महत्त्वाच्या घटना
१६९२: अमेरिकेतील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली स्त्रियांना फाशी देण्यात आली.
१८३२: सर चार्ल्स हेस्टिंग्स यांनी ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशनची स्थापना केली.
१९००: पॅरिस मेट्रोची पहिली सेवा सुरु झाली
१९०३: मॉरिस गरीन यांनी पहिली टूर डी फ्रान्स स्पर्धा जिंकली.
१९०५: लॉर्ड कर्झन यांनी बंगालच्या फाळणीची घोषणा केली.
१९३५ : जगात पार्किंग मीटरचा वापर प्रथमच अमेरिकेतील ओक्लाहोमा शहरातील वाहनतळावर सुरू झाला.
१९४०: दुसरे महायुद्ध – केप स्पादाची लढाई.
१९४७: म्यानमारच्या सरकारचे नियोजित पंतप्रधान आंग सान त्यांच्या मंत्री आणि सहकाऱ्यांची गॅलॉन सॉ याने हत्या केली.
१९५२: फिनलंड मधील हेलसिंकी येथे १५व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.
१९६९: भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
१९६९: नील आर्मस्ट्राँग, एडवीन ऑल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांसह अपोलो ११ हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले.
१९७६: नेपाळमधे सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली.
१९८०: सोविएत युनियनमधील मॉस्को येथे २२व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९९२: ऊर्दू कवी मजरुह सुलतानपुरी यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे इक्बाल सन्मान पुरस्कार जाहीर
१९९३: ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल डॉ. बानू कोयाजी यांना
समाजसेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर
१९९६: अमेरिकेतील अटलांटा येथे २६व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.
जन्मदिवस / वाढदिवस
१८१४: अमेरिकन संशोधक सॅम्युअल कॉल्ट.
१८२७: क्रांतिकारक मंगल पांडे. (मृत्यू: ८ एप्रिल १८५७)
१८३४: फ्रेंच चित्रकार एदगार देगास .
१८९६: स्कॉटिश लेखक ए. जे. क्रोनिन. (मृत्यू: ६ जानेवारी १९८१)
१८९९: भारतीय डॉक्टर, लेखक, कवी आणि नाटककार बालाइ चांद मुखोपाध्याय. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८९)
१९०२: कवी, कोशकार, इतिहास संशोधक यशवंत केळकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९४)
१९०२: भारतीय गायक, निर्माता, निर्माता,शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक आणि पटकथालेखक समृतरा राघवाचार्य. (मृत्यू: १६ मार्च १९६८)
१९०९: भारतीय कवी आणि लेखक बाल्मनी अम्मा . (मृत्यू: २९ सप्टेंबर २००४)
१९३८: सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा कोल्हापूर येथे जन्म. १९६४ मधे
केम्ब्रिज विद्यापीठात डॉ. फ्रेड हॉईल यांच्याबरोबर संशोधन करुन गुरुत्वाकर्षणासंदर्भातील एक नवा सिद्धांत मांडला.
१९४६: रोमानियन टेनिसपटू इलि नास्तासे.
१९५५: क्रिकेटपटू रॉजर बिन्नी .
१९६१: भारतीय पत्रकार आणि लेखक हर्षा भोगले.
मृत्यू / पुण्यतिथी