गेल्या तीन पिढ्यांपासून शालेय विद्यार्थ्यांमध्ये ’कॅमलिन’ हा ब्रॅंड अतिशय लोकप्रिय आहे. 79 वर्षांपासून दांडेकर कुटुंब या व्यवसायत आहेत. कॅमलीनची पेन्सिल आणि पेंटब्रश पासून रंगांपर्यंत दोन हजार उत्पादने बाजारात आहेत. राहुल दांडेकर अध्यक्ष म्हणून काम पहात आहेत. कॅमलीन कुटुंबाची दुसरी पिढी मालक म्हणून या व्यवसायावर मालकी गाजवत आहेत. कंपनीचे संचालक म्हणून दिलीप दांडेकर काम पाहत आहेत.
अलीकडे कंपनी मध्ये तृतीय पिढी दांडेकर कुटुंब व्यवसायात मुलांना वाट दाखवीत आहेत.कॅमलीन ( प्रारंभी दांडेकर आणि कंपनी म्हणून ओळखली जायची) कंपनी दोन भावांनी 1931 मध्ये कंपनी स्थापन करून ब्रांड शाई पावडर आणि उंट शाई सुरु केली. ह्या कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग कार्यालय सुरु केले. कॅमलिन कुटुंबाची चौथी पिढी या व्यवसायात उतरली आहे. दिलीप दांडेकररांची मुलगी आदिती कॅमलीन हि सुद्धा व्यवसायामध्ये येत आहेत. 23 वर्षीय मुलगा निखिल फार्मास्युटिकलचा अभियांत्रिकी उच्च अभ्यास पूर्ण करून कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत आहे.
मुलगा सिद्धार्थ हा उत्पादन अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून मुख्य व्यवसात सामील होईल. दिलीप दांडेकर यांनी सांगितले कि आम्ही व्यवसाय व्यवस्थापनात शिस्त व ऑर्डर एक नियम म्हणून पाळतो. आदिती, केतकी आणि राहुल यांचे कॅमलिन कंपनीमध्ये 1.89% भागभांडवल आहे. तसेच कंपनी मध्ये दिलीप दांडेकरांचे भागभांडवल 4.33 % आहे. 2009-10 या आथिर्क वर्षात मध्ये Rs 330.69 कोटी रुपये महसूल कंपनीकडे जमा होता. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत , कॅमलीन Rs 199.12 कोटींची उलाढाल झाली आहे. त्यात Rs 10.42 कोटी निव्वळ नफा आहे. दरवर्षी स्टेशनरीचा बाजार सुमारे 25 % वाढत आहे. उत्पादनात मोठ्या प्रमाणात भर पडत असल्याने कंपनीच्या नफ्यामध्ये वाढ होत आहे.
कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात मुलांना आणि लोकांना रोजगार मिळाला आहे. शाळेच्या वस्तू महत्त्वाच्या असल्याने नेहमी बाजारात उत्पादनाची तेजी असते. आम्ही आमच्या ग्राहकांना चागंल्या प्रतीची वस्तू देत असल्याने ग्राहक नेहमी आमच्या वस्तू खरेदी करतात . व्यवसायामध्ये प्रमाणिकपणा असल्याने नफा मोठ्या प्रमाणावर मिळतो. ग्राहक समाधान हेच आमचे व्यवसायाचे तंत्र असल्याने आमची कंपनी व्यवसायात टिकून आहे.