महत्त्वाच्या घटना
१६६०: पावनखिंड झुंजवणार्या वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचल्याच्या खुणेच्या तोफांच
आवाज ऐकल्यावर आता मी सुखाने मरतो असे म्हणून प्राण सोडला.
१८३७: राणी व्हिक्टोरिया बकिंगहॅम पॅलेस मध्ये राहायला गेल्या. तेव्हापासून ते इंग्लंडच्या राजाचे/राणीचे अधिकृत निवासस्थान बनले.
१८६३: सक्तीच्या सैन्यभरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाला.
१९०८ : चौथी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा लंडन येथे सुरु.
१९०८: ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.
१९२९: जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणातच ६३ दिवसांनी (१३ सप्टेंबर १९२९) त्यांचा मृत्यू झाला.
१९५५: २८ वर्षीय रुथ एलिसला प्रियकराचा खून केल्याबद्दल फाशी दिली. ग्रेट ब्रिटनमधली स्त्रीकैद्याची अखेरची फाशी ठरली.
१९७७: रोहित्रावर (transformer) वीज पडल्यामुळे न्यूयॉर्क शहरातील वीजपुरवठा २४ तास खंडित झाला.
२०११: मुंबई शहरात झालेल्या ३ बॉम्बस्फोटात २६ जण ठार तर १३० जण जखमी झाले
२०१६ : थेरेसा मे, यूनाइटेड किंगडमच्या दूस-या महिला प्रधानमंत्री झाल्या.
जन्मदिवस / वाढदिवस
१८९२: जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९७७)
१९४२: अमेरिकन अभिनेते हॅरिसन फोर्ड यांचा जन्म.
१९४४: रुबिक क्यूब चे निर्माते एरो रुबिक यांचा जन्म.
१९५३: वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू लॅरी गोम्स यांचा जन्म.
१९६४: भारतीय क्रिकेट खेळाडू उत्पल चॅटर्जी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी
१७९३: फ्रेंच क्रांतिकारी जीन-पॉल मारत.
१९६९: तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक महर्षी न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद. (जन्म: १२ जानेवारी १९०२)
१९८०: बोत्स्वानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सेरेत्से खामा .
१९९०: क्रीडा समीक्षक व समालोचक अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ बॉबी तल्यारखान .
१९९४: धृपद गायक, संगीतकार शिक्षक पंडित कृष्ण गुंडोपंत गिंडे यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९२५)
२०००: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका इंदिरा संत . (जन्म: ४ जानेवारी १९१४)
२००९: हिंदी मराठी चित्रपट अभिनेते निळू फुले .
२०१०: सुप्रसिद्ध सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग. (जन्म: ८ मार्च १९३१)
२०१४: आचार्य गिरिराज किशोर (आयु ९५ वर्ष) भारतीय राजनीतिज्ञ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक