प्रचीतगड
संगमेश्वर तालुक्याच्या शृंगारपूर या ऐतिहासिक गावाजवळ प्रचितगड आहे. या गडावर सह्याद्री पर्वतामधून वाट काढत जायचे म्हणजे बिकट परिस्थितीची व अनेक संकटांची प्रचिती घ्यावी लागते.
गडावर जाण्याच्या वाटा :
* शृंगारपूर गावामधून साडेचार तासांची अवघड चढण पार केल्यावर प्रचितगडावर पोहोचता येते.
* कंधारडोह येथून तीन तासांचे अंतर चालून गेल्यानंतर संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीचा मुकुटमणी असलेल्या प्रचितगडावर पोहोचता येते.
* नेरदवाडी येथून किमान सहा तासांची पायपीट करावी लागते. नेरदवाडीतून तीन तासांचे अंतर मळेघाटमार्गे पार केल्यावर सातारा जिल्ह्याची हद्द लागते.
सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून मार्गक्रमण करीत कंधार या प्रसिद्ध डोहावर जावे लागते. कंधार डोहाची छायाचित्रे व माहिती इंटरनेटवर असल्याने देशाच्या विविध राज्यांतून असंख्य तरुण पर्यटक हा प्रसिद्ध डोह पाहण्यासाठी येतात.
महत्वाची सुचना :चांदोली अभयारण्यातून वाट काढत जाण्यासाठी सोबत वाटाडे असणे महत्त्वाचे आहे. प्रचितगडावर चार तोफा व पडिक वास्तू असून येथील कातळाच्या तळघरात असणारे थंडगार पाणी म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच म्हटले पाहिजे.