निवडक हेडलाईन्स – ५ मार्च
– देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 29 वर, 16 परदेशी आणि 12 भारतीय नागरिकांना कोरोनाची लागण केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची माहिती. कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने गुडगावमध्ये पेटीएमचं कार्यालय बंद. तर महाराष्ट्रात एकही रुग्ण नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं स्पष्टीकरण.
– ‘भारतीय पद्धत अवलंबवा अन् करोनापासून वाचा’.करोना हा साथीचा रोग असल्याने एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन न करता भारतीय पद्धत म्हणजे ‘नमस्ते’ करा, असं इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी म्हंयलय.
– कोरोना संशयितांच्या सॅम्पल्सची मुंबईतही तपासणी होणार, कस्तुरबा रूग्णालयात 5 तासांत अहवाल मिळणार, मुंबई विमानतळावर प्रवाशांची कसून तपासणी.
– कॅगच्या अहवालात सिडकोच्या कामावर गंभीर ताशेरे, नवी मुंबई विमानतळाच्या कामातही अनियमितता, तर अहवाल 2013 ते 2018 दरम्यानच्या कामावर असल्याचा फडणवीसांचा दावा .
– विधीमंडळाचा आजचा दिवस महिला प्रश्नांसाठी समर्पित, सभागृहात पहिल्यांदाच महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासाचा ठराव येणार.
– परभणीतील सेलूचे नगराध्यक्ष तर पालमच्या उपनगराध्यक्षांचं भाजपमधून निलंबन, सीएएविरोधात ठराव संमत करणं महागात, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कारवाई .
– मुंबईतील अनेक झोपडपट्ट्या धोकादायक स्थितीत, जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा निष्कर्ष.
सिडको घाटाळा: काँग्रेसचा फडणवीसांवर आरोप.
– सिडकोच्या कामांत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आल्यानंतर त्यावरून आधीच्या फडणवीस सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे.
– बलात्कारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात गेलेल्या नरेंद्र मेहतांना दिलासा, 20 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश .
– दिल्लीतील हिंसाचारप्रकरणी दिल्ली हायकोर्टात आज सुनावणी, भाजप नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देष.
– निर्भयाच्या दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा, चौथ्या आरोपीची दया याचिकाही राष्ट्रपतींनी फेटाळली, लवकरच नवं डेथ वॉरंट निघणार .
– गोंदियातल्या मोरवाही गावात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून, मराठीचा पेपर देऊन घरी परततानाची घटना, पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय .
– ‘एमएमआरडीए’कडून मोनोला उभारी देण्यासाठी नवी शक्कल; वाढदिवस, लग्नसोहळ्यांसाठी डबे भाड्याने देणार .
– महाविद्यालयीन शिक्षकांचं मुंबईत आंदोलन, वाढीव पदांची भरती करण्याची मागणी, आंदोलनामुळे बारावीच्या निकालासाठी उशीर होण्याची चिन्हं .
– मध्य प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग, गुरुग्रामच्या हॉटेलात मध्यरात्री ‘हाय व्होल्टेज ड्रामा’,ऑपरेशन लोटस सुरु असल्याची चर्चा .
– महिला टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना इंग्लंडसोबत, आतापर्यंत विश्वचषक गाजवलेल्या शेफाली वर्माच्या फलंदाजीकडं सर्वांचं लक्ष.
– ‘अगंबाई सासूबाई!’ नाशिकमध्ये ८०व्या वर्षी विवाह. ८० वर्षाचे नवरदेव निवृत्ती रुपवते आणि ६८ वयाच्या आजीबाईंचा अनोखा विवाह सोहळा नुकताच नाशिक जिल्हातील सिन्नर येथील हिवरे या गावी पार पडला. ऊर्वरीत आयुष्य वृद्धाश्रमात घालविण्याऐवजी या जोडप्याने लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला.
– निर्गुंतवणुकीसाठी तयार असलेल्या एअर इंडियाची १०० टक्के मालकी आता अनिवासी भारतीयांनाही घेता येणार. एअर इंडियाच्या संपूर्ण निर्गुंतवणुकीसाठी प्राथमिक निविदा प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत सरकार असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळाने ही मंजुरी दिल्यामुळे सरकारच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
४ मार्च
– मुंबई -अंबरनाथमध्ये डिपार्टमेंटल स्टोअरला लागली आग, पटेल आर मार्ट दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग, अग्निशमन दल वेळीच पोहोचल्यानं अनर्थ टळला.
– भारतात कोरोनाचा धोका वाढला .भारतात 6 जणांना कोरोना व्हायरसची लागण, उपाययोजनांसाठी आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची बैठक, कोरोनामुळे लष्कराचा युद्धाभ्यास रद्द होण्याची शक्यता., कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सहावर, प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारचे शर्थीचे प्रयत्न, नाशिकमध्ये आढळलेल्या दुसऱ्या संशयितावर उपचार सुरु .
– पोलिस व्हॅनसाठी फिरवा ११२ क्रमांक.राज्यात १०० नंबरप्रमाणे पोलिस इर्मजन्सी सर्व्हिससाठी नागरिकांकरिता ११२ नंबर. नागरिकांनी या नंबरवर संपर्क साधल्यावर पोलिसांची मोबाईल व्हॅन घटनास्थळी पोहचेल, गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंगळवारी विधानसभेत घोषणा.
– पुलवामा हल्ल्याप्रकरणी काश्मीरमधून बाप-लेकीला अटक.पुलवामा दहशतवादी हल्ल्याशीसंबंधित वडील आणि मुलीला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने अटक केलीय. पीर तारिक आणि इन्शा अशी त्यांची नावं आहेत. पीर आणि तारिक हे पुलवामा हल्ल्यातील कटाचे साक्षीदार आहेत
– मराठीजनांच्या दणक्यानंतर तारक मेहताच्या टीमकडून माफीनामा, मुंबईची भाषा हिंदी असल्याच्या संवादावरुन मालिकेवर चौफेर टीका
– मुस्लीम आरक्षणासंदर्भात शिवसेनेची भूमिका ठरलीच नाही, मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणामुळे सरकारमधले मतभेद चव्हाट्यावर, मंत्री नवाब मलिकांनी केली होती अध्यादेश काढण्याची घोषणा. मुस्लिम आरक्षणावरुन ठाकरे सरकारमध्ये दुमत.
– मुंबईत लवकरच होर्डिंग पॉलिसी, होर्डिंग्समुळे झालेल्या वृक्षतोडीवर आदित्य ठाकरेंची माहिती, औरंगाबादेत अवैध होर्डिंग्स काढण्याचे न्यायालयाचे आदेश.
– रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना लवकरच गणवेश, अन्न आणि मानके सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर, महिन्यातून प्रत्येक डेअरीची किमान एकदा तपासणी
– सारथी समितीच्या कामकाजात आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनियमितता, चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल .
-कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर, आतापर्यंत 7 लाखांहून अधिक कर्जखात्यात 4 हजार 807 कोटींची रक्कम जमा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती .
– माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, निवडणूक प्रतिज्ञापत्र प्रकरणी पुनर्विचार याचिका फेटाळली .
– जळगावात दहावीचा मराठीचा पेपर फुटला, परीक्षेत कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट, यवतमाळमध्ये भिंतीवर चढून कॉपी देण्यासाठी धडपड तर बीडमध्ये कॉपी पुरवण्यासाठी जीव धोक्यात .
– एसटी बस आणि स्थानकातील साफसफाई बंद, वेतन थकल्यानं कर्मचाऱ्यांचं कामबंद, राज्य परिवहन महामंडळानं पैसे थकवल्याचा ब्रीक्स कंपनीचा दावा .
– सोशल मीडिया सोडण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ट्वीटचा सस्पेन्स संपला, रविवारी महिला सांभाळणार पंतप्रधानांचे सोशल मीडिया अकाऊंटस, महिला दिनानिमित्त घोषणा देशभरातून महिलांचे अर्ज मागवले .
– दिल्ली हिंसाचार प्रकरणातील फायरिंग करणारा आरोपी शाहरुखच्या मुसक्या आवळल्या, आतापर्यंत हजाराहून अधिक लोकांना अटक .