महत्त्वाच्या घटना
१६८७: सर आयझॅक न्यूटन यांनी फिलोसॉफी नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले.
१८११: व्हेनेझुएला देशाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१८३०: फ्रान्सने अल्जीरीया पादाक्रांत केला.
१८४१: थॉमस कुक यांनी लेस्टर ते लोफबरो अशी पहिली सहल आयोजित केली.
१८८४: जर्मनीने कॅमॅरून हा देश ताब्यात घेतला.
१९१३: किर्लोस्कर नाटक मंडळीतील प्रमुख नट गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्या भागीदारीत बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली
१९२८ : जागातील पहिला बोलपट दि लाईटस ऑफ़ हा न्यूर्याकमध्ये प्रदर्शित.
१९४३ : सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेची स्थापना. चलो दिल्ली ही घोषणा प्रसृत.
१९४६: फ्रान्स फॅशन शोमध्ये पदार्पण केल्यानंतर बिकिनीची विक्री सुरु.
१९५०: इस्रायेलच्या क्वेन्सेटने जगातील ज्यू व्यक्तींना इस्रायलमध्ये राहण्याचा हक्क दिला देण्यात आला.
१९५४: आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना.
१९५४: बीबीसीने पहिले टेलिव्हिजन बातम्या बुलेटिन प्रसारित केले.
१९६२: अल्जीरीया देशाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले
१९७५: भारतातून देवी रोग पूर्णपणे बरा झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.
१९७५: केप व्हर्डे देशाला पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९७५: विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिंकणारे आर्थर अॅश हे पहिले कृष्णवर्णीय खेळाडू बनले.
१९७५ : देवी या रोगाचे भारतातून समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.
१९७७: पाकिस्तानमध्ये लष्करी उठाव ,झुल्फिकार अली भूट्टो तुरुंगात.
१९८०: स्वीडन टेनिसपटू ब्योर्न बोरग यांनी विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा सलग पाच वेळा जिंकली.
१९९६: संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व अवकाश आयोगाचे सदस्य एन. पंत यांना आर्यभट्ट पुरस्कार जाहीर
१९९७: स्वित्झर्लंडच्या अवघ्या १६ वर्षाच्या मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकाच्या याना नोव्होत्नाला पराभूत करुन सर्वात लहान वयात
विंबल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली. हे तिच्या कारकिर्दितील दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद होते.
२००९: अँडी रॉडीकला विम्बल्डनमधे पराभूत करुन रॉजर फेडररने विक्रमी १५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.
२०१२: ३१० मीटर (१०२० फूट) उंचीसह लंडनमधील द शर्ड ही युरोपमधील सर्वात उंच इमारत ठरली.
२०१६: नासाचे अंतरिक्ष यान जूनो गुरू ग्रहाच्या कक्षात शिरले
जन्मदिवस / वाढदिवस
१८८२: भारतीय हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक हजरत इनायत खाँ. (मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२७)
१९१६ : के. करुणाकरन ,केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि केरळमधील युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट चे संस्थापक (मृत्यू: २३ डिसेंबर २०१०)
१९१८: केंद्रीय उद्योगमंत्री आणि केरळचे मुख्यमंत्री के. करुणाकरन. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१०)
१९२०: साहित्यिक संस्कृत वाङ्मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे साहित्यिक आनंद साधले . (मृत्यू: ४ एप्रिल १९९६)
१९२५: केंद्रीय मंत्री आणि गुजरातचे राज्यपाल नवल किशोर शर्मा . (मृत्यू: ८ ऑक्टोबर २०१२)
१९४६: केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे खासदार रामविलास पासवान यांचा जन्म.
१९५२: चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक रेणू सलुजा परिंदा,धारावी,सरदार आणि गॉडमदर इ.
चित्रपटांच्या संकलनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक (मृत्यू: १६ ऑगस्ट २००० – मुंबई)
१९५४: न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक जॉन राइट .
१९६८: युट्युब चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान वॉजिकी .
मृत्यू / पुण्यतिथी
१८२६: सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स . (जन्म: ६ जुलै १७८१)
१८३३: जगातील पहिले परिचित असलेला फोटो काढणारे निकेफोरे निओपे. (जन्म: ७ मार्च १७६५)
१९४५: ऑस्ट्रेलियाचे १४ वे पंतप्रधान जॉन कर्टिन.
१९५७: भारतीय वकील आणि राजकारणी अनुग्रह नारायण सिन्हा. (जन्म: १८ जून १८८७)
१९८०: कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे . (जन्म: २४ एप्रिल १८९६)
१९९६: रहस्यकथाकार चंद्रकांत सखाराम चव्हाण उर्फ बाबूराव अर्नाळकर. (जन्म: ९ जून १९०६)
१९९९: विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे . (जन्म: १४ मे १९०९)
२००५: लेगस्पिन गोलंदाज बाळू गुप्ते . (जन्म: ३० ऑगस्ट १९३४)
२००६: भारतीय कवी आणि विद्वान थिरुल्लालु करुणाकरन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९२४)