जागतिक रक्त दाता दिन
महत्त्वाच्या घटना
११५८: इसार नदीच्या काठावर म्यूनिच शहर स्थापन केले.
१७०४: मुघलांच्या कैदेत असलेल्या संभाजीराजे यांच्या मुलाचे औरंगजेबाने लग्न लावून दिले.
१७७७: अमेरिकेने स्टार्स अँड स्ट्राइप्स या ध्वजाचा स्वीकार केला.
१७८९: मक्यापासुन पहिल्यांदाच व्हिस्की तयार करण्यात आली. तिला बोर्बोन असे नाव देण्यात आले.
१८९६: महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम ही संस्था महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली.
यातुनच पुढे कर्वे स्त्री शिक्षण संस्था, एस. एन. डी. टी. विद्यापीठ असे मोठमोठे उपक्रम सुरू झाले.स्थापन केली.
१९०७: नॉर्वेत स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.
१९२६: ब्राझील लीग ऑफ नेशन्समधून बाहेर.
१९३८: सुपरमॅनची चित्रपट कथा पहिल्यांदा प्रकाशित.
१९४०: दुसरे महायुद्ध –दोस्त राष्ट्रांनी पॅरिस जर्मनीच्या हवाली केले.
१९४५: भारताला स्वायत्तता देण्यासंबंधीची वेव्हेल योजना जाहीर.
१९५२: अमेरिकेने अणुशक्तीवर चालणारी पहिली पाणबुडी यू. एस. एस. नॉटिलस बांधण्यास सुरुवात केली.
१९६२: पॅरिसमध्ये युरोपियन अंतराळ संशोधन संस्था स्थापन झाली – नंतर युरोपियन स्पेस एजंसी बनली.
१९६७ : चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्ब ची चाचणी केली.
१९६७: मरिनर ५ अंतराळ यान शुक्राकडे प्रक्षेपित करण्यात आले.
१९७२: डी. डी. टी. या कीटकनाशकाच्या वापरावर अमेरिकेत बंदी घालण्यात आली.
२००१: ए. सी. किंवा डी. सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणार्या उपनगरी गाडीचा (Electric Multiple Unit EMU) शुभारंभ पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते झाले.
जन्मदिवस / वाढदिवस
१३९८ : संत कबीर.
१४४४: भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निळकंथा सोमायाजी यांचा जन्म.
१७३६: फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स कौलोम्ब यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १८०६)
१८६४: जर्मन मेंदुविकारतज्ञ अलॉइस अल्झायमर यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९१५)
१८६८: नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ कार्ल लॅन्ड्स्टायनर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून १९४३)
१९२२: हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक के. आसिफ यांचा जन्म.
१९६९: प्रसिद्ध जर्मन टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी
१५३४: योगी चैतन्य महाप्रभू . (जन्म: १८ फेब्रुवारी १४८६)
१८२५: वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता पिअर चार्ल्स एल्फांट यांचे निधन. (जन्म: ९ ऑगस्ट १७५४)
१९१६: मराठी नाटककार नाट्यदिग्दर्शक गोविंद बल्लाळ देवल . (जन्म: १३ नोव्हेंबर १८५५)
१९२०: जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर . (जन्म: २१ एप्रिल १८६४)
१९४६: ब्रिटिश शास्त्रज्ञ, आद्य दूरचित्रवाणी संशोधक जॉन लोगी बाअर्ड . (जन्म: १३ ऑगस्ट १८८८)
१९८९: हासिनी मुळगांवकर – अभिनेत्री व संस्कृत पंडित, मराठी रंगभूमीवरील एकपात्री नाट्यप्रयोगांची सुरुवात त्यांनी केली. ३१ जानेवारी १९६० रोजी ’सौभद्र’
नाटकाचा पहिला एकपात्री प्रयोग त्यांनी केला. या नाटकाचे त्यांनी विक्रमी ५०० प्रयोग केले. (जन्म: ????)
२००७: संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस कुर्त वाल्ढडाईम . (जन्म: २१ डिसेंबर १९१८)
२०१०: इंग्रजी लेखक मनोहर माळगावकर यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १९१३)