जन्मदिवस / वाढदिवस
१८८५: वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक देवेन्द्र मोहन बोस . (मृत्यू: २ जून १९७५)
१८९०: सुनीतिकुमार चटर्जी –आधुनिक ऐतिहासिक भाषाशास्त्र व ध्वनीविचार यांच्या अभ्यासाची मुहूर्तमेढ रोवणारे भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे
अध्यापक (मृत्यू: २९ मे १९७७)
१८९८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायन शास्रज्ञ कार्ल झीगलर .
१९०२: मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक मॉरिस मॅकडोनाल्ड . (मृत्यू: ११ डिसेंबर १९७१)
१९०४: भारतीय कवि, विद्वान, लेखक, तत्वज्ञानी के. डी. सेठना यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २०११)
१९१९: भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा . (मृत्यू: २० ऑगस्ट २०११)
१९२१: व्हर्गिस कुरियन –भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूलचे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB)
संस्थापक अध्यक्ष, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पारितोषिक विजेते (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१२ – नडियाद, गुजराथ)
१९२३: राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर –चित्रपट दिग्दर्शक (बोलविता धनी, मी तुळस तुझ्या अंगणी, माझं घर माझी माणसं, घरचं झालं थोडं, गजगौरी, जख्मी)
(मृत्यू: २८ जुलै १९७५ – मुंबई)
१९२३: भारतीय सिनेमॅटोग्राफर व्ही. के. मूर्ति . (मृत्यू: ७ एप्रिल २०१४)
१९२४: भारतीय क्रिकेटपटू जसुभाई पटेल.
१९२६: भारतीय राजकारणी रवी रे .
१९२६: कादंबरीकार, कामगार चळवळीचे नेते प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये .
१९३८: ऑस्ट्रेलियन भौतिकशास्रज्ञ रॉडनी जोरी .
१९३९: अमेरिकन-स्विस गायिका, अभिनेत्री व नर्तिका टीना टर्नर.
१९४९: पूर्व तिमोर देशाचे पहिले पंतप्रधान मारी अल्कातीरी.
१९५४: एल. टी. टी. ई. चे संस्थापक वेल्लुपल्ली प्रभाकरन. (मृत्यू: १८ मे २००९)
१९६१: कोबरा बीयरचे सहसंस्थापक करण बिलिमोरिया.
१९७२: हिंदी चित्रपट अभिनेते अर्जुन रामपाल.
१९८३: फेसबुकचे सहसंस्थापक क्रिस ह्यूजेस
मृत्यू / पुण्यतिथी
१९८५: राजकवी यशवंत दिनकर पेंढारकर तथा कवी यशवंत –रविकिरण मंडळातील एक कवी, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्यांना
महाराष्ट्र कवी म्हणून गौरविण्यात आले. (जन्म: ९ मार्च १८९९)
१९९४: भालजी पेंढारकर –मराठी चित्रपटसृष्टी आणि समाजमनावर पाच तपे अधिराज्य गाजवणारे चित्रमहर्षी (जन्म: २ मे १८९९)
१९९९: पुण्यातील जनता सहकारी बँकेचे संस्थापक संचालक दत्तात्रय शंकर जमदग्नी .
२००१:चंद्रकांत कृष्णाजी जगताप –शिल्पकार, पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधींचा पुतळा, शनिवारवाड्यासमोरील सिंहाची प्रतिमा, सिंहगडावरील
तानाजी मालुसरेंचा पुतळा ही त्यांनी घडवलेली काही प्रसिद्ध शिल्पे आहेते. याशिवाय त्यांनी तयार केलेली देवदेवतांची अनेक शिल्पे महाराष्ट्रात आहेत.
२००८: मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामते यांच्यासह १७ पोलीस कर्मचारी शहीद.
२०१२: भारतीय लेखक आणि अनुवादक एम सी सी नंबुदीपदी . (जन्म: २ फेब्रुवारी १९१९)
२०१६: रशियन विमान मिग-२९ चे सह-निर्माता आणि डिझायनर इव्हान मिकोयान.