मुंबई पर्यटन

अफगाण चर्च

सन 1883 आणि 1843 च्या सिंध आणि अफगाणमधील युध्दात धारातिर्थी पडलेल्या ब्रिटीश जवानांच्या स्मरणार्थ सन 1847 मध्ये बांधले असून त्या चर्चला सेंट जॉन्स चर्च म्हणूनही ओळखले जाते.

चैत्यभूमी

चैत्यभूमी ही दादर,मुंबई येथे असून राष्ट्रपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ बनविली आहे. दर वर्षी 6 डिसेंबर आणि 14 एप्रिल या दिवशी देशभरातून हजारो लोक या भारतीय घटनेच्या शिल्पकारास आदरांजली वाहण्यास येत असतात.

छत्रपती शिवाजी टर्मिनस (व्हिक्टोरिया टर्मिनस)

छ.शि.ट इमारत सुंदरतेचा नमुना असून आज जगामध्ये वास्तुशास्त्रीयदृष्टया एक सुंदर स्थानक म्हणून गणले गेले आहे.

सन 1888 मध्ये ब्रिटीशांनी बांधले असून व्यवस्थित बसविलेली तावदाने आणि भिंतीवरील नक्षीकामासमवेत तिच्या दर्शनी भागावर अत्युत्तम भुषणकला कोरण्यात आली आहे. फ्रेडरिक विल्यम्स स्टीवन्स या वास्तुशास्त्रकाराने या स्थानकाची रचना रु.16.14 लाख इतके शुल्क घेवून केली आणि ही इमारत पूर्ण होण्यास दहा वर्षे लागली.

छ.शि.ट.च्या कळसावर राणी व्हिकटोरियाचा पुतळा असल्यामुळे राणी व्हिक्टारिया राजवटीच्या स्मरणार्थ या स्थानकास ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ असे नाव देण्यात आले

मुंबईमध्ये येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी उपनगरीय तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडयाकरिता हे फार महत्वाचे स्थानक आहे. हे भारतातील एक सर्वात व्यस्त स्थानक असून येथे मध्य रेल्वेचे मुख्यालयही आहे.

चौपाटी समुद्रकिनारा

चौपाटी समुद्रकिनारामुंबईचे नागरिक आणि पर्यटक येथे वारंवार जात असल्यामुळे कदाचित चौपाटी समुद्रकिनार हा मुंबई शहरातील सर्वात प्रसिध्द समुद्रकिनारा आहे.मलबार टेकडीच्या पायथ्याशी तसेच मरीन ड्राईव्हचा शेवट या ठिकाणी स्थित असलेला हा समुद्रकिनारा मध्य मुंबईतील एकमेव समुद्रकिनारा आहे.तरुण जोडप्यांसून कुटुंबापर्यंत मजा लुटण्यासाठी येतात तसेच आपली सायंकाळची वेळ घालविण्यासाठी वरिष्ठ नागरिक येत असतात तसेच या चौपाटीवर शुध्द हवेमध्ये श्वास घेण्यासाठी येथे येणे प्रत्येकाला आवडते.

एलिफंटा लेणी

एलिफंटा लेणी मुबईमधील मुंबईच्या दुस-या किना-यावर वसलेली आहे. 1987 मध्ये युनेस्को जागतिक पुरातन वास्तु ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले. या ठिकाणी असंख्य स्थानिक आणि परकीय पर्यटक भेट देत असतात. पोर्तुगीजांनी या लेणीस घारापुरी ऐवजी एलिफंटा असे आधुनिक नाव दिले. एलिफंटातील त्रिमुर्ती शंकराचे तीन तोड ब्रम्ह, विष्णू आणि महेशाचे दर्शन घडविते. येथे अन्य शिल्प नटराज आणि सदाशिव यांच्या उठावांचे आणि अर्धनारीश्वराच्या भव्य नक्षीकामाचे दर्शन घडविते.

फ्लोरा फाऊंटन

फ्लोरा फाऊंटन जुन्या चर्चगेटच्या बॉम्बे फोर्टजवळ उभे असून आता तेथे मोठे रस्ते असून त्यास हुतात्मा चौक असे म्हटले जाते.

बाँम्बेचे माजी राज्यपाल सर बार्टले फ्रेर यांच्या सन्मानार्थ उभारण्यात आले असून नंतर ग्रीक देवता प-लोराचे नाव देण्यात आले.

गेटवे ऑफ इंडिया

भारताचे प्रवेशद्वार हे उल्लेखनीय चिरकालीन स्मारक असून त्याचीदेखील जॉर्ज विटेल यांनी रचना केली आहे.

सन 1911 मध्ये जॉर्ज राजे-पाच आणि राणी मेरी यांच्या भारतास भेट दिल्याच्या स्मरणार्थ बांधण्यात आले.

या भागामध्ये एलिफंटा बेट आणि बंदराच्या आसपासच्या अन्य समुद्रकिना-यांवर जाण्याकरिता बोट सेवादेखील आहे. त्याच्या मागील बाजूस सुंदर असे जुने आणि नवीन ताजमहाल हॉटेलची इमारत आहे.

हाजी अली

हाजी अली दर्गा वरळी भागाच्या मध्यभागी असून हे पवित्र स्थान मुस्लीमांचे संत जे मक्का येथे यात्रेस जात असताना मृत्युमुखी पडले त्यांच्या आठवणीस्मरणार्थ आहे. एक श्रध्दा अशी आहे की दागिन्यांचा लहान डबा तरंगत होता आणि तो या समुद्रामधील दगडांच्या बिछान्यावर आराम करण्यासाठी जेथे आला तेथेच किना-यापासून 500 वार लहान दगडी बेटावर भाविकांनी दर्गा बांधली. शहराच्या महालक्ष्मीच्या सीमेस अरुंद दगडी बांधाने हे बेट जोडते. हा दगडी मर्गास कुंपण नसून भरती असताना समुद्राच्या पाणी या बाधावर आपटते. म्हणून दर्ग्यामध्ये फक्त ओहोटी असेल तेव्हाच जाता येते. या दगडी मार्गावर चालताना दोन्ही बाजूने समुद्र हा सहलीच्या यात्रेचा विलोभणीय क्षण आहे.

जहांगीर कला दालन

काळाघोडा येथे प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाजवळ स्थित असून हे दालन मुंबईच्या कलाकारांकरिता समकालीन कला दाखविते.

पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून के.के. हेब्बर आणि होमी भाभा यांच्या इच्छेमुळे सर कवासजी जहांगीर यांनी स्थापना केली होती. ही अवाढव्य संस्था भारतीय कलेस पुनरुज्जीवन प्राप्त करून देवू शकते असा या ठिकाणाचा इतिहास.

जुहू किनारा

हा उपनगरीय समुद्रकिनारा मुंबईकरांचा सर्वात आवडता किनारा असून प्रत्येकास बरेच काही देते. मरीन ड्राइव्ह चौपाटीसारखेच जुहू चौपाटी येथे अनेक अन्नपदार्थांचे स्टॉल्स आहेत. हे ठिकाण लहान मुलांना आणण्यासाठी सुंदर आहे जेथे करमणूक उद्यान, खेळाचे मैदान आणि खुले उपहारगृह याची दुहेरी पर्वणी आहे. या किना-यात अपूर्व नजारा असा की येथे उंटावरील सफारी करावयास मिळते जे मजेदार आणि प्रसिध्द आहे.

कमला नेहरु उद्यान

मलबार टेकडीच्या पायथ्याशी वसले असून मुख्यतः बालकांसाठी असलेल्या उद्यानास भारताच्या प्रथम पंतप्रधानांच्या पत्निचे नाव देण्यात आले आहे .1952 मध्ये सुरु झालेले उद्यान मरीन ड्राईव्ह आणि चौपाटीचा चहूबाजूचा नजारा दाखवितो.

महालक्ष्मी मंदिर

भुलाभाई देसाई मार्गावर स्थित असलेले हे मुंबईतील सर्वात प्रसिध्द मंदिर संपत्तीची देवता महालक्ष्मीकरिता बांधले आहे. साधारण 1785 बांधलेले ह्या मंदिराचा इतिहास हॉर्नबाय वेलार्डच्या इमारतीशी संबंधित असण्याची शक्यता आहे. समुद्राच्या पाण्यापासून बचाव होण्यासाठी वेलार्डची भिंत बांधत असताना दोन वेळा भिंतीचा काही भाग कोसळला त्यावेळेस प्रमुख अभियंता पाठारे प्रभु यांना वरळीजवळील समुद्रामध्ये लक्ष्मीची मुर्तीचे स्वप्न पडले. शोध घेवून सापडल्यानंतर त्यांनी हे मंदिर बांधले. त्यानंतर वेलार्डचे काम कोणतीही अडचण न येता पूर्ण करता येवू शकले.

महात्मा ज्योतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट)

महात्मा ज्योतिबा फुले मंडई किंवा क्रॉफर्ड मार्केट हे नाव बाँम्बेचे पहिले आयुक्त आर्थर कॉफर्ड यांच्या नावावर ठेवण्यात आले.

शहराच्या उत्तरेकडील शेवटच्या जुन्या ब्रिटीश भागात स्थित असलेले मंडई त्याच्या उंच घड्याळ टॉवर आणि घुमटाने क्षितिजालाही घाबरविते. ही मंडई 1869 मध्ये पूर्ण झाली आणि सर कवासजी जहांगीर यांनी या शहरास ही भेट दिली. लॉकवुड किपलींग यांनी बाहेरील भिंत आणि दगडांचे कारंजे यांची रचना केली होती.

क्रॉफर्ड मार्केट हे 1996 पर्यंत घाऊक व्यापारी नगवीन मुंबई येथे जाईपर्यंत बाँम्बेमधील फळांचे मुख्य घाऊक बाजारपेठ होते.

मलबार टेकडी

मलबार टेकडी, अतिशय लहान टेकडीवर वाळकेश्वर मंदिर असून त्यांचे संस्थापक राजे सिलहारा होते. पोर्तुगीजांनी मंदिर उध्वस्त केले होते परंतु रामा कामत यांनी 1715 मध्ये ते पुन्हा बांधले. 50 मीटर(80 फूट) उंच मुंबईतील सर्वात उंच ठिकाण आहे.

मलबार टेकडी हे शहरातील जास्त गर्दीचा निवासी भाग असून उद्योग जगतातील आणि करमणूक क्षेत्रातील मोठया व्यक्तींची येथे निवासस्थाने आहेत.

राजभवन (राज्यपालांचे निवासस्थान) आणि वर्षा बंगला, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे अधिकृत निवासस्थानही येथे आहे.

मणी भवन

साधं आणि सुंदर संग्रहालय, महात्मा गांधीनी 1917 ते 1934 मुंबईस भेट दिली त्यावेळेस गांधीजी येथे राहत असत. मणीभवन येथे गांधीजींची खोली आणि ते वापरत असलेल्या वस्तुंसहित पुस्तके प्रदर्शनासाठी ठेवल्या असून हे संग्रहालय लेबरनम मार्ग, ऑगस्ट क्रांती मैदानाजवळ स्थित आहे.

सदर इमारत रविशंकर जगजीवन झवेरी आणि मणी कुटुंबाची होती जे योगायोगाने गांधींजींचे मित्र होते आणि मुंबईतील हया कालावधीमध्ये त्यांचा पाहुणचार करीत असत.

मणीभवनमधूनच गांधीजींनी असहकार,सत्याग्रह,स्वदेशी,खादी आणि खिलाफत चळवळींचा प्रारंभ केला होता.

सदर इमारत रविशंकर जगजीवन झवेरी आणि मणी कुटुंबाची होती जे योगायोगाने गांधींजींचे मित्र होते आणि मुंबईतील हया कालावधीमध्ये त्यांचा पाहुणचार करीत असत. मणीभवनमधूनच गांधीजींनी असहकार,सत्याग्रह,स्वदेशी,खादी आणि खिलाफत चळवळींचा प्रारंभ केला होता.

सदर इमारत 1955 मध्ये गांधी स्मारक निधीने गांधींजींचे स्मारक म्हणून परिरक्षणाकरिता ताब्यात घेतली होती.

मरीन ड्राईव्ह

मरीन ड्राईव्ह हे दक्षिण मुंबईतील किना-यालगत असलेल्या उलटया ‘सी’ आकाराच्या सहा मार्गाच्या कॉक्रीट रस्त्याने 3 कि.मी. इतक्या भागात विसतारले आहे. नरीमन पॉईट ते मलबार हिल असा जोडणारा मरनि ड्राईव्ह पश्चिम-दक्षिण-पश्चिम बाजूने दलदलीच्या जमीनीवर बांधण्यात आला आहे.

मरीन ड्राईव्हचे (नेताजी सुभाषचंद्र मार्ग म्हणूनही ओळखले जाते) मुख्य आकर्षण म्हणजे पाने असलेली ताडाची झाडे एका ओळीने असल्यामुळे मोहून टाकतात. एका बाजूला सन 1920 आणि 1930 मध्ये बांधलेल्या डेको कलेच्या इमारतींचा नमुना आणि दुसरीकडे अरबी समुद्र यामुळे रस्त्यास वास्तुशिल्पाची जोड येते. मरीन ड्राईव्ह हे मुंबई मॅरेथॉन, लडाऊ विमानांचा हवाई कार्यक्रम यासहित अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. या ठिकाणाला रात्रीच्या रस्त्यावरील दिवे हि-यांचा हाराप्रमाणे दिसतो यामुळे यास ‘क्वीन्स नेकलेस’ म्हणूनही ओळखले जाते.

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट

पूर्वीचे विज्ञान संस्थेचे कवासजी जहांगीर सभागृहाचे चांगल्या भारतीय समकालीन कला प्रदर्शित करता यावे यासाठी चार मजली प्रदर्शन सभागृहात रुपांतरीत करण्यात आले

नेहरु तारांगण

लंबवर्तुळाकार नेहरु केंद्राची उंच कणसाच्या बुरखुंडासारखी दिसणारी इमारत महालक्ष्मीच्या उत्तरेकडे दिसते. येथे तारांगणात प्रचार केंद्र आणि संगीत जलसा-नि-चित्रपट सभागृह आहे. हे तारांगण पृथ्वीवरुन कोणत्याही ठिकाणाहून भूत, वर्तमान वा भविष्यामधील कोणत्याही वेळी आकाशाचे प्रतिबिंब दर्शविते.

नेहरु शास्त्रीय केंद्र

नेहरु शास्त्रीय केंद्र हे साठच्या दशकामध्ये प्रथम शास्त्रीय व तंत्रज्ञान संग्रहालय म्हणून नावारुपास आले त्यानंतर 8 एकरवर पसरलेल्या शास्त्रीय पार्क जीवनाच्या मालमत्तांसंबंधीत, रेल्वे इंजिन, ट्रामगाडया, अतिजलद विमान आणि वाफेवरील लॉरी यासारख्या गोष्टींचे प्रदर्शन समाविष्ट असलेले भारतातील सर्वात मोठे क्रीयाशील शास्त्रीय केंद्र आहे.

प्रीन्स ऑफ वेल्स संग्रहालय

व्हिक्टोरियन वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना असलेले प्रीन्स ऑफ वेल्स संग्रहालय हे राजे जॉर्ज-पाचवे मुंबई भेटीस आले त्याचया स्मरणार्थ बांधण्यात आले होते. त्याची संकल्पना जॉर्ज विटेट यांनी केली होती आणि ते सन 1923 मध्ये पूर्ण करण्यात आले.

हे भारतातील खरोखरच उत्तम संग्रहालय असून त्यामध्ये भारतातील प्राचीन संस्कृसहित विविध युगातील धनसंग्रह, सत्यकला, रंगीत चित्र आणि शिल्प येथे आहेत.

सिध्दीविनायक मंदिर

प्रभादेवी येथे स्थित असलेले हे गणपती देवाच्या स्मरणार्थ प्रमुख मंदिर असून 200 वर्षापूर्वीच्या जुन्या मंदिराच्या जागेवर पुनर्बांधणी करण्यात आली आहे. काळया दगडाने बांधलेल्या या मंदिरात गणपतीच्या दोन मूर्ती असून अर्धा फूट उंच आणि दोन फूट रुंद आहे.

या मूर्तीचे अपूर्व वैशिष्टये असे की त्याची सोंड जव्या बाजूस वळली असून गणपतीच्या मूर्तीमध्ये सहसा आढळत नाही. दर्शन व पूजेचा महत्वाचा वार मंगळवार असतो परंतु या मंदिरामध्ये दरदिवशी हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात.

तारापोरवाला मत्सालय

तारापोरवाला मत्सालय हे शहरातील एकमेव मत्सालय आहे. सन 1951 मध्ये बांधकाम झालेल्या या वास्तुस एकूण रु. 8,00,000/- इतका खर्च आला. यामध्ये समुद्र आणि तलावातील पाण्यातील मासे पहावयास मिळतात. हे मत्सालय प्रसिध्द मरीन ड्राईव्ह येथे स्थित आहे. येथे लक्षद्वीप बेटामधून आणलेले सात प्रकारचे प्रवाळ माशांसहित समुद्र आणि गोडया पाण्याच्या माशांच्या 100 प्रजाती आहेत. येथील आकर्षणामध्ये शार्क, कासव आणि मो-या यांचा समावेश आहे.

फोर्ट भागातील व्हिक्टोरियन इमारती

फाऊंटन वा फोर्ट भागामधील पाहण्यासारख्या अन्य इमारती म्हणजे भव्य राजाभाई टॉवर, मुंबई उच्च न्यायालय, जुने सचिवालय आणि एका शेवटच्या भागात शास्त्रीय संस्था यासहित मुंबई विद्यापीठ इमारत.

त्याजवळ सेंट थॉमस कॅथेड्रल, दि एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे वा टाऊन हॉल, पोलिस महासंचालकांचे कार्यालय, मुख्य पोस्ट कार्यालय आणि थॉमय कुक इमारत स्थित आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्यालयही चर्चगेट स्थानकापासून जवळपास समोरील पदपथावर आहे. ही इमारत म्हणजे गोठीक आणि इंडो-सेरासेनिक शैलीचा उत्तम नमुना आहे.

बहुसंख्य इमारतीत रात्रीवी रोषणाई असते. ही ठिकाणे पाहण्यासाठी एमटीडीसीची छतविरहीत बस वा घोडागाडी वा बग्गीमधून आस्वाद घेणे विलक्षण अनुभव असतो. प-लोरा फाऊंटन जवळ असलेले काळा घोडा येथे नोव्हेंबर पासून जानेवारी पर्यंत आठवडयातून एकदा (प्रत्येक रविवारी) जत्रा असते.

मुंबईतील प्राणीसंग्रहालय

प्राणीसंग्रहालय आणि उद्यान मुंबईच्या मध्यभागी भायखळा येथे स्थित असून त्यास राणी जिजाबाई उद्यान किंवा राणीबाग म्हणून ओळखले जाते. मुलतः व्हिक्टारिया उद्यान म्हणून संबोधले जाणारे सन 1861 मध्ये बनविले गेले होते. उद्यानामध्ये व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयही स्थित असून औद्योगिक आणि शेतीच्या उद्देशाकरिता बनविले होते.

सिद्धिविनायक मंदिर दादर

दादर स्टेशन वरुन पायी 10 ते 15 जाऊ शकतो. तर शेअर टॅक्सी व बस ही उपलब्ध आहेत.
मुंबईतील प्रसिध्द असणारे सिध्दीविनायक हे मंदिर सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वीचे असल्याचा उल्लेख धार्मिक ग्रंथात सापडतो. लक्ष्मण विठू पाटिल आणि देऊबाई पाटिल यांनी हे मंदिर इ. स. 1801 मध्ये 19 नोव्हेंबर रोजी बांधल्याचे मुंबईतील देवालये या के. रघुनाथजी यांच्या ग्रंथात आढळतो

महालक्ष्मी मंदिर मुंबई

Shree Mahalakshmi Temple Charities, Bhulabhai Desai Road, Mahalaxmi, Mumbai – 400011
महालक्ष्मी मंदिर हे मुंबईतील प्रसिध्द मंदिर आहे. इ स 1831 ला धाक जी दादाजी नावाच्या एका हिंदू व्यापाऱ्याने या मंदिर पूर्ननिर्माण केले. या मंदिरामागे बराच मोठा इतिहास आहे तो म्हणजे 1785 साली वरळी आणि मलबार हिल या दोन्ही भागांना जोडण्याचे काम इंग्रज इंजिनियर करत होते

धाकलेश्वर मंदिर

Near Shaikh Memon Street, Mumbadevi Road, Zaveri Bazar-Kalbadevi, Mumbai – 400002
A long flight of steps on the rim of the Arabian Sea takes one to the revered shrine of Mahalakshmi. Sited on the northern side of Malabar hills, at B. Desai Road in Breach Candy, Mahalaxmi is one of the most-visited shrines in Bombay.

Haji Ali Dargah,Mumbai

Above Kinara Masjid, Lala Lajpatrai Marg, Haji Ali, Mumbai – 400026
सिनेतारकापासून ते सर्वसामान्यपर्यंत सर्वांनाच भक्तीभावाने नतमस्तक करायला लावणारे हे ठिकाण म्हणजे मुंबईतील हाजी अली दर्गा…१४३१ साली बांधण्यात आलेली १०० वर्ष जुनी असलेली हि दर्गा हाजी अली या सुफी संताच्या स्मृतीप्रीत्यर्थ हि वास्तू बांधण्यात  आली आहे
ADI SHANKARA TEMPLE s

 मुंबादेवी मंदिर

मुंबईची ग्रामदेवता म्हणजेच ‘मुंबादेवी’च्या नावाने मुंबापुरीला ‘मुंबई’ नाव मिळाले. आज ज्या ठिकाणी सीएसटी स्थानक उभे आहे, त्या ठिकाणी मुंबादेवी मातेचे मंदिर एका कुटी स्वरूपात होते. मात्र 1737 साली रेल्वेच्याप्रस्तावामुळे झवेरी बाजार या ठिकाणी तिची पुनर्स्थापना करण्यात आली. इथल्या मूळ नागरिकांची, म्हणजे कोळ्यांची ही देवी आहे
Babulnath Temple s

बाबुलनाथ मंदिर

Near Chowpatty Bandstand, 16, Babulnath Road, Grant Road, Mumbai – 400007
मुंबईतील अनेक शिवमंदिरांपैकी एक म्हणजे बाबुलनाथ मंदिर. मलबार हिल टेकडीवर वसलेले हे मंदिर खालून पहिले कि चटकन दिसत नाही. मंदिर अतिशय सुंदर व प्रत्येक खांब नक्षीकामाने भरलेला दिसून येतो. असे हे संगमरवरी मंदिर भोलेनाथाचे मंदिर नागर स्थापत्यशैलीचा नमुना समजले जाते.
Walkeshwar Jain Temple Mumbai s

वाळकेश्वर  मंदिर

Near Chowpatty Bandstand, 16, Babulnath Road, Grant Road, Mumbai – 400007
रामायणातही ज्या ठिकाणाचा उल्लेख आढळतो , असं हे पुराणकालीन शिवमंदिर. प्रभू रामचंद सीता व लक्ष्मणासह अयोध्येहून वनवासासाठी दक्षिणेकडे निघाले, तेव्हा त्यांनी काही काळ या परिसरात मुक्काम केला
Walkeshwar Jain Temple Mumbai s

वाळकेश्वर जैन  मंदिर

१९०४ साली बांधले गेलेले हे जैन मंदिर मुंबईतील प्रसिध्द जैन मंदिरांपैकी एक आहे. भगवान आदिश्वर उर्फ ऋषभदेव यांना समर्पित असलेल्या या मंदिरात हजारो जैन भाविक दर्शनासाठी येतात. अत्यंत भव्य अशा मंदिरात भगवान आदिनाथांच्या मूर्तीबरोबरच इतर तीर्थांकाराच्या मूर्ती व शास्त्रावचने चित्रस्वरूपात आहेत. बाहेरील बाजूस श्री. घंटाकरन महावीर यांचे मंदिर असून त्यांची आराधना केल्यावर सर्व प्रकारच्या अडचणींपासून संरक्षण मिळते असे म्हणतात.
Dhakleshwar Mahadeo Mandir s

धाकलेश्वर मंदिर

410-A, Near Mahalaxmi Temple, Bhulabhai Desai Road, Warden Road, Mumbai – 400026
Portuguese Church Dadar s

पोर्तुगीज चर्च दादर

S K Bole Road, Dadar West, Mumbai – 400028
मुंबईकरांसाठी पोर्तुगीज चर्च या नावाने प्रसिध्द असलेले चर्च म्हणजे अवर लेडी ऑफ सॅलवेशन चर्च. हे चर्च १९७० मध्ये आर्किटेक्ट चार्ल्स कोरेया याने बांधले होते. चर्चच्या गेट जवळचा क्रॉस हा जवळजवळ ३०० वर्ष जुना आहे. माहीम बेटांवर वसलेल्या इस्ट इंडियन समाजासाठी हे स्थळ कित्येक वर्ष प्राथनास्थळ म्हणून कार्यरत आहे.
Mount Mary Church s

बांद्रा माउंट मेरी चर्च

Mount Marys Road, Bandra West, Mumbai – 400050
बांद्रा पश्चिमेस असलेले माऊंट मेरी चर्च म्हणजे मुंबईतील सर्वात प्रसिध्द अशा प्रार्थना स्थळांपैकी एक होय. ह्या चर्चचं खरं नाव “बॅसेलिका ऑफ़ अवरलेडी ऑफ द माऊंट” असे आहे.हे चर्चजरी १०० वर्ष जुने असले तरी त्याला ३०० वर्ष जुना इतिहास आहे. साधारणतः ३०० वर्षांपूर्वी १७०० ते १७६० च्या दरम्यान मेरी मातेचा पुतळा समुद्रात सापडल्यापासून बांद्राफेअरला सुरुवार झाली.
Vazira Ganapati s

वझिरा  गणपती

Borivali ,Vazira Naka, Mumbai
मुंबईतील प्रमुख गणपती मंदिरांपैकी एक आणि मिनी प्रभादेवी म्हणून ओळखले जाणारे मंदिर म्हणजे वझिरा गणेश मंदिर. वझिरा कोलीवाड्याला लागून असलेले हे मंदिर स्वयंभू गणेश मंदिर आहे. ४० वर्षांपूर्वी खोदकामाच्या वेळी एका कामगाराला एका शिळेमध्ये गणपतीच्या सोंडेचा आकार दिसला. कालांतराने ती शिळा भराव टाकून तलावातून थोडी वर काढण्यात आली.
Global Vipassana Pagoda s

ग्लोबल विपश्श्यना पगोडा मुंबई

Global Pagoda Rd, Gorai, Maharashtra
नुकतेच काहि वर्षांपूर्वी बांधलेले किंबहूना अजूनही बांधकाम चालू असलेले मुंबईतील हे सर्वात नवखं आकर्षण आहे. याचे नावच असे आहे. बाहेरुन जरी हे मंदिर वाटत असलं तरी हे मंदिर नसून एक विपश्यना केंद्र आहे. येथे ध्यान धारणा शिकवली जाते, अर्थात आर्ट ऒफ लिव्हींग शिकवले जाते.फार वेगळ्य़ा पध्दतीने बांधण्यात आलेली ही वास्तू आहे
Velankanni church uttan s

वेलंकनी चर्च उत्तन

Uttan, Bhayandar
मदर मेरी वर जर तुमची आस्था असेल तर या चर्चला नक्की भेट द्या. उत्तन समुद्राकीनाऱ्यानजीक असलेला हे चर्च येथील स्थानिकांचे श्रद्धास्थान आहे. येथे केलेला नवस पूर्ण होतो असा त्यांचा विश्वास आहे. ख्रिस्ती बांधवांच्या प्रत्येक सणाला येथील स्थानिक या चर्चमध्ये एकत्र येतात आणि आपले सण साजरे करतात.
Vajreshwari Vasai s

वज्रेश्वरी वसई

Vajreshwari, Maharashtra
पुराणात या ठिकाणाचा वाडवली या नावाने उल्लेख केलेला आढळतो. इंद्रदेवाच्या वज्रातून विजेच्या रूपाने देवी पार्वती येथे प्रकट झाली होती. तेंव्हापासून या ठिकाणाला वज्रेश्वरी हे नाव पडले. अशी येथील लोकांची मान्यता आहे. येथून ५ किलोमीटरच्या परिसरात गरम पाण्याचे २१ कुंड आहेत. वसई व भिवंडी या दोन्ही ठिकाणापासून वजरेश्वरि हे ठिकाण जवळ आहे.
Tungareshwar Mandir Vasai s

तुंगारेश्वर मंदिर वसई

Vajreshwari, Maharashtra
तुंगारेश्वर पर्वताच्या कुशीत २१७७ फुटांवर वसलेले हे महादेवाचे मंदिर फार जुने व प्रसिद्ध आहे . वसई तालुक्यातलं हे ठिकाण येथील निसर्ग सौंदर्यामुळे , धबधब्यांमुळे पर्यटकांचं हिवाळा व पावसाल्यातलं खास आकर्षण बनल आहे. परशुरामाच येथे वास्तव्य होते. विमालासुर या राक्षसाने तपश्चर्येने शंकराला येथे येउन राहण्यास सांगितले व शंकराने दिलेल्या शिवलिंगाची स्थापना विमालासुर या राक्षसाने येथे केली अशी आख्यायिका आहे.
Jivdani Temple s

जीवदानी माता मंदिर विरार

Virar East, Jivdani Road, Virar East, Thane – 401305
सतराव्या शतकात म्हणजेच सुमारे ३५० वर्षांपूर्वी मुंबईपासून ६० किलोमीटर अंतरावर विरार येथे डोंगरावर जीवदान या किल्ल्याचा शोध लागला. तो पांडवांचा असल्याचे मानले जात होते.तेथील एका गुहेमध्ये जीवदानी आई जी आदिशक्तीचे स्वरूप आहे तिचा वास होता अशी मान्यता आहे. जीवदानी देवी हि ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे येथे रोज हजारो भाविक देवीचे दर्शन घ्यायला येतात.
St Andrew's Church Bandra s

सेंट माइकेल चर्च (माहीम) / St. Andrew’s Church Bandra Mumbai

115, Near Holy Family Hospital, Hill Road, Bandra West, Mumbai – 400050
सेंट माइकेल चर्च हे १६व्या शतकात बांधलेले मुंबईतील सर्वात जुन्या व महत्वाच्या चर्चपैकी एक आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. दर बुधवारी येथे प्रेयरसाठी विविध पंथाचे, धर्माचे लोक येतात. येथे इंग्रजी,हिंदी,मराठी,कोकणी,तमिळ इत्यादी भाषांमध्ये सेवा/ प्रार्थना होतात. चर्चच्या बाहेरील स्टॉलवर वेगवेगळ्या आकाराच्या मेणबत्त्या विकत मिळतात.
.
St Michaels Church s

सेंट अँड्रुज चर्च/ St. Michael’s Church,Mumbai

Near Mahim Bus Depot, Lady Jamshedji Road, Mahim, Mumbai – 400016
सेंट अँड्रुज चर्च हे मुंबईतील सर्वात जुन्या चर्चपैकी एक चर्च आहे. १५७५ मध्ये पोर्तुगीज मिशनरींच्या फादर मॅन्युअल गोम्स यांनी बांधले. चर्चचा क्रॉस हा एकाच दगडापासून बनवण्यात आला आहे. तो १८७० साली लावण्यात आला. २००३ साली या चर्चमधील वस्तूंना जसे फर्निचर, पेंटिंग्स आणि शिल्पे इत्यादी वस्तूंना ऐतिहासिक म्हणून घोषित करण्यात आले.
Iskon Temple s

Iskon Temple / Hare Rama Hare Krishna Temple

181, Hare Kirshna Land, Near Juhu Beach, Juhu, Mumbai – 400049
ISKCON Temple of Mumbai, dedicated to Lord Krishna, is one of the forty ISKCON temples across India. Built by the ISKCON Foundation, the elevated spire of this temple dominates the skyline of Juhu in Mumbai (erstwhile Bombay).
Back To Top

मुंबईतील संग्रहालये

Rani Jijamata Udyaan s

डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम

Veermata Jijabai Bhosale Udyan, Rani Bagh, Dr Ambedkar Road, Byculla, Mumbai – 400027
मुंबईतील आणखी एक भव्य वस्तूसंग्रहालय म्हणजे भायखळा येथील डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम. १५८ वर्ष जुने असलेले हे वस्तुसंग्रहालय जिजामाता उद्यानजवळ वसलेले आहे. मुंबईतील सर्वात जुने म्युझियम असल्याचा मन पटकावणाऱ्या या म्युझियममध्ये मुंबई विषयीचे विशेष दालन उभारण्यात आले आहे. मुंबईच्या सामाजिक व सांस्कृतिक इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक कलावस्तू व ग्रंथ  या संग्रालयात आहेत.
Prince- Wales Museum s

प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम / छत्रपति शिवाजी वस्तू संग्रहालय

159/61, Kala Ghoda, M G Road, Fountain, Mumbai – 400023
मुंबईतील सर्वात जुने आणि जवळपास ५० हजाराहून अधिक कलाकृतींचा संचय आणि अमर्याद माहितीचा खजिना म्हणजे मुंबईचे पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम आणि आताचे श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय. ब्रिटीश वास्तुविशारद डब्लू.जी.विटेट यांनी यांचा आराखडा तयार करून याची उभारणी केली असून स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे इ.स १९२२ मध्ये सर्वांना  पाहण्यासाठी खुले करण्यात आले.
Taraporewala Aquarium-- s

तारापोरवाला मत्स्यालय

Near Charni Road Railway Station, Netaji Subhash Road, Charni Road, Mumbai – 400004
मरीन ड्राईव्हला फेरफटका मारताना समोरच एक भव्य दिव्य इमारत दिसते ती म्हणजे मुंबई शहरातील एकमेव तारापोरवाला मत्स्यालय. सर्व बाजूने सागराने वेढलेल्या मुंबईला सागरी मत्स्यसंशोधन केंद्र असावे अशी संकल्पना प्रथम १९२३ साली बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेचे कार्यवाहक श्री.मिलार्ड यांनी मांडली. त्याचबरोबर समुद्राच्या आतील अद्भूतरम्य जग लोकांना पाहायला मिळावे, या हेतूने मरीन ड्राईव्हला ६० वर्षापूर्वी म्हणजे १९५१ साली बांधण्यात आलेले हे मत्स्यालय.
Neharu Planetarium s

नेहरू तारांगण

Opposite Nehru Centre Tower, Dr Annie Besant Road, Worli, Mumbai – 400018
 वरळीचं नेहरू तारांगण सर्वांचे आकर्षण. नेहरू तारांगण म्हणजे गोलाकार थीएटर. या गोलाकार थीएटरमधल्या प्रदर्शनात खुर्च्यांमध्ये निवांत झोपून आकाशदर्शन घेता येते. या तारांगणात चक्क आकाशातील तारे आणि ग्रह खाली येतात कि काय असे भासते. ग्रह-ताऱ्यांची ओळख व इतर अवकाशातील माहिती आणि त्या व्यतिरिक्त अंतराळ संशोधनाचे विविध टप्पेही या प्रदर्शनात मांडलेल्या असतात.
Neharu Science Center s

नेहरू सायन्स सेंटर

Dr E Moses Marg, Mumbai, Maharashtra
विविध वैज्ञानिक चमत्काराचा खजिना म्हणजे नेहरू विज्ञान केंद्र. केवळ शाळकरी मुलानांच नाही तर मोठ्या माणसांनाही माहित नसलेल्या कितीतरी वैज्ञानिक गोष्टी या केंद्रात पाहायला मिळतात. अगदी विजेचा शोध कोणी लावला इथपासून ते झाडावरचे फळ जमिनीवर का पडते असे अनेक प्रश्नाचे सोप्या भाषेत उत्तर मिळते.
.
Back To Top

 मुंबईतील समुद्रकिनारे

Marine Drive s

नरिमन पोईंट / मरीन ड्राईव / क्वीन्स नेकलेस

मुंबईचे “मैनहट्टन” म्हणून ओळ्खले जाणारे ठिकाण म्हणजे नरिमन पॉइण्ट ! नरिमन पॉइण्ट हे मुंबईतील मुख्य आणि देशातील पहिले केंद्रिय व्यापारी स्थळ आहे. या भागाला एक पारसी समाजसेवक खुर्शीद फ्रामजी नरिमन यांच्या नावावरून हे नाव दिले गेले.
Girgaon Chowpatty s

गिरगाव चौपाटी

Girgaon Chowpatty
मुंबईला भेट देण्यासाठी आला असल् तर मुंबईची पिकनिक या किना-याला भेट देण्याशिवाय पुर्णच होत नाही. नेहमी पर्यटकांची वर्दळ असलेला हा किनारा. मलबार हिलच्या टेकडीच्या पायथ्याशी तसेच मरीन ड्राईव्हचा शेवट या ठिकाणी स्थित असलेला हा समुद्रकिनारा मध्य मुंबईतील एकमेव समुद्रकिनारा आहे.
Worli Sea Face Mumbai s

वरळी सी-फेस / worli sea face

समुद्र आवडतो पण वाळू नाही आवडत, बीच वरचे वातावरण आवडते पण फेरीवाल्यांचा त्रास नाही आवडत. मग तुमच्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे वरळी सी-फेस. मरीन ड्राईव्ह सारखाच हा वरळी सी-फेस. पूर्ण समुद्रकिनार्यावर २ किलोमीटर लांबीचा लांबलचक कट्टा. अतिशय स्वच्छ आणि शांत ठिकाण एका बाजूला गगनचुंबी इमारतींचे दर्शन. दिवसभराचा शीण घालवण्यासाठी हे ठिकाण म्हणजे एखादी थेरेपीच म्हणावी लागेल.
Dadar Chowpatty s

दादर चौपाटी / Dadar Chowpatty

दादर शिवाजी पार्कच्या जवळ असलेला समुद्रकिनारा म्हणजे दादर चौपाटी. हा समुद्रकिनारा फक्त वॉकिंग आणि जॉगिंग साठी वापरला जातो. या ठिकाणी खाद्यपदार्थांचे आणि इतर स्टॉल देखील नाहीत . हा समुद्रकिनारा तितकासा मोठा नसला तरी खूप शांत आहे. इथला सूर्यास्त पाहण्यासारखा असतो. हे ठिकाण अजून पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द नसले तरी त्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी तिथे जायला हरकत नाही. तर मुंबईतल्या ह्या बीच ला देखील नक्की भेट द्या.
Bandra Bandstand s

बँड्रा  बँडस्टेंड / Bandra Bandstand

मुंबईतील कोणत्याही ठिकाणाहून दिसणार नाही इतका सुंदर सूर्यास्त आपल्याला बँडस्टॅंड येथून पाहायला मिळतो. एका बाजूला बांद्रा-वरळी सी लिंक आणि दुसऱ्या बाजूला बँडस्टॅंड असे अप्रतिम दृश्य आपल्याला बांद्रा फोर्ट वरून पहावयास मिळते. बँडस्टॅंड येथील शांततेत आणि थंडगार वाऱ्यामध्ये दिवसभराचा थकवा नाही विसरलात तर नवलच असेल. बांद्रा हे स्टेशन वर्दळीचे असले तरी बँडस्टॅंड वर्दळीपासून काहीसे लांब आणि शांत ठिकाणी आहे. संध्याकाळी हे ठिकाण एखाद्या उत्तम चित्रकाराने खूप वेळ खर्च करून चितारले आहे असे भासते. येथे येउन येथील शांत वातावरणात कुणीही रममाण होईल यावर मी पैज लावायला देखील तयार आहे.
..
Juhu Beach VileParle s

जुहु बीच विलेपार्ले मुंबई

Juhu Beach VileParle Mumbai
मुंबई उपनगरातील सुंदर आणि स्वच्छ असा हा समुद्रकिनारा आहे. मरीन ड्राइव्ह चौपाटीसारखेच जुहू चौपाटी येथे अनेक अन्नपदार्थचे स्टोल्स आहेत. हे ठिकाण लहान मुलांना आणण्यासाठी सुंदर आहे जेथे करमणूक, उद्यान, खेळाचे मैदान यांची दुहेरी पर्वणी आहे. मुंबईच्या प्रसिद्ध अन्नपदार्थांपैकी पाणीपुरी, पावभाजी आणि भेलपुरीचे मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत.

 

Gorai Beach Borivali s

गोराई बीच

Gorai Beach Borivali Mumbai
एका बाजूला नारळाची झाडे, दुसऱ्या बाजूला सूर्यास्त, लांबलचक समुद्रकिनारा, घोड्यावरून रपेट म्हणजे गोराई बीच. जुहु बीच नंतर मुंबई उपनगरातील हा प्रसिध्द बीच आहे. येथे येण्यासाठी बोरीवली स्टेशन वरून बस किंवा रिक्षाने गोराई खाडी पर्यंत यावे लागते.

 

no-image

मढ आयलंड  / Madh Irland Mumbai

Madh Irland Mumbai
मुंबईतील एके काळाचे खास आकर्षण असणारे हे ठिकाण आहे.मुंबईतील लोकवस्ती व गर्दी पासून दूर मालाड येथून हा समुद्रकिनारा जवळ आहे. हा समुद्रकिनारा तुम्हाला फार ओळखीचा वाटेल, कारण पूर्वीपासून या समुद्रकिनार्यावर बऱ्याच चित्रपटाचे चित्रीकरण या ठिकाणी झाले आहे.
 
no-image

मनोरी , मार्वे बीच Manori Beach Mumbai

मनोरी , मार्वे बीच Manori Beach Mumbai, Malad
मनोरी हे खरतर मुंबच उपनगर. पण त्याला मुंबईच्या शहरीकरणाची बाधा अद्याप झालेली नाही. एकच एक अरुंद डांबरी रस्ता आहे. त्याच्या आजूबाजूला वाड्यांच राज्य. दूरवर पसरलेला मानोरी बीच , त्यावर पहुडलेली व प्रेमाचा अनुभव घेणारी मुंबईची युगुल. थोड पुढे गेल की दूरवर गोराई बेत दिसत. त्याच्या टोकाशी उन्हात न्हाऊन चमकणारा विपश्यना संस्थेचा सोनेरी पागोडा दिसतो. रात्रीच्या अंधारात एस्सेलवर्ल्डची मनोरंजक नगरी दिव्याच्या रोषणाईत झळकते.

 

no-image

उत्तनचा समुद्रकिनारा भायंदर

Uttan Sea shore / Beach – Bhayandar
जुहू, गिरगांव समुद्रकिनार्‍यावरिल गर्दिला कंटाळला असाल तर तुम्हाला उत्तनच्या समुद्रकिनार्‍यावर येऊन नक्कीच ताजेतवाने वाटेल.भाईंदर स्टेशन पासून २० ते २५ मिनिटांच्या अंतरावर हा समुद्र किनारा आहे.शहराला लागूनच असलेला परंतू फारसा माहित नसलेला हा समुद्र किनारा अतिशय शांत आणि वेगळा आहे.
Arnala Beach Virar s

अर्नाळा बीच विरार

 Arnala , Virar
विरार स्थानकापासून ९ किमी अंतरावर वसलेले छोटास गाव म्हणजे अर्नाळा. मुंबई आणि वसई येथील लोकांची गर्दी असलेले प्रसिद्ध किनारा. पर्यटकांना आकर्षित करणारा हा किनारा वन डे पिकनिक साठी अत्यंत योग्य आहे. किनारावरील मोठ्या सुरु झाडांच्या सावलीतील आनंद अनुभवयाला पर्यटक येथे नक्कीच येतात.

 

Back To Top

मुंबईतील प्राचीन स्थळे

Gateway of India s

गेट वे ऑफ इंडिया

मुंबईतील वास्तुशिल्पाचा एक उत्तम नमुना म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. मुंबई शहराच्या सम्रुद्र किनाऱ्यालगत असलेली कमानवजा इमारत असून अपोलो बंदराच्या भागात असलेली २६ मीटर उंच वास्तू आहे. भारतभेटीला आलेल्या इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या स्वागतासाठी ब्रिटिशांच्या काळात या प्रवेशद्वाराची उभारणी करण्यात आली.
Taj Mahal Hotel s

ताज महाल हॉटेल

ताज महल हॉटेल हे मुंबई च्या कोलाबा भागातील गेट वे ओफ इंडिया समोरील एक अत्यंत मोहक आणि सुंदर पंचतारांकित होटेल आहे . तसेच आपल्या ऐतिहासिक महत्व आणि विशिष्ठ बांधकामामुळे मुंबईतील निवडक प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे . हे हॉटेल प्रसिद्ध औद्योगिक समूह टाटा ग्रुप च्या मालिकेचे आहे , जवळजवळ १०९ वर्ष जून्या ह्या हॉटेल ने जगभरातल्या अनेक दिग्गजाची सेवा केली आहे.
David Sasoon Library s

डेविड ससून लायब्ररी

David Sasoon Library
डेव्हिड ससून ग्रंथालय हे मुंबई शहरातील मोठे ग्रंथालय आहे. हे ग्रंथालय मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजे काला घोडा या ठिकाणाजवळ रॅम्पार्ट रो येथे एल्फिन्स्टन कॉलेज, वॉटसन्स होटेल आणि आरमारी तसेच सैन्यदलाच्या  मोठ्या इमारतीच्या जवळ आहे. १८४७ साली रॉयल मिंट व व गव्हर्न्मेंट डॉक यार्ड येथील कर्मचार्‍यांनी ज्ञानार्जनासाठी वाचनालय असावे म्हणून पुढाकार घेऊन खटपट केली. त्यातून ससून मेकॅनिक इन्स्टिट्यूट या संस्थेचा जन्म झाला.
Flora Fountain s

फ्लोरा फौंटन / हुतात्मा चौक

वीर नरीमन रोड आणि डी.एन. रोड यांच्या नाक्यावर उभ असलेल फ्लोरा फाउन्टन हे सुमारे २५ फुट उंचीच शिल्प. त्याच्या चारही बाजूला युरोपीय पुराणकथांमधल्या बायकांच्या मूर्ती आणि त्याच्या टोकावर फ्लोरा या रोमन देवीची पूर्णाकृती आहे. फ्लोरा ही फुलांची देवता , तिच्या पूजनाने धन , एश्वर्य व आनंद प्राप्त होतो अशी समजूत होती. या शिल्पातून पूर्वी अखंड कारंजी थुई थुई उडत असत. याच्या चौथऱ्याच्या बाजूला पायऱ्या होत्या. तिथे संध्याकाळी गोरे साहेब आपल्या माडमांना घेऊन बसायचे. शनिवारी रात्री हा परिसर माणसांनी फुलून जायचा.
General Post Office s

जनरल पोस्ट ओफिस / जी.पी.ओ.

Mumbai High Court s

मुंबई हायकोर्ट

१८७८ मध्ये तयार झालेली ही इमारत इंग्लिश गोथिक शैलीत बनली आहे. याचा मध्यभाग ५४.२ मीटर उंच आहे. याच्या शिरोभागी न्याय आणि दया यांच्या मूर्ती स्थापित आहेत.
Mumbai University s

मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ हे NAAC द्वारे पंचतारांकित श्रेणी प्राप्त एक प्रसिद्ध विद्यापीठ आहे. १८५७ साली स्थापना करण्यात आलेले हे विद्यापीठ भारतातील पहिल्या तीन विद्यपिठांपैकी म्हणजेच कलकत्ता विद्यापीठ मद्रास विद्यापीठ यांपैकी एक आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यंचा यात समावेश होतो. मुंबई विद्यापीठाद्वारे अनेक प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातात.
Rajabai Tower s

राजाबाई टॉवर

राजाबाई टॉवर हे मुंबईतील एक इमारत आहे. १४३ वर्ष जुनी प्रशस्त इमारत सर्व पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक स्वर्गीय प्रेमचंद रायचंद यांनी दिलेल्या निधीतून हि वस्तू उभारण्यात आली आहे. या टॉवरच्या बांधकामात बेनेटीयन आणि गोथिक या वास्तूकलेचा मिलाप आढळून येतो. याच्या बांधकामासाठी कुर्ला येथील खाणीतील फिक्या पिवळ्या रंगांच्या दगडांचा वापर केलेला आढळून येतो.
no-image

पश्चिम रेल्वे बिल्डींग

वेस्टर्न रेल्वे बिल्डींग मुंबईतील इमारत ग्रेट वेस्टर्न बिल्डींग म्हणुन ही ऒळखलि जाते.१७१५ साली हि इमारत बांधुन पूर्ण करण्यात आली.हि इमारत अनेक कामांसाठि वापरण्यात आली. एकेकाळी मुंबईचे गव्हर्नर असलेले विल्यम हॊर्नबे यांचे हे निवासस्थान होते. तसेच भारतीय लष्कराचे कमांडर इन चीफ़ यांचे निवासस्थान म्हणजेच “ऍडमिरल हाऊस” म्हणूनही हि इमारत वापरण्यात आली होती.

 

Churchgate Station s

चर्चगेट स्टेशन

चर्चगेट हे पश्चिम रेल्वे लाइन वरील एक उपनगरिय रेल्वे स्थानक आहे. हे दक्षिण मुंबईत वसले असुन त्याला चर्चगेट हे नाव चर्च गेट रोड ह्यावरुन पड्ले आहे. पूर्वी कोलाबा हे पश्चिम रेल्वे वरिल मुख्य स्थानक होते मात्र १९३१ नंतर चर्चगेट स्थानकाला हा मान मिळाला. पश्चिम रेल्वे चे मुख्यालय येथे आहे.

 

Asiatic Library s

टाऊन हॉल

Town Hall / Asiatic Library
 १८० वर्षे जुना व मुंबईतील अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक इतिहासाचा साक्ष देणारं सभागृह म्हणजे ‘टाऊन हॉल’. हर्निमल सर्कलसमोर दिमाखात उभी असलेली ही इमारत. या हॉलच्या पाय-यांची संख्या ३० असून समोरच्या भागात तुस्कान डोरिक पद्धतीचे ८ खांब आहेत. नियो क्लासिकल शैलीतील इमारत असून या इमारतीचे बांधकाम कर्नल कॉऊपर व कर्नल बॅडिग्टन यांनी केले आहे. हॉलमध्ये प्रवेश केल्यास मुख्य भाग दिसतो तो येथील सुंदर दरबार आहे.
B M C s

मुंबई महानगरपालिका बिल्डींग ,बी.एम.सी.कार्यालय

बोरीबंदर स्टेशनच्या समोर उभी असलेली मुंबई महानगर पालिकेची ही भव्य वास्तू आहे. ह्या इमारतीचे बांधकाम १८८३ ते १८९३ दरम्यान तेरा लाख रुपये खर्चून करण्यात आले. ह्या इमारतीवर भारतीय पशु, पक्षी, फुले आणि पाने ह्यांचे नक्षीकाम कोरलेले आहे. २३५ फुट उंचीच्या मनोऱ्यावर असलेला घुमट या भव्य इमारतीची शोभा द्विगुणीत करतो.

 

Chhatrapati Shivaji Terminals s

सी.एस.टी स्टेशन / छत्रपति शिवाजी टरमिनल्स

काही वर्षांपूर्वी याचे नावं व्हिक्टोरिया टर्मिनस हे होते. एकोणिसाव्या शतकातील शेवटच्या तीन वर्षांमध्ये मुंबईच्या वैभवात निरनिराळ्या नयनरम्य इमारतींची भर पडली. बोरीबंदर हे त्यातील सर्वोत्कृष्ट वास्तुशिल्प.ह्या इमारतीच्या कौशल्यपूर्ण आणि यथोचित अशा रचनेमुळे त्याचप्रमाणे नक्षीदार सुंदर कमानींमुळे ही इमारत एखाद्या भव्योदात्त चर्च सारखी दिसते.
no-image

Metro House

R
Maharashtra Police Headquarters s

Maharashtra Police Headquarters

Read More..
Nariman Point s

Nariman Point

Read More..
Oval Maidan s

Oval Maidan

Read More..
Mantralaya s

Mantralaya, Mumbai

Read More..
no-image

Azhad Maidan

Read More..
khotachi Wadi s

खोताची वाडी

पोर्तुगीज राजाने इंग्लंडच्या चार्ल्स दुसरा याला आपली मुलगी देताना हुंडा म्हणून मुंबई त्याला दिली. खोताची वाडी ही पोर्तुगीज शैलीत बनवलेल्या चर्च व बंगल्यांसाठी प्रसिध्द आहे. पोर्तुगीजांनी मुंबईतील पहिले शहरी स्वरुपात खोताची वाडी ही 1780 साली वसवलेली आहे आणि अजून ही ती तशीच आहेत. खोताच्या वाडीच्या आसपासचा भाग त्यात समाविष्ट करण्यात आला. खोताच्या वाडीतील बहुतेक घरे ही ख्रिच्शन व मुंबईतील मूळ रहिवासी म्हणजेच कोळ्यांची घरे आहेत.
Khada Parsi s

खडा पारसी

मुंबई शहराच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणाऱ्या अनेक वास्तू  आहेत त्यांपैकी एक प्रमुख व प्रसिद्ध वास्तू म्हणजे खडा पारसी. पारशी पेहरावातील उंच स्तंभवर उभारलेला हा पुतळा भायखलयाचे प्रतिक बनले आहे. पारशी समाजातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे शेट करसेटजी माणोकजी यांच्या स्मरणार्थ बेलासिस रोड, क्लेअर रोड, डंकन रोड आणि रिपन रोड या जंक्शनवर १८७५ मध्ये त्यांच्या मुलांनी खडा पारसी पुतळा उभारला.

 

Back To Top

मुंबईतील बागा आणि उद्याने

Sanjay Gandhi National park s

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली,वनराणी, नॅशनल पार्क बोरीवली

मुंबईतल्या प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. यालाच नॅशनल पार्क असे ही म्हणतात.१०४चौ.की.मी. परिसरात पसरलेले हे जंगल गेल्या ४० वर्षांपासून हौशी पर्यटकांचे मन तृप्त करत आहे. दरवर्षी जवळपास २० लाख पर्यटक येथे भेट देतात. या जंगलात वन्य प्राण्यांचा संचार असल्याने काही भागात पर्यटकांना जाण्यास बंदी आहे. येथे वाघ, सिंह, चित्ता, सांबर, माकड, सर्प यांसारखे वन्य प्राणी अजूनही आढळतात.
no-image

व्याघ्र निरीक्षण,नॅशनल पार्क बोरीवली

मुंबईतल्या प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. यालाच नॅशनल पार्क असे ही म्हणतात.
no-image

वनराणी,संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली

Hanging Garden s

फिरोजशहा मेहता उद्यान /  हँगिंग गार्डन

मुंबईच्या दक्षिण भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी १९ व्या शतकाच्या उतरार्धात मलबार हिलच्या उंच टेकडीवर पाण्याची टाकी बांधण्यात आली. तब्बल ३० दशलक्ष गॅलन पाणी मावेल इतकी मोठी टाकी उघडीच होती. त्यामधील पाणी गढूळ होण्याची शक्यता होती म्हणून या टाकीवर बगीचा करण्याच ठरले आणि १२५ वर्षाचा वारसा असलेल्या या गार्डन्सची स्थापना १८८० साली करण्यात आली. १९२१ साली बागेची डागडुजी करून त्याला मुंबईचे पहिले राजपुत्र फिरोजशहा मेहता यांचे नाव देण्यात आले.
Kamala Neharu Park s

म्हातारीचा बूट / कमला नेहरू पार्क

 मुंबईतील मलबार हिल येथील वसलेल्या हँगिंग गार्डन मधील बालकांपासून ते वृध्दांपर्यंतचे आवडते ठिकाण म्हणजे म्हातारीचं बूट. 20 फूट उंच असलेल्या या बूटांतून आपल्याला सा-या मुंबईचे दर्शन घडते.
Priyadarshani Park s

प्रियदर्शनी पार्क

मुंबईतील नेपिअन सी रोड लगत असणाऱ्या उंच उंच इमारती, समुद्रकिनारा व नारळाच्या झाडांच्या रांगेत असलेला विस्तीर्ण हिरवागार भूप्रदेश म्हणजे प्रियदर्शनी पार्क आणि स्पोर्ट्स कॉम्पलेक्स. २० एकर परिसरात वसलेले हे पार्क पीडीपी या नावाने ओळखले जाते.
no-image

आरे कॉलोनी  गोरेगाव

गोरेगाव म्हटले कि पहिला डोळ्यासमोर येते ती आरे कॉलनी १९४९ साली आरे कॉलनीची स्थापना झाली. येथे मुंबईतील सर्वात जुनी दुग्धशाळा आहे. जिचे उद्घाटन पं.जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. येथे दुध उत्पादन करून ते जवळच्या भागात स्वस्तात विकावे या हेतूने आरे डेरी ची स्थापना करण्यात आली होती
Chhota Kashmir s

छोटा काश्मीर गोरेगाव

गोरेगाव म्हटले कि पहिला डोळ्यासमोर येते ती आरे कॉलनी १९४९ साली आरे कॉलनीची स्थापना झाली. येथे मुंबईतील सर्वात जुनी दुग्धशाळा आहे. जिचे उद्घाटन पं.जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. येथे दुध उत्पादन करून ते जवळच्या भागात स्वस्तात विकावे या हेतूने आरे डेरी ची स्थापना करण्यात आली होती.
Powai lake Powai s

पवई लेक मुंबई

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबईतील तीन तलावांपैकी हा सर्वात प्रसिद्ध तलाव आणि मुंबईतील एक निसर्गरम्य ठिकाण. या तलावातून मुंबईतील काही भागात पानिपुर्रवठा केला जातो. तलावाच्या बाजूलाच जलशुद्धीकरण प्रकल्प आहे.हा राष्ट्रीय उद्यानाचाच एक भाग असल्यामुळे याच्या एका बाजूला हिरवीगार झाडे व एक टेकडी आहे.
Vihar Lake s

Vihar Lake and Gardens, Mumbai

Read More..
Hiranandani Gardens s

हिरानंदानी पार्क

हिरानंदानी येथे अनेक छोटे-मोठे पार्क आहेत. हिरानंदानी पार्क हे त्यापैकी एक मोठे पार्क आहे. चायना वँली हॉटेल च्या मागे हे पार्क आहे. योग्य देखरेखीखाली हे पार्क सांभाळले जात असल्यामुळे येथील साधेपणा अबाधित आहे. विस्तृत जागा, लहान मुलांसाठी वेगळे मैदान, जॉगिंग ट्रेंक यामुळे हे पार्क लोकांच्या आवडीचे ठरले आहे. आणि त्यात एन्ट्री फ्री असेल तर पाहायलाच नको. मग? देणार ना भेट?
no-image

Juhu Joggers Park

Joggers Park Bandra s

Joggers Park Bandra Mumbai

Read More..
Dadar Shivaji Park s

Dadar Shivaji Park Mumbai

Read More..
Joseph Baptista Garden s

Joseph Baptista Garden

Read More..
Mahalakshmi Racecourse s

Mahalakshmi Racecourse Mumbai racecourse

Read More..
Karnala Bird Century s

कर्नाळा  अभयारण्य

पनवेल पासून २२ किमी अंतरावर कर्नाळ्याच्या डोंगरांच्या भोवताली हे अभयारण्य आहे. हे ४६४ चौ क़िमि. च्या परिसरात पसरलेले आहे. येथे पक्षांच्या १५० च्या वर प्रजाती आढळतात . तसेच हिवाळ्यात ३७ प्रजाती येथे काही काळापुरते स्थलांतर करतात . त्याशिवाय आशय मिनिवेट , थ्री टोड किंगफिशर , मलबार त्रोगोन, असे पक्षीही क्वचित आढळून आले आहेत.
Back To Top

मुंबईतील लेणी व किल्ले

Kanheri Caves s

कान्हेरी लेणी

 Borivali National Park, Mumbai
अजिंठा,वेरुळसारख्या जगप्रसिध्द लेण्यामुंबईत बघायच्या असतील तर बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट ही द्यायलाच हवी.पहिल्या शतकात बौध्द साधूंनी कोरलेल्या कान्हेरीच्या लेण्या फारच मोहक आहेत. येथील शिल्प आणि त्यावरील कलाकुसर ही वाखाणण्या जोगी आहे
Mahakali Caves s

महाकाली गुंफा

 Mahakali, Andheri
महाकाली लेणी या कोंडीवटी या नावाने ओळखले जातात. या लेणी मुंबईतील आरे कॉलनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वसलेल्या आहेत. हि डोंगरावरील लेणी पूर्वेला पंधरा व पश्चिमेला चार अशी दोन भागात आहेत.
Jogeshwari caves s

जोगेश्वरी लेणी

 Jogeshwari Mumbai
Mandapeshwar Caves s

मंडपेश्वर लेणी दहिसर

 Dahisar , Mumbai
   मुंबईतील अनेक लेण्यापैकी एक सर्वात लहान लेणी म्हणजे बोरिवली-दहिसर जवळील मंडपेश्वर लेणी. कान्हेरी व महाकाली लेणी या बुद्धाच्या लेण्यांसाठी तर मंडपेश्वर लेणी खास करून शिव लेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या लेण्या सहाव्या शतकात कोरण्यात आल्या आहेत. लेण्यामध्ये प्रवेश केल्यावर समोरच्या बाजूने गुफांच्या वरच्या बाजूस पोर्तुगीजांच्या कालखंडात अस्तित्वात आलेल्या चर्चचे अवशेष पाहायला मिळतात.
Vasai Fort Vasai s

वसईचा किल्ला वसई

अरब सुलतानांनी हा किल्ला ई.स.१४०० मधे बांधला. या किल्यावर काही वर्ष राज्य केल्यानंतर पोर्तुगीजांसमोर त्यांना हार पत्करावी लागली. त्यानंतर १८ व्या शतकात चिमाजी अप्पा यांचे बंधु बाजीराव पेशवे यांनी पोर्तुगीजांकडून हस्तगत केला.
Bandra Fort s

Bandra Fort Mumbai

Read More..
Mahim Fort s

Mahim Fort Mumbai

Read More..
Back To Top

शॉपिंग इन मुंबई / मुंबईतील मार्केट्स

Crawford Market s

क्रॉफर्ड  मार्केट

मुंबईतील सर्वात मोठे मार्केट म्हणजे क्रॉफर्ड मार्केट. मुंबईचे पहिले आयुक्त आर्थर कॉफर्ड यांचे  नाव या मंडईस ठेवण्यात आले. स्वातंत्र्योत्तर  काळात या मार्केटचे नाव महात्मा फुले मंडई करण्यात आले. सन १८३५ ते १८६९ मध्ये बांधण्यात  आलेल्या या मंडईस त्यावेळी २० लाख रुपये खर्च आला असून मंडईच्या उभारणीसाठी कुर्ला खाणीतील तसेच गुजरातमधील पोरबंदर येथील टिकाऊ दगडांचा वापर करण्यात आला.
no-image

मनीष मार्केट

जर तुम्हाला सेल फोन किंवा कोणतीही इलेक्ट्रोनिक वस्तू, सेकंड ह्यांड मोबाईल किंवा चाइना मोबाईल खरेदी करावयाचा  असेल तर मनीष मार्केट तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. मरीन लाइन्स जवळ क्रोफ़र्ड मार्केट च्या शेजारी जे जे च्या पुलाखाली हे मार्केट वसलेले आहे. संपूर्ण मार्केट मध्ये केवळ फोन्स आणि इलेक्ट्रोनिक वस्तूच मिळतात .
Musafir Khana s

Musafir Khana Mumbai

Chor Bazar s

चोर बाजार

दक्षिण मुंबईत वसलेले भेंडी बाजार जवळील चोर बाजार हे जुन्या वस्तू मिळण्याचे ठिकाण आहे . मुळात याच नाव शोर बाजार असे आहे मात्र ब्रिटीशांच्या राजवटीत त्याचा उच्चार चोर बाजार असा होऊ लागला आणि तेव्हा पासूनच याला चोर बाजार या नावाने ओळखले जाते. पुढे चोरीचा माल या बाजारात येउन विकला जाऊ लागला.   जुन्या व पुरातन वस्तूंसाठी हे प्रसिद्ध आहे.
Colaba Causeway s

कोलाबा कोझवे मार्केट

मुंबईतील अजून एक प्रसिद्ध मार्केट म्हणजे कुलाबा कॉजवे मार्केट. रिगल थीएटरवरून सरळ खाली जाणारा अर्थात शहीद भगत सिंग मार्ग म्हणजेच कुलाबा कॉजवे मार्केट. रस्त्याच्या दुतर्फा मार्केट असून, एका बाजूला मोठ-मोठाले शोरूम व दुसऱ्या बाजूला स्टॉल्स असे या मार्केटचे स्वरूप आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ असलेले हे हाय प्रोफाइल मार्केट काहीसाठी स्टेटस सिंबॉलही असून ट्रेंडी आउटफिटपासून युवावर्गाच्या गरजेच्या सर्व वस्तू येथे उपलब्ध आहे.Read More..
Fashion Street s

Fashion Street Mumbai

Read More..
Bhuleshwar Market s

भुलेश्वर मार्केट

खरेदीसाठी परिचयाचा परिसर, तरीही तीन-चार फे-यापर्यंत हमखास गोंधळावणारा, हवी ती वस्तू हमखास मिळणारा आणि त्या वस्तू शोधताना गिर्हाइकाना भुलवून टाकणारा तसेच कोरीव कलाकुसरीने सजलेल्या जैन मंदिर व इतर मंदिराची गल्ली असणारा, असा दक्षिण मुंबईतील भुलवणारा परिसर म्हणजे भुलेश्वर. गिरगाव, काळबादेवी, सी.पी.टंक कुठूनही येथे शिरकाव करायला सुरुवात केली तरीही या ठिकाणी पोहचता येते.
Bandra Linking Road s

Bandra Linking Road Mumbai

Bandra Elco Market s

Bandra Elco Market

no-image

Lokhandwala Market Andheri

Dadar Flower Market s

Dadar Flower Market

Mangaldas Market s

Mangaldas Market

Gandhi Market s

गांधी मार्केट, Mumbai

Gandhi Market
मुंबईतील प्रसिद्ध मार्केटपैकी हे एक मार्केट. भारत स्वतंत्र झाल्यानंतर मुंबईत आलेल्या पंजाबी आणि सिंधी यांच्या उदरनिर्वाहासाठी हे मार्केट उभारण्यात आले. तेव्हा मार्केटमध्ये शिरलात कि पंजाबी आणि सिंधी व्यापारी या मार्केट मध्ये दिसतीलच. हार्बर लाईनवरील किंग सर्कल स्थानकावर उतरल्यावर लगेचच हे मार्केट सुरु होते.
Bhendi Bazar s

भेंडी बाजार, Mumbai

Bhendi Bazar
मुंबईतील एक अविभाज्य भाग व प्रसिद्ध मार्केट म्हणजे भेंडी बाजार. जे.जे हॉस्पिटल वरून समोर दिसतो व जो व्हीटीपर्यंतचा भाग म्हणजे भेंडी बाजार. महमद अली रोड, भुलेश्वर, खेतवाडी, नळबाजार, चोरबाजार, पायधुनी, डोंगरी, कुंभारवाडा या मधील जो भाग म्हणजे भेंडी बाजार. बाजाराच्या आवारात बोरी मुसलमानाची संख्या जास्त असून त्यांच्या प्रसिद्ध चुनाभट्टी व मिनारा मशीद याच आवरत पाहायला मिळतील.
no-image

Zaveri Bazar

Back To Top

Art Galleries and Theaters In Mumbai

Jahangir Art Gallery s

जहांगीर आर्ट गॅलेरी

वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत .कला प्रदर्शनी स्थळ. येथे निरनिराळी आर्ट एक्झीबिशंस असतात.
N C P A s

N.C.P.A. नेशनल सेंटर फॉर परफोर्मिंग आर्ट्स

हे कला केंद्र सर दोराबजी टाटा ट्रस्ट च्या ४० लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आले आहे, ८ जून १९६६ रोजी ह्याला कला संस्थेचा दर्जा देण्यात आला. १९ डिसेंबर १९६९ रोजी इंदिरा गांधी यांच्या हस्ते याचे उदघाटन करण्यात आले होते. पूर्वी भुलाबाई देसाई रोड वर असलेले हे छोटेसे केंद्र आता नरीमन पॉइण्ट येथे ८ एकर जागेत वसले आहे. NCPA ( नेशनल सेंटर फॉर परफोर्मिंग आर्ट्स ) मध्ये मुख्य ३ थिएटर्स आहेत.
no-image

Prithvi Theater VileParle Mumbai

Kala Ghoda Festival s

Kala Ghoda Festival

Back To Top

मुंबईतील खवय्येगिरी

Khau Gallies s

Khau Gallies in mumbai

Street Food s

Street Food of Mumbai

Back To Top

Amusement Parks In Mumbai

Essel World s

एस्सेल वर्ड मुंबई,Essel World Mumbai

एस्सेल वर्ल्ड हे मुंबईतले किंबहुना भारतातले सर्वात मोठे amusement park आहे. एक मोठाली जत्राच म्हणा ना..

वेगवेगळ्या राईड्सचा चित्तथरारक अनुभव घेण्यासाठी येथे रोज १०००० लोक भेट देतात. हे पार्क ६४ एकर परिसरात उभारलेले आहे जे १९८६ मध्ये सुरु करण्यात आले होते. येथे १०० पेक्षाही जास्त राईड्स आहेत. त्यापैकी ३४ राईड्स या अंगावर काटा आणणाऱ्या आहेत.

Water Kingdom s

वॉटर किंग्डम मुंबई , Water Kingdom Mumbai

हे एस्सेल वर्ल्ड प्रमाणेच व त्याला लागुनच असलेले भारतातील सर्वात मोठे वॉटर पार्क आहे. ज्यात छोट्या मोठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक वॉटर राइद्स आहेत. adventure amezonia हि अशीच एक ७ माजली उंच राईड आहे. ज्यातून तुम्ही तशी ४० च्या वेगाने वाकडे तिकडे होऊन धापकन पाण्यात आदळता. याशिवाय eliphant सफारी rock n roll, surfent safari अशा काळजाचा ठोका चुकविणाऱ्या वॉटर राइद्स आहेत.
no-image

टिकुजीनी वाडी

Tikuji Ni Wadi Fun Resort
मुंबईतील ठाणे जिल्ह्यातील मानपाडा चितळसार येथे हिरवळीत वसलेले हे मुंबईकरांचे आवडते अम्युसमेंट पार्क आहे. १९८३ साली वसलेले हे पार्क मुंबई शहरापासून ४० किमी अंतरावर वसलेलं आहे. या फन रिसोर्टमध्ये २० एकरामध्ये वॉटर पार्क असून बाकीच्या परिसरात अम्युसमेंट आणि रिसोर्ट आहे.Read 
Suraj Water Park s

सुरज वॉटर पार्क

 Suraj Water Park, Mumbai
सुरज वॉटर पार्क हे असे पार्क आहे कि त्यातील तयार केलेल्या लेण्या या लिम्का बुक मध्ये नोंद झाली आहे. मानवनिर्मित तयार केलेल्या या लेण्या एक सुंदर कलाकृतीचा नमुना आहे. फायबर आणि काच यांपासून तयार केलेल्या या लेण्या White Water West Industries of Canada यांनी तर केल्या आहेत.

CURTASY  –   http://www.mumbaipuneonline.com