यू: १५ डिसेंबर १७४९)
१८७२: ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार बर्ट्रांड रसेल . (मृत्यू: २ फेब्रुवारी १९७०)
१९१३ : पुरुषोत्तम काकोडकर – गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते, ५ व्या लोकसभेचे सदस्य (मृत्यू: २ मे १९९८)
१९२०: पोप जॉन पॉल (दुसरा) यांचा जन्म. (मृत्यू: २ एप्रिल २००५)
१९३३: भारताचे ११ वे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा जन्म.
१९७९: माईनक्राफ्ट या गेम चे सहसंस्थापक जेन्स् बर्गेंस्टन यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी
१८०८: बोर्नबॉन व्हिस्की चे निर्माते एलीया क्रेग यांचे निधन.
१८४६: मराठी पत्रकारितेचे पितामह बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १८१२)
१९६६: वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १९०४)
१९८६ : कानरू लक्ष्मण राव, स्थापत्य अभियंता.
१९९७: भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १९०१)
१९९९: पहिले राष्ट्रीय बुद्धीबळ विजेते रामचंद्र सप्रे यांचे निधन.
२००९: एल. टी. टी. ई. (Liberation Tigers of Tamil Eelam) चे संस्थापक वेल्लुपल्ली प्रभाकरन यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९५४)
२०१२: भारतीय धार्मिक नेते जय गुरूदेव यांचे निधन.
२०१७: भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचे निधन. (जन्म: २१ जुन १९५८)