स्फूर्तीगीते

‘वन्दे मातरम् ।’ हे हिंदुस्थानचे ‘राष्ट्रीय गीत’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यातील ‘वन्दे मातरम्’ या दोन शब्दांना, तर फारच महत्त्व लाभले आहे. कित्येक राष्ट्रभक्तांना न्यायालयात मोठमोठ्या शिक्षा ऐकतांना, कित्येक क्रांतीकारकांना हसत हसत फासाचा दोर गळ्यात अडकवून घेतांना या दोन शब्दांचीच आठवण झाली आहे. बंकिमचंद्रांनी ‘वन्दे मातरम् ।’ हे गीत ७ नोव्हेंबर १८७५ या दिवशी लिहिले. ही तिथी होती कार्तिक शुक्ल नवमी ! या दिनानिमित्त ‘वन्दे मातरम् ।’ची स्तुती करणारे पुढील गीत देत आहोत.

वंद्य ‘वन्दे मातरम् ।’

वेदमंत्रांहून आम्हा वंद्य ‘वन्दे मातरम्’ !
माउलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती
त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती
आहुतींनी सिद्ध केला मंत्र ‘वन्दे मातरम्’ !
याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले
शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले
शस्त्रहीना एक लाभे शस्त्र ‘वन्दे मातरम्’ !
निर्मिला हा मंत्र ज्यांनी, आचरीला झुंजुनी
ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाउनी
गा तयांच्या आरतीचे गीत ‘वन्दे मातरम्’ !

– ग.दि. माडगूळकर

शिवराज्याभिषेकदिनाच्या  निमित्ताने पोवाडा !

धन्य धन्य दिवस तो झाला
रोहिड्याच्या डोंगरावर
जमले रणधीर
करण्या निर्धार
बेडी हिंदूंची दूर करण्याला
धन्य धन्य दिवस तो झाला ऽ ऽ
धन्य तो मेळा
अजरामर झाला जी ऽऽ जी ऽऽ
गुरु कोंडदेव दादाजी बालशिवाजी नरसबाबाजी
मावळे जमविले कैक त्या वेळा ऽ
सांभाच्या देवळामधी
आणिला काय विधी वेळी अशी कधी
सुदिन तो झाला जी ऽऽ जी ऽऽ
रोहिडेश सांब साक्षीला ठेवून त्या वेळा
मध्यरात्रीला बोलला शिवबाळ सार्‍या लोकाला
का आपण जमलो या वेळा आजच्या स्थळा
सांगतो तुम्हांला जी ऽऽ जी ऽऽ
अरं घरदार लुटलं चोरानं हैराण झालो जुलमानं
हरघडी गायीची मान किती तुटती नाही त्या (प्र)माण
जर राखलं नाही गायीला धिक्कार आपल्या जगण्याला
जर राखलं नाही धर्माला थू थू रं तुमच्या जगण्याला
हिंदवी स्वराज्य करण्याचा आज आम्ही निश्चय केला
काय भिताय आपल्या मरणाला
आज नाही उद्या तर घाऽव मरणाचा आला जी ऽऽ जी ऽऽ
काय भिताय तुम्ही तुरुंगाला
देश सारा तुरंगच झाला
नरक बुजबुजला जी ऽऽ जी ऽऽ
नरकातले कीडे नरकात करती मौजेला
काय तुम्ही तसले हो झाला ?
छे माणूस म्हणती तुम्हाला ?
सांभाच्या शिवरपिंडीला पिंडीभवती जमला मावळा
शिवराज बोलू लागला पिंडीवरती ठेवलं हाताला
कट्यारीनं त्याच वेळेला भोसकलं आपल्या हाताला
रक्ताच्या धारेनं शिवशंकर भिजवला जी ऽऽ जी ऽऽ
रक्ताच्या धारेनं महादेव भिजवला जी ऽऽ जी ऽऽ
धन्य धन्य रोहिडा धन्य दिवस तो झाला
धन्य धन्य तो झाला जी ऽऽ जी ऽऽ
छत्रपती शिवाजी महाराज की जय !

– राष्ट्रीय कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळे

राष्ट्रगीत
https://www.youtube.com/watch?v=kCiviB9BDVk#action=share

जन गण मन अधिनायक जय हे
भारत भाग्यविधाता
पंजाब सिन्धु गुजरात मराठा
द्राविड़ उत्कल बंगा
विन्ध्य हिमाचल यमुना गंगा
उच्छल जलधि तरंगा
तव शुभ नामे जागे
तव शुभ आशीष मांगे
गाहे तव जयगाथा
जन गण मंगलदायक जय हे
भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे
जय जय जय जय हे!

वेडात मराठे वीर दौडले सात
https://www.youtube.com/watch?v=OArezYEKog0#action=share

म्यानातुन उसळे तरवारीची पात…वेडात मराठे वीर दौडले
म्यानातुन उसळे तरवारीची पात…वेडात मराठे वीर दौडले सात… ॥धृ.॥
ते फ़िरता बाजुस डोळे…किन्चित ओले…
सरदार सहा सरसवुनी उठले शेले
रिकबित टाकले पाय…झेलले भाले
उसळित धुळिचे मेघ सात निमिषात… ॥१॥
आश्चर्यमुग्ध टाकुन मागुती सेना
अपमान् बुजविण्या सात अरपुनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात… ॥२॥
खालुन आग, वर आग ,आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी,
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात… ॥३॥
दगडावर दिसतील अजुनि तेथल्या टाचा
ओढ्यात तरन्गे अजुनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणी वारयावर गात ॥४॥
म्यानातुन उसळे तरवारीची पात…वेडात मराठे वीर दौडले सात…

जय जय महाराष्ट्र माझा …

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा … ॥१॥
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ॥२॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥३॥

हिंदु नृसिंह
https://www.youtube.com/watch?v=3dk1O96d-48#action=share

हे हिंदुशक्ती-संभूत-दीप्ततम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदु-सौभाग्य-भूतिच्या-साजा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ।।
करी हिंदुराष्ट्र हे तूंते । वंदना
करी अंतःकरण तुज अभि-नंदना
तव चरणीं भक्ती च्या चर्ची चंदना
गूढाशा पुरवी त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा ।।
हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा भग्न आज जयदुर्ग आंसवांमाजी
ही भवानीची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनी भवानी दे न कुणा आधारा
गड कोट जंजिरे सारे । भंगले
जाहलीं राजधान्यांची । जंगलें
परदास्य-पराभवीं सारीं । मंगलें
या जगतीं जगू हीं आज गमतसें लज्जा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ।।
जी शुद्धी हृदाची रामदासशीर डुलवी
जी बुद्धी पांच शाहींस शत्रूच्या झुलवी
जी युक्ती कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ती बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्धी हेतुची कर्मी । राहू दे
ती बुद्धी भाबडया जीवां । लाहू दे
ती शक्ती शोणितामाजी । वाहू दे
दे पुन्हा मंत्र तो दिलें समर्थे तुज ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ।।
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ।।

– स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा !

बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवरि जेथील तिरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासी अटक गमे जेथ दु:सहा
प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सदभावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणईची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा
नग्न खड्ग करि, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले
भासति शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा
विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा
गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा

कवि – श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती
https://www.youtube.com/watch?v=k2JRdHKS-Zw#action=share

शूर अम्ही सरदार अम्हला काय कुणाची भीती ?
देव, देश अन्‌ धर्मापायी प्राण घेतलं हाती !
आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
तलवारीशी लगिन लागलं जडली येडी प्रीत
लाख संकटं झेलुन घेइल अशी पहाडी छाती !
झुंजावं वा कटुन मरावं हेच अम्हाला ठावं
लढुन मरावं मरुन जगावं हेच अम्हाला ठावं
देशापायी सारी इसरू माया ममता नाती !

हे राष्ट्र देवतांचे………

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावेa, हिमवंत पर्वताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नको निराशा, थोडया पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जन शासनातळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

– ग.दि. माडगुळकर

मराठी पाऊल पडते पुढे

मराठी पाऊल पडते पुढे…
खरा स्वधर्म हा आपुला
जरी का कठीणु जाहला
तरी हाचि अनुष्ठिला
भला देखे.
स्वराज्य तोरण…
स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाऊल पडते पुढे
मराठी पाऊल पडते पुढे llधृll
मायभवानी प्रसन्न झाली
सोनपावली घरास आली
आजच दसरा आज दिवाळी
चला सयांनो, अंगणी घालू
कुंकुमकेशर सडे,
मराठी पाऊल पडते पुढे,
मराठी पाऊल पडते पुढे. ll१ll
बच्चे आम्ही वीर उद्याचे
बाळमुठीला बळ वज्राचे
वारस होऊ अभिमन्यूचे
दूध आईचे तेज प्रवाही,
नसांतुनि सळसळे,
मराठी पाऊल पडते पुढे
मराठी पाऊल पडते पुढे ll२ll
स्वयें शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपुला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई
तदा संकटी देव धावून येई
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
शुभघडीला शुभमुहूर्ती
सनई सांगे शकुनवंती
शुभघडीला शुभमुहूर्ती…
जय भवानी…. जय भवानी…
जय भवानी, जय भवानी
दशदिशांना घुमत वाणी,
जय भवानी….
जयजयकारे दुमदुमवू हे सह्याद्रीचे कडे….