मुंबई चित्रनगरी. भारतीय चित्रपट उद्योग हा जगातील एक सर्वात मोठा चित्रपट उद्योग असून भारतात निर्मिती होणाऱ्या चित्रपटांपैकी ६० टक्के वाटा मुंबई चित्रपट उद्योगाचा आहे. भारतातील मुंबईत गोरेगांव येथे एकत्रित कलागारे संकुल उभारण्यात आले आहे.यामध्ये काही ध्वनिमुद्नन कक्ष,बागबगीचे,तलाव,चित्रपटगृह,मैदान इ.चा समावेश असून याचा बॉलीवूड मधील अनेक चित्रपटांच्या निर्मितीसाठी उपयोग करून घेतला आहे.चित्रनगरीची स्थापना महाराष्ट्र राज्याने चित्रपट उद्योगास पायाभूत सुविधा व सवलती देण्यासाठी केली आहे.भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक श्री.दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ चित्रनगरीचे नामांकरण दादासाहेब फाळके चित्रनगरी असे करण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वेवरील बोरीवली या स्थानकापासून पूर्वेकडे सुमारे 9-10 कि.मी. अंतरावर असलेल्या विस्तीर्ण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडून या लेणीकडे जाण्याचा मार्ग आहे.ख्रिस्त पूर्व 200 वर्षे ते 6 व्या दशकापर्यंतच्या काळात या लेण्या कोरण्यात आले असाव्यात असे जाणकरांचा दावा आहे. बौध्द धर्माचा वाढता प्रभाव असताना या लेण्या कोरण्यात आल्या असून त्यातील काही कोरीव शिल्पे भव्य आणि सुंदर आहे. या ठिकाणी 109 बौध्द विहार असून या विहारातून साधना करण्याऱ्या भिक्षूसांठी भूमिगत पाण्याचे साठे खोदण्यात आले आहे. या लेण्यात कोरण्यात आलेली गौतम बुध्दांची शिल्पाकृती एक उत्कृष्ट कलाशिल्प म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे.
मुंबईमध्ये जुहु चौपाटी हा सर्वात लोकप्रिय समुद्रकिनारा आहे. सागरी किनारपट्टीवरील पठार किनाऱ्यावरील किनारा पासून 5 किमी अंतरावर पसरलेला आहे. पर्यटकांद्वारे वारंवार जुहु चौपाटीला भेट दिली जाते.जुहु चौपाटीवर संध्याकीळी गर्दी असते कारण पर्यटक सहसा ताजी हवा आणि आनंदाने समुद्र किनार्यावर चालण्यासाठी येतात.
पश्चिम रेल्वेवर अंधेरी रेल्वे स्थानकापासून 6 कि.मी. अंतरावरील लहान टेकडीवर ही लेणी कोरलेली आहे.बुद्ध काळात हे अभयारण्य एक प्रमुख धार्मिक केंद्र असले पाहिजे.गुहेत 19 विहारांचा समावेश आहे.शिव अनुयायांनी नंतर शिवालंगमची शिल्पं स्थापीत केली आहे.