न्याहारीचे पदार्थ

कांदे पोहे

भिजवलेले जाड पोहे 2 वाटया
मोहरी 1 चमचा
हिंग पाव चमचा
हळद पाव चमचा
बारीक चिरलेली मिरची 2 चमचे
चिरलेला कांदा 1 वाटी
मीठ 1 चमचा
लिंबू 1 नग
साखर चवीनुसार
कोथिंबीर –

कृती:-

पोळयांना कुस्करुन चुरा करुन घ्या. एका पॅनमध्ये बारीक चिरलेला कांदा फोडणीला घालून त्यात हिरव्या मिरची, हळद, तिखट घालून चांगले परतून घ्या. नंतर भिजवलेले पोहे घाला. चवीनुसार मीठ, लिंबू, साखर घालून थोडा पाण्याचा शिबका मारा व एक वाफ येवू दया. नंतर गरम गरम खायला दया.

 फोडणीची पोळी

साहित्य:-

तयार शिळया पोळया 10-12
मोहरी 1 चमचा
हिंग पाव चमचा
हळद पाव चमचा
बारीक चिरलेली मिरची 2 चमचे
चिरलेला कांदा 1 वाटी
मीठ 1 चमचा
लिंबू 1 नग
साखर चवीनुसार
कोथिंबीर –

कृती:-

पोळयांना कुस्करुन चुरा करुन घ्या. एका पॅनमध्ये बारीक चिरलेला कांदा फोडणीला घालून त्यात हिरव्या मिरची, हळद, तिखट घालून चांगले परतून घ्या. नंतर तयार पोळयांचा चुरा घाला. चवीनुसार मीठ, लिंबू, साखर घालून थोडा पाण्याचा शिबका मारा व एक वाफ येवू दया. नंतर गरम गरम खायला दया.

 दडपे पोहे

साहित्य –

पातळ पोहे 1 वाटी
ओल खोबरं पाव वाटी
चिरलेला कांदा पाव वाटी
हिरवी मिरची 3-4
कोथिंबीर 4 चमचे
मीठ, साखर, लिंबू चवीनुसार
मोहरी अर्धा चमचा
हिंग पाव चमचा
हळद पाव चमचा

कृती:-

पातळ पोहे, ओलं खोबरं, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, साखर व लिंबाचा रस एकत्र करुन त्यावर मोहरी, हिंग, हळद याची फोडणी घाला व लगेच झाकूण ठेवा.

दही पोहे

साहित्य –

पातळ पोहे 2 वाटया
शेंगदाणे 3 चमचे
ल्सूण, मिरची, कोथिंबीर पेस्ट 2 चमचे
मीठ चवीनुसार
चिरलेला कांदा पाव वाटी
मलाईचे दही अर्धी वाटी

कृती –

पोहे, हिरवी चटणी, तेल मीठ एकत्र करुन त्यामध्ये मलाईचे दही घाला. वरुन कांदा, कोथिंबीर घालून सव्र्ह करा. सव्र्ह करतेवेळी सोबत मलाईचे दही द्या.

कोळाचे पोहे

साहित्य:-

नारळाचे दूध 2 वाट्या
आलं, लसूण, कोथिंबीरीची चटणी 2 चमचे
चिंचेचा कोळ 4 चमचे
मीठ चवीनुसार
गुळ किसलेला 1 चमचा
बारीक चिरलेली कोथिंबीर 1 चमचा
जाड पोहे भाजलेले 1 वाटी

कृती:-

जाड पोहे भाजून बाजूला ठेवावे. नारळाच्या दूधामध्ये हिरवी चटणी, मीठ, चिंचेचा कोळ, गुळ घालून एकत्र मिसळून घ्यावे. त्यानंतर भाजलेले पोहे त्यात घालून 5 ते 7 मिनिटे भिजू द्यावे. भिजलेले पाहे बाजूला काढून त्यात कोथिंबीर घालून सव्र्ह करावे.

कोल्हापुरी मिसळ पाव

साहित्य –

मोड आलेली मटकी 3 वाट्या
लाल मोठे कांदे 4 नग
ओले खोबरे 2 वाट्या
सुके खोबरे 1 वाटी
आल्याचा तुकडा 3 इंच
लसूण 1 गाठ
कोथिम्बीर अर्धी वाटी
कोल्हापुरी चटणी 2 चमचे
गरम मसाला 1 चमचा
चिरलेले बटाटे 2 नग
मीठ, हिंग, हळद, तिखट चवीनुसार
ब्रेड 2 नग
बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी
कोथिंबीर पाव वाटी
लिंबू 1 नग
फरसाण 2 चमचे

कृती –

पातेल्यात तेल तापवून त्यात हिंग, हळद घालावी. मटकी, बटाटे टाकून परतावे, बुडेल इतके पाणी, तिखट, मीठ घालून षिजवावे. यात थोडे पाणी राहिले तरी चालेल. कांदे उभे पातळ चिरून घ्यावेत. यातला वाटीभर कांदे बाजूला ठेवून उरलेला कांदा खोबरे(दोन्ही), गरम मसाला तेलावर भाजून बारीक वाटवा. आंलं, लसूण, कोथिंबीर बारीक वाटावी. वाटताना जास्त पाणी घालू नये. जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून हिंग हळद आणि उभा चिरलेला वाटीभर कांदा कोल्हापुरी चटणी टाकावी. परतल् यावर दोन्ही वाटण घालून पुन्हा चांगलेे परतावे. त्यात मीठ आणि 4 कप पाणी घालून उकळी आणावी. घेताना एका खोलगट प्लेट मधे 2 मोठे चमचे फरसाण घ्यावे. त्यावर मटकी, थोडा कच्चा कांदा, कोथिंबीर घालून मग 1 पळी कट घालावा. कट घेताना ढवळून घ्यावा. लिंबू पिळून ब्रेड बरोबर खावे.

धिरडे

साहित्य:-

कणीक 1 वाटी
आंबट दही 3-4 चमचे
जीरे 1 चमचा
मीठ चवीनुसार
हिंग पाव चमचा
हळद पाव चमचा
हिरवी मिरची 3-4
कोथिंबीर –
लसूण पेस्ट अर्धा चमचा
तांदूळाची पीठी 2 चमचे
तेल 2 चमचे

कृती:-

एक वाटी कणीक घेवून त्यामध्ये 3-4 चमचे आंबट दही, जीरे, मीठ, हिंग, हळद, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर व अर्धा चमचा लसूण पेस्ट, 2 चमचे तांदूळाची पीठी मिसळून दोस्यासारखे पातळ करा व दोस्याप्रमाणेच तेल टाकून मंद आचेवर धिरडे बनवा.

सांबार वडी

कोथिंबीर वडीच्या आवरणासाठी साहित्य:-

बेसन 1 वाटी
मैदा 2 चमचे
आरारोट किंवा काॅर्नस्टार्च 1 चमचा
हळद पाव चमचा
मीठ चवीनुसार
कृती:- सर्व जिन्नस एकत्र करुन त्यात थोडे पाणी घालून 1 चमचा तेल घालावे व मळून गोळा तयार करुन घ्यावा.
मसाल्या करीती साहित्य:-
तेल 2 चमचे
आलं-लहसूण पेस्ट 1-1 चमचा
हळद पाव चमचा
तिखट चवीनुसार
जीरे पावडर 1 चमचा
गरम मसाला 1 चमचा
आमचूर पावडर अर्धा चमचा
साखर चवीनुसार
भाजलेली खसखस 1 चमचा
दाण्याचा कुट 4 चमचे
खोबरा कीस अर्धी वाटी
बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा किलो
बेदाणे 2 चमचे

कृती:-

दोन चमचे तेलात आलं-लसूण पेस्ट घालून त्यात हळद, तिखट, जिरे पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर, चवीनुसार साखर घालावी. नंतर त्यात दाण्याचा कुट, 1 चमचा भाजालेली खसखस व बेदाणे घालवे. त्यानंतर खोबरा कीस घालून थोडस परतून थंड झाल्यावर हा मसाला अर्धा किलो बारीक चिरलेल्या कोथिंबीरीमध्ये घालावा. नंतर बेसनाच्या गोळयाची पोळी लाटून त्यावर गरम मसाला व अर्धा चमचा आमचूरचे पाणी करुन लावा.े त्यावर हा मसाला पसरुन याचे रोल करावे व दोन्ही कडा ओल्या पाण्यानी बंद कराव्यात व मंद आचेवर तळून घ्याव्यात.