मटणाचं लोणचं

साहित्य:-

मटण पाव किलो
किसलेलं सुकं खोबरं 1 वाटी
कोल्हापुरी मसाला 4 चमचे
आलं लसूण 2 चमचे
मोहरीची डाळ 2 चमचा
हिंग पाव चमचा
लिंबाचा रस अर्धाी वाटी
गोडेतेल दीड वाटी
हळद 1 चमचा
मीठ चवीनुसार

कृती:-

मटण स्वच्छ धुऊन त्याला चमचाभर हळद, मीठ व चमचाभर आलं-लसणाची गोळी लावून शिजवून घ्यावं. त्याला सुटलेलं पाणी आटवावं. गार झाल्यावर हे मटण कढईत चुरचुरीत तळून घ्यावं. त्यानंतर हे ममटण लिंबाच्या रसात घाला. व त्यामध्ये मोहरी डाळ, अर्धा चमचा मीठ, कोल्हापुरी मसाला घालून वर उरलेलं तेल थंड करुन घाला व अर्धा चमचा हिंग सुद्धा घाला. थंड करुन फ्रीजमध्ये ठेवा.

खिमा पाव

साहित्य –

खिमा पाव किलो
हळद पाव चमचा
मीठ चवीनुसार
आलं-लसूण पेस्ट 2 चमचे
तेल अर्धी वाटी
कोल्हापुरी कांदा मसाला 1 चमचा
टोमॅटोचा रस पाव वाटी
चिरलेला कांदा अर्धी वाटी
गरम मसाला 1 चमचा
नारळाचे दूध 1 वाटी
काजू पेस्ट पाव वाटी
मटार पाव वाटी

कृती –

प्रथम खिमा धुवून त्याला हळद, मीठ लावून ठेवा. आलंलसूण लावा. कुकरमधे खिमा टाकून शिजवून घ्या. मोठया पातेल्यात अर्धी वाटी तेल टाकून गरत करा. त्यात कांदा टाकून लालसर करा. त्यात टोमॅटोचा रस टाकून शिजवून घ्या. शिजवलेला खिमा टाका. त्यात कोल्हापुरी कांदा मसाला, गरम मसाला, नारळाचे दुध, काजू पेस्ट, मटार टाका. 2-4 वाटया पाणी टाका. जरुर वाटल्यास तिखट टाका. रस्स्याला तवंग यायला पाहिजे. उकळी आल्यावर गॅस बंद करा. छोटया छोटया पावबरोबर खिमा रस्सा सव्र्ह करा.

अख्खा मसूर

साहित्य –

मसुर डाळ 1 वाटी
लसूण पेस्ट 1 चमचा
चिरेलला कांदा 1 वाटी
हळद पाव चमचा
कोल्हापुरी चटणी 2 चमचे
मीठ चवीनुसार
तमालपत्र 2-3 नग
कोथिंबीर 4 चमचे

कृती –

सालासकट असलेली मसुरीची डाळ रात्रभर भिजत ठेवा. दुसÚया दिवशी एका पातेल्यात आलं, लसूण पेस्ट परतून घ्या. त्यामधे भरपूर चिरलेला कांदा घालून छान परतून घ्या. थोडी हळद व कोल्हापुरी चटणी घालून भिजवलेला मसूरची डाळ घाला. चवीनुसार मीठ घालून छान शिजवून घ्या. शिजवतांना तमालपत्र घाला.

 कोल्हापुरी चिकन

साहित्य –

चिकनचे तुकडे अर्धा किलो
कांदे 2 नग
आलं 1 चमचा
लसूण 1 चमचा
हिरवी मिरची 2-3
कोथिंबीर 2 चमचे
नारळ 1 नग
लाल मिरच्या 2-2
धणे 1 चमचा
खसखस 1 चमचा
लवंग अर्धा चमचा
काळी मिरी अर्धा चमचा
दालचिनी पाव चमचा
हळद, तिखट, मीठ चवीनुसार

कृती –

2 कांदे बारीक चिरावे. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर वाटून घ्यावे. 1 नारळ खवून घ्यावा. एका फ्रायपॅनमध्ये थोडे तेल घालून त्यात नारळ, लाल मिरच्या, धने, खसखस टाकून खरपूस भाजावे. तसेच लवंग, मिरी, दालचिनी सुद्धा भाजून घ्या. ह्या सगळयाचे वाटण करावे. एका भांडयात तेल टाकून त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा, तो चांगला परतल्यावर ते वाटण केले आहे ते घालावे. त्याचप्रमाणे नारळाचे वाटण सुद्धा टाकावे. नंतर हळद, तिखट घालावे. वरुन अर्धा किलो चिकनचे तुकडे घालून चांगले परतावे. त्यावर झाकण ठेवून पाणी ठेवावे. चिकन मध्ये आधी पाणी घालून तये. झाकणावरचे पाणी चांगले गरम झाले की ते त्या चिकनमध्ये ओतावे. मंद गॅसवर चिकन शिजवून सव्र्ह करावे.

सोलापुरी काळे पोहे

साहित्य:-

काळी वांगी 2 वाटया
जाड पोहे दीड वाटया
बारीक चिरलेला कांदा 1 नग
आलं-लसूण पेस्ट 2 चमचे
गरम मसाला 1 चमचा
धने-जीरे पावडर 1-1 चमचा
कोथिंबीर पेस्ट अधी्र वाटी
लिंबू 1 नग
मीठ, साखर चवीनुसार
हळद पाव चमचा
तिखट चवीनुसार
खोबरे 4 चमचे

कृती:-

प्रथम कांदा, आलं-लसूण पेस्ट फोडणीला घालून चांगले परतून घ्या. नंतर यात हळद, तिखट, गरम मसाला, धने-जीरे पावडर, कोथिंबीर पेस्ट घालून वांगी घाला चवीनुसार मीठ, साखर, लिंबू घाला. वांगी शिजेस्तोवर बाजूला पोहे भाजून घ्या. सर्वात शेवटी यामध्ये पोहे मिसळून कोथिंबीर, खोबरे घालून सर्व्ह करावे.