राष्ट्र सेवादल दिवस,
हुतात्मा दिन,
विश्व निष्पाप बालक व आक्रमणपीडित दिनमहत्त्वाच्या घटना
१६७४: राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकिलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे ७३ किलो भरले.
१८७६: ट्रान्सकाँटिनेन्टल एक्स्प्रेस रेल्वे अमेरिकेच्या दोन तीरांना जोडणारी ही रेल्वेची पहिली प्रवासी खेप होती.
१८६२ : अमेरिकन यादवी युद्ध – दक्षिणेच्या सैन्याने फोर्ट पिलोतून पळ काढला. उत्तरेने मेम्फिस, टेनेसीवर चाल केली.
१८७६ : न्यू यॉर्कहून निघालेली ट्रान्सकाँटिनेन्टल एक्सप्रेस ही रेल्वे गाडी ८३ तास ३९ मिनिटांच्या प्रवासानंतर सान फ्रांसिस्को येथे पोचली. अमेरिकेच्या दोन तीरांना जोडणारी ही रेल्वेची पहिली प्रवासी खेप होती
१८७८: ऑट्टोमन साम्राज्याने सायप्रस युनायटेड किंग्डमच्या हवाली केले.
१८९६: हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे यशस्वी परीक्षण.
१९३९ : ज्यूंचे शिरकाण –युरोपमधून ९६३ ज्यूंना घेउन आलेल्या एस.एस. सेंट लुईस या बोटीला अमेरिकेने परवानगी नाकारली.
यापूर्वी क्युबानेही हे प्रवासी स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे ही बोट युरोपला परतली. यातील अनेक प्रवासी नाझींच्या छळसत्रात मृत्यू पावले.
१९३९ : ज्यूंचे शिरकाण – युरोपमधून ९६३ ज्यूंना घेउन आलेल्या एस.एस. सेंट लुईस या बोटीला अमेरिकेने परवानगी नाकारली.
यापूर्वी क्युबानेही हे प्रवासी स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे ही बोट युरोपला परतली. यातील अनेक प्रवासी नाझींच्या छळसत्रात मृत्यू पावले.
१९४० : दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्य पॅरिसमध्ये घुसले.
१९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त सैन्याने रोम जिंकले.
१९७०: टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
१९७९: घानामधे लष्करी उठाव.
१९९३: आय.एन. एस. म्हैसूर या युद्धविनाशिकेचे जलावतरण.
१९९४: वेस्टइंडिजच्या ब्रायन लाराचा ८ डावांत ७ शतकांचा नवा विक्रम.
१९९४ : वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटु ब्रायन लारा याने आठ डावात सात शतके ठोकून नवा विक्रम प्रस्थापित केला.
१९९४: गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
१९९७: इन्सॅट-२डी या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोऊरू येथून यशस्वी प्रक्षेपण झाले.
२००१ : नेपाळचा शेवटचा राजा ग्यानेंद्र राज्यपदावर.
जन्मदिवस / वाढदिवस
१७३८: इंग्लंडचा राजा जॉर्ज (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १८२०)
१९०४: भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी भगत पुराण सिंह . (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९२)
१९१०: होव्हरर्क्राफ्टचे शोधक ख्रिस्तोफर कॉकेरेल्म . (मृत्यू: १ जुन १९९९)
१९१५: माली देशाचे पहिले अध्यक्ष मालिबो केएटा. (मृत्यू: १६ मे १९७७)
१९३६: चित्रपट अभिनेत्री नूतन बहल. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९९१)
१९४६: दाक्षिणात्य चित्रपटातील पार्श्वगायक पद्मश्री व पद्मभूषण एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचा जन्म.
१९४७: विनोदी अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म.
१९७४: भारतीय शेफ जॅकब सहाय्या कुमार अरुनी. (मृत्यू: ४ नोव्हेंबर २०१२)
१९७५: अमेरिकन अभिनेत्री अँजेलिना जोली यांचा जन्म.
१९९०: भूतानच्या राणी जेत्सुनपेमा वांग्चुक यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी
१९३२ – धर्मानंद दामोदर कोसंबी, बौद्ध धर्माभ्यासक, पंडित.
१९६२ – चार्ल्स विल्यम बीब (चित्रित), अमेरिकन निसर्गतज्ज्ञ.
१९९८ – डॉ. अश्विन दासगुप्ता, इतिहासतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ.
१९९८ – गोविंद वासुदेव कानिटकर, मराठी साहित्यिक.