दातेगड
पाटण जवळील दातेगड हा किल्ला प्रेक्षणीय असून देखील उपेक्षित राहिलेला आहे.
चारी बाजूंनी नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी लाभलेल्या दातेगडाचे दुर्गवैशिष्ट्ये म्हणजे या गडावरील बऱ्याच वास्तू दगडातच खोदून तयार केल्या आहेत.
कसे जाल?
दातेगडास भेट देण्यासाठी आपणास कराड-कोयनानगर मार्गावरील पाटण हे गाव गाठावे. गावातून चाफोली रोड जातो त्या रस्त्याने १५ मिनीटे चालल्यानंतर डाव्या बाजूलाच लाल मातीची मळलेली पायवाट दिसते. या पायवाटेने थोड पुढे गेल्यानंतर दातेगडावरून उतरत आलेल्या डोंगरधारेस भिडायचे या रस्त्याने ४५ मिनीटे चालल्यानंतर एक दर्गा लागतो. या दर्ग्यासमोरून टेकडीच्याच धारेवरून मळलेल्या पायवाटेने आपण पठारावर पोहोचतो. तिथून साधारण २० मिनीटे चालल्यानंतर गडाच्या पायथ्याचे टोळेवाडी गाव लागते.
हा भाग डोंगराळ असल्याने गडावर पोहोचण्यासाठी स्थानिक लोकांच मदत घ्यावी, अन्यथा भरकटण्याची शक्यता आहे
इतिहास : दातेगडास शिवकालात सुंदरगड असेही नाव होते. दातेगडावरील खडकात खोदलेली विहीर व टाकी यावरून हा किल्ला शिवपूर्वकालीन असावा असे वाटते. शिवकालात गडावर कचेरी व कायम शिबंदी होती. या शिबंदीकरता गडाशेजारच्या गावातील जमिनी नेमून देणअयात आल्या होत्या. पुढे हा किल्ला काही काळ मोगलांच्या अधिपत्याखाली होता. मे १८१८ मध्ये कॅप्टन ग्रॅट याने हा किल्ला न लढताच जिंकला.
किल्ल्याचे वैशिष्ट्य :
गडाचे क्षेत्रफळ दोन हेक्टर आहे. गडाच्या पश्चिम बाजूस भग्न प्रवेशद्वार आहे.या बाजूस जाण्यासाठी पश्चिम तटाजवळील कातळात खोदलेल्या तीस पायऱ्या आहेत
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :
टोळेवाडी पार केल्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला लाल मातीची लाल मातीची मळलेली पायवाट दिसते. या पायवाटेने टेकडी पार केल्यानंतर पुढे पायऱ्याच्या वाटेने गडावर पोहोचायचं, दर्ग्यापासून दातेगडावर पोहोचण्यासाठी दोन तास लागतात.१९६७ च्या प्रलययकारी कोयनेच्या भूकंपात हा दरवाजा कोसळला. येथे शेजारीच सहा फूट उंचीची श्री गणेशाची मूर्ती असून तिचे कान जास्वंदीच्या पाकळीसारखे कोरलेले आहेत. या मूर्ती शेजारीच उजव्या हाताला दहा फूट उंचीची श्री हनुमंताची मुर्ती आहे. हा सर्व परिसर पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने वर यायचं. थोडं पुढे गेल्यानंतर तीस मीटर खोल असलेली खडकात खोदलेली लांबट आकाराची विहीर दिसते. तिच्या पायऱ्यांनी खाली तळात गेल्यानंतर पाण्याच्या अलीकडे डाव्या हातास खडकात खोदलेले महादेवाचे मंदीर लागते. या छोट्या मंदीरात शिवलिंग व नक्षीदार नंदी आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर दातेगडाचे मुख्य आकर्षण आहे. ही विहीर पाहून परत वर यायचं. गडाच्या उत्तर बाजूस गेल्यावर कातळात 8-10 फूट खोदलेला चौकोन दिसतो. गडाच्या या उत्तर बाजूची तटबंदी मात्र अजूनही चांगल्या अवस्थेत आहे.
संपूर्ण गड फिरून पहायला दोन तास पुरतात.