पालघर जिल्हा पर्यटन

पालघर जिल्ह्याकडे पर्यटनाचा एक नवीन पर्याय म्हणून बघितले जात आहे. या शहराला निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्य बहाल केले आहे. पर्वत रांगा, धबधबे, तलाव, पुरातन वास्तुकला, नयनरम्य सनसेट पॉइण्टस, आणि रेखीव मंदिरे या सुंदर आणि शांत शहराला एक परफेक्ट डेस्टीनेशन बनवतात. पालघर जिल्हा उद्या १ ऑगस्ट रोजी आपला पहिला वर्धापन दिन साजरा करीत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती खास महान्यूजच्या वाचकांसाठी…. चला या पर्यटन स्थळांना एकदा अवश्य भेट देऊन या निसर्गाचा आनंद लुटुया…

दाभोसा आणि दादरकोपरा धबधबा

जव्हार पासून 18 कि. मी. वर तलासरी-सिल्व्हासा रोडवर हे सुंदर धबधबे आहेत. लेंडी नदीपासून वाहणारे पाणी डोगरांच्या दोन्ही बाजूने धबधब्याच्या रूपात खाली येते. दाभोसा हा मुख्य धबधबा असून उंची 300 फूट इतकी आहे. दादरकोपरा धबधबा हा उन्हाळ्यात कोरडा असतो म्हणून त्याला सुका धबधबा असेही म्हणतात. दोन्ही धबधबे हे सुमारे 600 फूट उंच डोंगरांनी वेढलेले आहेत. या भागात अनेक वनऔषधी वनस्पती आढळून येतात. फेब्रुवारी ते जुलै ही या धबधब्यास भेट देण्यासाठी आदर्श वेळ आहे.

शिर्पामाळ

3 शतकांपेक्षा ही जुने असे हे शिल्प शिवरायांच्या स्मरणार्थ बांधले गेले आहे. डोंगराच्या कडेवर असल्यामुळे शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी या भागाचा वापर केला जात असे. या भागातून संपूर्ण जव्हार शहरावर दृष्टीक्षेप टाकता येतो. सुरतच्या दिशेने कूच करताना शिवरायांनी याच भागत थांबून विश्रांती घेतली होती. जव्हारचे त्यावेळचे राजे पहिले विमशहा यांनी छत्रपतींना मानाचा शिरपेच देऊन जव्हारमध्ये स्वागत केले तेच हे ऐतिहासिक स्थळ. हिरव्यागार टेकडीवर फडकणाऱ्या भगव्याचे दृष्य अत्यंत सुंदर दिसते. जव्हारमध्ये अजून बरीच पर्यटन स्थळे आहे ज्यामध्ये दक्षिणमुखी मारूती मंदिर, वर्षभर सतत वाहणारा काळ मांडवी धबधबा, सुंदर आणि शांत खदखद तलाव, शिवरायांनी बांधलेला भोपाटगड किल्ला यांचा समावेश होतो.

जयविलास राजवाडा

जव्हारमधील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू असलेला हा वाडा ‘राज बरी’ या नावाने सुद्धा ओळखला जातो. राजे यशवंतराव मुकणे यांनी बांधलेला हा राजवाडा मुकणे घराण्याच्या राजाला राहण्यासाठी बांधला होता. येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी हा वाडा डोंगराच्या माथ्यावर बांधला आहे. आदिवासी संस्कृती दर्शवणारे कोरीवकाम, राजवाड्याची घुमटे आणि आजूबाजूला पसरलेले हिरवे जंगल ही या राजवाड्याची वैशिष्ट्ये आहेत. गुलाबी दगडातून तयार केलेल्या या अद्वितीय अशा वास्तुरचनेमुळे या वाड्याचा वापर अनेक फिल्म शूटस साठी केला गेला आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांपर्यंत हा राजवाडा पाहण्यासाठी खुला असतो. राजवाडा आतून पाहण्यासाठी माफक प्रवेश फी आकारली जाते.

हनुमान पॉइण्ट

शहराच्या मध्यवर्ती भागापासून सुमारे 1 कि. मी. अंतरावर एक हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे. या पॉइण्टला हनुमान पॉइण्ट असे म्हणतात. तिन्ही बाजूने वेढलेली खोल दरी, दाट जंगले, जवळच्या राजविलास राजवाड्याची प्राचीन घुमटे, दूरवर दिसणारा ऐतिहासिक शहापूर माहोलीचा किल्ला आणि मोकळे आकाश असे नयनरम्य दृष्य येथून दृष्टीस पडते. रात्रीच्यावेळी येथून दिसणारा, कसाऱ्याच्या घाटातून जाणऱ्या ट्रेनचा प्रकाश एक वेगळाच अनुभव देऊन जातो.

सनसेट पॉइण्ट

जव्हारचा अजून एक प्रसिद्ध पॉइण्ट म्हणजेच सनसेट पॉइण्ट आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून पश्चिमेला फक्त अर्धा किमी वर हा पॉइण्ट आहे. जोडप्यांचा लाडका असलेला हा पॉइण्ट सूर्यास्ताचे एक अप्रतिम दृष्य दाखवतो. येथून दिसणाऱ्या दरीचा आकार हा धनुष्यासारखा आहे म्हणून पूर्वी या भागाला ‘धनुकमळ’ असे म्हणत. येथून 60 कि. मी. दूर असलेल्या डहाणू जवळच्या महालक्ष्मी डोंगराचे सुंदर दृष्य दिसते. दरीमधल्या दाट गर्द झाडीवर पडणारी सूर्य किरणे पाहण्याचा अनुभव शब्दात वर्णन न करता येण्यासारखा आहे.

शिरगाव

शांतनिवांत सागरतीर, किनाऱ्यावरच शतकानुशतकांचा इतिहास सांगणारा दुर्ग आणि हिरव्यागार परिसराच्या कोंदणात वसलेलं शिरगाव हे मुंबई-ठाणेकरांसाठी एक निसर्गरम्य ठिकाण आहे. ठाणे जिल्ह्यातल्या पालघर तालुक्याला शांतनिवांत सागरतीर लाभला आहे. शिरगावचा किल्ला हा किनारी दुर्ग प्रकारातला असून तो पालघरच्या पश्चिमेला आहे. पालघरपासून 7 ते 8 कि.मी. अंतरावर शिरगावचा किल्ला आहे. शिरगावचा किल्ला पाहण्यासाठी आपल्याला प्रथम पालघरला पोहोचणं आवश्यक आहे. पोर्तुगीजांनी बांधलेल्या शिरगावच्या किल्ल्यावर छत्रपती संभाजीराजांनी इतर किल्ल्यांबरोबर हल्ला चढवला होता. पण तो त्यावेळी ताब्यात घेता आला नाही. पुढे चिमाजी आप्पांनी उत्तर कोकणाच्या मोहिमेत शिरगावचा किल्ला ताब्यात घेतला. गावाच्या मधोमधच किल्ला आहे. पोर्तुगीजकालीन वैशिष्ट्यपूर्ण बांधणी आणि मनोऱ्यामुळे किल्ला प्रथमदर्शनातच आकर्षून घेतो. पहिला दरवाजा पुर्वाभिमुख असून त्याच्या बाजूने ओवऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या पुढे दुसरा दरवाजा आहे. दरवाजावरील नक्षीकाम पाहण्यासारखं आहे. दोन्ही दरवाजांच्यामध्ये पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. दुसऱ्या दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्यामधील पडझड झालेल्या वास्तू दिसतात. किल्ल्याचा आकार फारसा मोठा नसल्याने गडफेरीला फार वेळ लागत नाही. तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. या पायऱ्यांवरून तटबंदीवर पोहोचल्यावर प्रवेशद्वाराच्या वर बांधलेल्या घुमटाकृती मनोऱ्यावर जाता येते. तटबंदीवरून किल्ल्याला फेरी मारता येते. पूर्वेकडील आयताकृती मनोऱ्यावरून शिरगावचं मनोवेधक दृष्य दिसतं. गडाचा आकार छोटा असल्याने बांधकामं आटोपशीर आणि कमी जागेत बसवलेली आढळून येतात. पश्चिमेकडील बुरूजावरून अथांग सागराचे रमणीय दृश्य दिसते. या बाजुच्या तटबंदीमधे एक चोर दरवाजाही आहे. किल्ल्यामधे असलेल्या ताडवृक्ष आणि त्यांच्या फांद्या सुंदर दिसतात.

कसं पोहोचाल?

मुंबई – अहमदाबाद महामार्गावरील मनोर येथून पालघरला रस्ता जातो. पालघर रेल्वे स्थानकही आहे. शटल- मेल, लोकलने पालघरला जाता येते. तिथून शिरगावला जाण्यासाठी एस.टीची सोय आहे. एस.टी. थांब्यापासून लगेच किल्ल्याजवळ पोहचू शकतो.

गारेश्वर मंदिर वसई

तुंगारेश्वर पर्वताच्या कुशीत 2177 फुटांवर वसलेले हे महादेवाचे मंदिर फार जुने व प्रसिद्ध आहे . वसई तालुक्यातलं हे ठिकाण येथील निसर्ग सौंदर्यामुळे , धबधब्यांमुळे पर्यटकांचं हिवाळा व पावसाळ्यातलं खास आकर्षण बनलं आहे. परशुरामाच येथे वास्तव्य होते. विमालासूर या राक्षसाने तपश्चर्येने शंकराला येथे येऊन राहण्यास सांगितले व शंकराने दिलेल्या शिवलिंगाची स्थापना विमालासूर या राक्षसाने येथे केली अशी आख्यायिका आहे. तुंगारेश्वर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग आहे. परंतु मुंबई पासून थोडसं लांब असलेलं हे ठिकाण कित्येक वर्षांपासून पर्यटकांचे मन रिझवत आहे. धबधब्याचा व थंडगार वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी या स्थळाला नक्की भेट द्या.

जीवदानी मंदिर

सतराव्या शतकात म्हणजेच सुमारे 350 वर्षांपूर्वी मुंबईपासून 60 किलोमीटर अंतरावर विरार येथे डोंगरावर जीवदान या किल्ल्याचा शोध लागला. तो पांडवांचा असल्याचे मानले जात होते. तेथील एका गुहेमध्ये जीवदानी आई जी आदिशक्तीचे स्वरूप आहे तिचा वास होता अशी मान्यता आहे. जीवदानी देवी ही 51 शक्तीपीठांपैकी एक आहे येथे रोज हजारो भाविक देवीचे दर्शन घ्यायला येतात. ही देवी नवसाला पावते असा या भाविकांचा विश्वास आहे. या मंदिराला 1500 पायऱ्या आहेत. पायऱ्या न चढता येणाऱ्यांसाठी रोप वे ची सोय देखील उपलब्ध करून दिलेली आहे. डोंगरावर पोहोचल्यावर थंड वातावरणात थकवा कुठच्या कुठे पळून जातो. तसेच शांत वातावरणात देवीची आराधनाही व्यवस्थित करता येते. नवरात्रीमध्ये तर हे मंदिर विशेष आकर्षण ठरते.

डहाणूचा किल्ला

सध्याच्या घडीला या किल्ल्यावर तहसलीदार कार्यालय थाटलेलं आहे. एकेकाळी या किल्ल्याचा उपयोग व्यापारासाठी मोठ्या प्रमाणावर केला जायचा. आजही त्या ठिकाणी त्याच्या काही खुणा दिसतात. किल्ल्याची रचना व मांडणी व्यापारदृष्ट्या पूरक आहे.

कसे पोहोचाल?

पश्चिम रेल्वेने डहाणू स्टेशन गाठायचं. तिथून बसने 15 मिनिटात किल्यावर पोहोचता येतं.

तारापूरचा किल्ला

या किल्ल्याची मांडणी पाहण्यासारखी आहे. खाडीलगत असलेल्या या किल्ल्याचा वापर मालमत्ता ठेवण्यासाठी केला जायचा. सध्या या किल्ल्याला कुलूप लावलेलं आहे. परंतु आत जाण्यास काही अडचण येत नाही. किल्ल्याच्या आतमध्ये गोड्या पाण्याच्या विहिरी आणि चिकू, नारळ यांच्या बागा पाहायला मिळतील. या किल्ल्याच्या तटबंदीतून शत्रूवर गोळीबार केला जायचा. आजही ते झरोके याठिकाणी पाहता येतील. तटबंदीवरून बिनदिक्कतपणे फिरता येईल इतका सुरक्षित हा किल्ला आहे.

कसे पोहोचाल?

बोईसर या रेल्वे स्थानकावर उतरून किंवा एसटी स्टॅण्डवर उतरून या किल्ल्याकडे जाता येते.

शिरगाव किल्ला

वेगळ्या प्रकारची माडाची बने या किल्ल्यात पाहता येतील. हेच या किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. सात पानं असलेली ही माडाची बनं इतरत्र कुठेही आढळत नाहीत. शिवाय किल्ल्याचे घुमटाकृती प्रवेशद्वार, आणि आतील रेखीव बांधकामही पाहण्यासारखे आहे. किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था नसल्याने आपल्याजवळ मुबलक पाण्याचा साठा असणं गरजेचं आहे.

कसे पोहोचाल?

पश्चिम रेल्वे स्थानकाच्या पालघर या स्थानकावर उतरून तिथून शिरगावला जाण्याकरता बसची व्यवस्था आहे. 20 ते 25 मिनिटांचे अंतर पार करून या किल्ल्याजवळ पोहोचू शकतो.

केळवे माहिम

केळवे माहिम हा किल्ला पाणकोट व भुईकोट या दोन्ही प्रकारांमध्ये आहे. भुईकोट किल्ल्यात शितलाई देवीचं मंदिर आहे. येथून बीचवर सहजपणे जाता येतं. या किल्ल्याचा आकार स्टार म्हणजे चांदणीसारखा आहे. किल्लाच्या लगतच सुरूचं बन पसरल्यामुळे पर्यटकांची वर्दळ येथे मोठ्या प्रमाणावर असते. पोर्तुगिजांनी बांधलेला हा किल्ला उत्तम कलाकृतीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणूनही ओळखला जातो. पाणकोट किल्ल्यात भरती ओहोटीची वेळ पाहूनच जावं लागतं. पानबुडीसारखा आकार असलेला हा किल्ला 75 फूट लांब व 40 फूट रूंद असून याची उंची 20 फुट आहे. बीचवर किल्ला असल्याने ओहोटीच्या वेळी किल्ल्यात आतमध्ये चालत जाता येतं. आतमध्ये गेल्यावर आठ झरोके पाहायला मिळतील. या झरोक्यामधून दांडा खाडीवर नजर ठेवली जायची. त्याकरता खास हा किल्ला बांधण्यात आला होता. दांडा खाडीलगत त्या काळात जवळपास 17 किल्ले होते आज त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच किल्ले शिल्लक आहेत.

अर्नाळा

संपूर्ण नारळाच्या झाडांनी हे बेट व्यापलेलं आहे. बेटाच्या पश्चिम टोकावर किल्ला असल्याने भर वस्तीच्या बोळातून किल्ला गाठायचा.
अर्नाळा किल्ल्याचं भक्कम प्रवेशद्वार पाहून किल्ल्याच्या बांधकामाची कल्पना येते. या महाद्वारावर व्यास किंवा व्याघ्र आणि हत्ती यांची सुबक शिल्पं कोरलेली आहेत. समोरच्याच कमानीवर वेली-फुलांची बुट्टी आपल्याला खिळवून ठेवते. उत्तराभिमुख असलेल्या या प्रवेशद्वारावर देवनागरीमध्ये शके 1659 मधला शिलालेख लिहिलेला आहे. इथून आत गेल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. उजव्या हातालाच साधारण दहा फुटांवर छोटी देवडी दिसते. ही देवडी थेट प्रवेशद्वारावरील तटरक्षकांच्या इथे मिळते. संरक्षणाच्या योजनेचा एक मोठा नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो.
मुख्य गडात प्रवेश केल्यावर समोरच प्रशस्त शेती दिसते. या आखीव शेतीमुळेच गडाचं रूप खुलून दिसतं. सरळ पुढे चालत गेल्यावर उजव्या हाताला कौलारू घरासारखा दर्गा आहे. तर डाव्या हाताने चालत गेल्यास पूवेच्या तटाजवळ त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरच टुमदार वटवृक्ष असल्याने इथे थोडा वेळ बसून विश्रांती घ्यायला हरकत नाही. इथे समोर गोड्या पाण्याचा तलाव बांधून घेतलेला आहे. तर तटांवर उत्खननात सापडलेल्या गणेशाच्या मूतीर्ची स्थापना केलेली आहे. इथूनच मागे वळून तटाच्या आतील बाजूने तटांवर जाण्यास पायऱ्या आहेत. या पायऱ्यांनी तटांवरच्या फेरीस सुरूवात करायची. एकूण नऊ बुरूज असलेला आणि तीन प्रवेशद्वार असलेला हा किल्ला इतिहासात स्वत:च वेगळं अस्तित्व ठेवून आहे.
या जलदुर्गाची उभारणी गुजरातच्या सुलतानाने इ.स. 1516 मधे केली. पुढे 1530 मधे हा किल्ला पोर्तुगिजांनी आणि त्यानंतर 1737 मध्ये मराठ्यांनी जिंकला. या जलदुर्गाच्या रक्षणासाठी मराठ्यांनी दोन हजारी सैन्य गडावर ठेवलं होतं. असे दाखले इतिहासात सापडतात.

कसे पोहोचाल?

पश्चिम रेल्वेचं विरार रेल्वे स्टेशनवर जायचं. विरारपासून 14 किमीवर अर्नाळा कोळीवाडा आहे. तिथे बससेवा चांगली आहे. किंवा वसईहूनही अर्नाळ्याला जाण्यासाठी दर अर्ध्या तासाला बसेस आहेत.

वसईचा किल्ला

चिमाजी आप्पांनी मिळवलेला वसईचा विजय ही घटना मराठ्यांनी भारतातून पोर्तुगीज सत्तेचे उच्चाटन करण्याचा जो संकल्प केला होता, त्यापैकी एक महत्त्वाचा टप्पा होय. म्हणूनच आजही या ऐतिहासिक प्रसंगाची आठवण भारतीयांच्या हृदयास तीव्रतेने जाऊन भिडते. समृद्ध अशी ऐतिहाससिक पार्श्वभूमी लाभलेला हा किल्ला व्यवस्थितपणे पाहण्यासाठी हातात किमान दोन दिवस हवेत. नाहीतर घाईघाईत हा किल्ला नीटपणे पाहता येणार नाही. वसई किल्ला जिंकल्यावर चिमाजी आप्पांनी किल्ल्यात 27 जुलै 1739 रोजी मारूतीच्या मूर्तीची स्थापना केली. इतकंच नव्हे तर चिमाजी आप्पांनी विजयासाठी वगोश्वरी देवीस नवस केला होता. त्याप्रमाणे विजय मिळाला. मग पेशवे बाळाजी बाजीराव यांनी वगोश्वरीचे देऊळ बांधले. त्याचबरोबर चिमाजी आप्पांचा पुतळा, वगोश्वरी देवीचं मंदिर, नागेश्वरी मंदिर, बाजारपेठ, तलाव, अनाथालय, भुयारं अशी नानाविध आकर्षणे या किल्ल्यावर असल्याने हे सर्व पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी गाठीशी किमान दोन दिवस हवेत.

डहाणू – बोर्डी बीच व महालक्ष्मी

डहाणू हे समुद्रकिनाऱ्याला लागूनच विस्तारलेले शहर आहे. डहाणू ते बोर्डी असा 17 किलोमीटरचा किनारा विस्तारला आहे. डहाणूला स्वच्छ, सुंदर व शांत समुद्रकिनारा लाभला आहे. मत्स्यव्यवसाय, फळे, भाज्या व चीकू यासाठी डहाणू प्रसिद्ध आहे. येथून जवळच डहाणूचा किल्ला आहे. डहाणूवरूनच आपण नरपडचा समुद्रकिनारा तसेच येथून 27 कि.मी. अंतरावर असलेल्या उंच डोंगरावरील श्री महालक्ष्मीचे जागृत स्थानही पाहू शकतो. डहाणूचीमहालक्ष्मी देशातल्या एकावन्न शक्तिपीठांपैकी एक आहे. डहाणू फळझाडांच्या रांगांनी सजलेले आहे. चिक्कूसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
महालक्ष्मीची यात्रा चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून कृष्णपक्षातील अष्टमीपर्यंतमंदिराच्या सभोवती असलेल्या विशाल मैदानात भरते. डहाणू तालुक्यातील बोर्डीयेथे उदवाडा हे पारशी लोकांचे पवित्र स्थळ आहे. डहाणू रेल्वे स्थानकापासून 15 कि.मी. अंतरावर बोर्डी बीच आहे. हा अतिशय शांत व सुरक्षित बीच आहे. तसेच डहाणू आगर येथील केवडावंतीचे मंदिर व हनुमान मंदिर ही मंदिरे प्रसिद्धआहेत.
पालघर जिल्हयातील डहाणू-बोर्डीचे समुद्रकिनाऱ्यंना रेल्वे किंवा बसमार्गाने जातायेते. बोर्डी येथे एम.टी.डी.सी. चे निवासस्थाने उपलब्ध आहेत.

-मनीषा पिंगळे
जिल्हा माहिती अधिकारी, पालघरमाहिती स्रोत: महान्यूज, शुक्रवार, ३१ जुलै, २०१५.

संस्कृती आणि वारसा

jay Vilas Palace

जव्हार राजवाडा

यापैकी मुख्य म्हणजे जयविलास पॅलेस हा राजवाडा. हा राजवाडा खाजगी मालमत्ता असला तरी भव्यतेवरून त्याचे ऐतिहासिक महत्त्वलक्षात येते. राजवाडय़ात मुकणे घराण्यातील राजांची सुंदर तैलचित्रे आहेत. याशिवायजुने दुर्मिळ फर्निचर आणि अन्य वस्तूही येथे जतन करून ठेवण्यात आल्याआहेत. हा राजवाडा पालघर पासुन 42 किमी अंतरावर स्थित आहे.तसेच ‘पालघर जिल्हा महाबळेश्वर’ म्हणून ओळखले जाते. तसेच ह्याला घनदाट जंगले व श्रीमंत आनंददायी हवामान असलेल्या भेट आहे.पावसाळ्यात जव्हार हा भेट देण्याचा सर्वोत्तम काळ असतो तेव्हा धुक्यांनी आसपासची गावे आणि टेकड्या झाकून जातात . जव्हार हे वारली पेंटीगसाठीपण प्रसिध्द आहे.अतिशय शांत वातावरणातअरण्यांनी वेढलेले वैशिष्टपूर्ण हवामानाचे ठिकाण होय. आदिवासींचे दैवतअसलेले जयविलास आणि भूपतगडचे भग्नावशेष पाहण्यासारखे आहेत. दादर, कोपराधबधबा प्रेक्षणीय आहेत. त्याचप्रमाणे हनुमान पॉईंट, सनसेट पॉईंटपाहण्यासारखे आहेत.

अर्नाळा किल्ला

अर्नाळा सागरी किल्ले मधील उत्तम किल्ला आहे. तो वसई तालुक्यातील, अर्नाळा गावात स्थित आहे. अर्नाळा किल्ला ‘जलदुर्ग ‘ किंवा ‘जंजिरे अर्नाळा’ असे देखील ओळखले जाते. अर्नाळा अशा मुघल, मराठे, पोर्तुगीज, आणि शेवटी पेशवे म्हणून अनेक साम्राज्याचा ताब्यात आलेली . सुलतान महमूद बेगदा मूलतः इ.स. १५१६ मध्ये हा किल्ला बांधण्यात आला . तेथे अन्न नाही पण पाणी गडावर चांगले उपलब्ध आहे. हा किल्ला आकारात आयताकृती आहे आणि जवळजवळ पाणी वेढला आहे. त्र्यंबकेश्वर, भवानी माता, कालिका माता आणि महादेव अशा अनेक मंदिरे आहेत. तीन प्रवेशद्वार आहे त्यापेकी एक प्रवेशद्वार दोन्ही बाजूंच्या मोठी बुरुज आहे जे किल्ल्याच्या उत्तर बाजूला आहे.

arnala Fort
vasai Fort

वसई किल्ला

वसईला, बस्सेइन असेही म्हणतात, पालघर शहर सुमारे ४५ किमी अंतरावर आहे. तो वसई तालुक्यात स्थित आहे. जुन्या शहरातला किल्ला हा पोर्तुगीज चा मुख्यालय उत्तरेला असुन पुढील मध्ये गोवा नंतर महत्त्व आहे. वसई किल्ला चा सागरी किनारपट्टी हा तीन बाजूंनी समुद्राने वेढलेले होते आणि दगड कोसळ जवळ एक खंदक होता ती समुद्राच्या-पाणीने भरले होते. त्याच्या ४.५ किमी लांब मजबूत दगडी कोट ११ बुरुज होते.

किल्याला दोन दरवाजे होते पाठीमागच्या म्हणजे पश्चिम जमीनीचा दरवाजा . किल्ल्यात एक लहान किल्ला देखील असून सुसज्ज सह पाणी टाक्या , कोठारे भरलेली, कोठार,इ. किल्ल्यात धान्य आणि भाज्या वाढत क्षेत्र देखील होते. सर्व जुन्या संरचना भिंत आत नाश आहेत.

वसई मुख्य नाविक तळ होता आणि पोर्तुगीज चा जहाज-बांधणी केंद्र. इ.स. १८०२ जाहिरातीत येथे पेशवे बाजीराव यांनी कुप्रसिद्ध ‘बेसिन तह’ साईन केले ज्याने मराठा संघ विसर्जित केले आहे. शेवटी, किल्ला आणि वसई शहर १८१७ जाहिरातीत ब्रिटिश ताब्यात होते.

गम्भिरगड

गम्भिरगडचा वातावरण त्याचे नाव त्यानुसार जोरदार ‘गंभीर’.तो पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात गुजरात सीमेवर वसलेले आहे. किल्लया जवळ पोहोचण्या आदी, आपण पहिले पठार जवळ पोहचतो जे किल्ल्याचा माची आहे .वन्य वनस्पती ची , अनीयनत्रित वाढ भरपूर आहे. येथे स्थित एक देवी मंदिर आहे. महालक्ष्मी कळस आणि किल्ले बहुदा अशेरी आणि अडसूळ हा किल्ला दृश्यमान आहेत.

gambhir Gad
tarapur Fort

तारापूर किल्ला

तारापूर किल्ले च्या आत विहिरी आणि बाघ आहे , जे शंभर वर्षान साठी विकाजी मेहर्जीना बाजीराव पेशव्याने भेट दिली होती , आणि आजही त्याच्या वारसांनकडे आहे, आणि सध्या चोरघे कुटुंबच्या ताब्यात आहे. तो पालघर तालुक्याच्या बोईसर गावात स्थित आहे. आणि याशिवाय सैन्याची खोल्या , एक चर्च ,एक डोमिनिकन मठ, आणि एक रुग्णालय आहे.1739 मध्ये चिमाजी अप्पांनच्या नेतृत्वाखाली किल्यावर मराठ्यांनी हल्ला केला. ४ सुरुंग लावत, दोन बुरुज आणि महान पडदा बनविण्यात यशस्वी झाले. किल्लाच्या आत काही कनिष्ठ इमारती होते , जे त्यांना पुरण्यात आले.आत दोन गोदामे आणि एक गार्ड खोली,याशिवाय काही कनिष्ठ इमारती आणि अनेक विहिरी उत्कृष्ट पाण्याने भरलेली होती .

कालदुर्ग किल्ला

कालदुर्ग किल्ला डोंगराळ प्रकार किल्ला आहे आणि पालघर जिल्ह्यातील, पालघर तालुक्यात स्थित आहे. ह्या किल्याची उंची सुमारे १५५० फूट आहे. पालघर मध्ये अनेक डोंगराळ किल्ले आहेत आणि कालदुर्ग त्यापैकी एक आहे. गडावर आयताकृती आहे. त्यामुळे किल्ला या आयताकृती आकार सहज एक अंतर पासून ते शोधू शकतो. असे एकही चिन्ह नाहीय जे सुचविते कि ते एक किल्ला आहे. गडावर वन झाडं मोठ्या प्रमाणावरील आहेत त्यामुळे जाती-जमाती निरोगी लोकसंख्या किल्यावर आहे.पण राहणीमान गरीब आहे. किल्ला हा आयताकृती खडक झाल्यामुळे वाटून जाते खडक वरील किल्ला आणि खडक खालील किल्ला. दोन तीन पायऱ्या आहेत जे दोन भाग वेगळे करतात.

gambhir Gad
kelve Fort

केळवा किल्ला

केळवा फोर्ट, 16 व्या शतकात पोर्तुगीजांनी एक ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे किल्ला बांधला , सुंदर आणि प्रसन्न केळवा तळ दक्षिणेकडील ओवरनंतर स्थित आहे. किल्ला पालघर तालुक्यात आहे. हा किल्ला त्यांच्या मराठा राजवटीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपयोग करून घेतला. किल्ला सभोवताली अधिकाधिक विस्तीर्ण नैसर्गिक दृश्ये असून सुरुच्या झाडांनी किल्ला व्यापलेला आहे .किल्ला सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे, जो भरती आणि ओहोटी च्या वेळी आनंददायक आकर्षक अनुभव प्रदान करतो.

ओहोटीच्या काळात हा उत्तम प्रकारे प्रवेशजोगी आणि दृश्यमान आहे आणि स्थानिक देशातील बोट सुविधा किल्यावर येण्यासाठी उपलब्ध आहे.

कामानदुर्ग

कामानदुर्ग पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात आहे. बेलकडी राहणा-या लोकांना आदिवासी समुदाय वारली हे अतिशय मददगार आहेत. तसेच तिथे ५ पिण्याच्या पाण्याची टाकी पठारावर आढळतात आणि एक दगडावर कोरलेली मुर्ती आहे .संपूर्ण प्रदेश घनदाट जंगल सह झाकून हिरवेगार दिसते. वसईचा सुंदर दृश्य आपण येथुन पाहू शकतो . तेथे 2 शिखरे आहेत आणि तेथे जाण्यासाठी पहिले शिखरावरून खाली येवुन परत दुसऱ्या शिखरावर चढावे लागते.

kamandurg
shirgaon

शिरगाव किल्ला

शिरगाव किल्ला पालघर तालुक्यातील समुद्रकाठच्या बाजूला स्थित आहे.या किल्ल्याचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराज यांनी अरबी समुद्रातुन येणाऱ्या शत्रुवरती लक्ष ठेवण्यासाठी केला होता. या प्राचीन किल्ल्याचे आता अवशेष शिल्लक आहेत. मराठ्यांच्या आधी पोर्तुगीजांचे या किल्ल्यावरती वर्चस्व होते.१८१८ मध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांकडून हा किल्ला मिळविला . हा किल्ला २०० फूट उंच आणि १५० फूट हून अधिक लांबीचा आहे. पोर्तुगीजांनी हा किल्ला नूतनीकरण करून आणि त्याच्या क्षेत्रात वाढ करत असतांना मूळ वीट आणि लाल दगड बांधकाम अखंड ठेवले आहे . या किल्ल्याच्या उत्तर पश्चिम भागात पाच पाय तोफ युद्ध इतिहास चिन्हांकित आहे .स्वच्छता आणि देखण्या भोवतालचा परिसरामुळे नियमित पर्यटक व्यतिरिक्त इतिहासकारांना हा किल्ला नेहमीच आकर्षित करत आला आहे.सर्वात रोमांचक म्हणजे पाम वृक्षाचे झाड आहे ज्याला सहा ते सात शाखा आहेत . एक दुर्मिळता अशी आहे कि शिरगाव किल्ला तटबंदीचा आहे आणि भिंती चांगल्या स्थितीत आहेत.

समुद्रकिनारा

kelve Beach

केळवा समुद्रकिनारा

केळवा फोर्ट, 16 व्या शतकात पोर्तुगीजांनी एक ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे किल्ला बांधला , सुंदर आणि प्रसन्न केळवा तळ दक्षिणेकडील ओवरनंतर स्थित आहे. किल्ला पालघर तालुक्यात आहे. हा किल्ला त्यांच्या मराठा राजवटीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपयोग करून घेतला. किल्ला सभोवताली अधिकाधिक विस्तीर्ण नैसर्गिक दृश्ये असून सुरुच्या झाडांनी किल्ला व्यापलेला आहे .किल्ला सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे, जो भरती आणि ओहोटी च्या वेळी आनंददायक आकर्षक अनुभव प्रदान करतो.

ओहोटीच्या काळात हा उत्तम प्रकारे प्रवेशजोगी आणि दृश्यमान आहे आणि स्थानिक देशातील बोट सुविधा किल्यावर येण्यासाठी उपलब्ध आहे.

अर्नाळा समुद्रकिनारा

अर्नाळा सागरी किल्ले मधील उत्तम किल्ला आहे. तो वसई तालुक्यातील, अर्नाळा गावात स्थित आहे. अर्नाळा किल्ला ‘जलदुर्ग ‘ किंवा ‘जंजिरे अर्नाळा’ असे देखील ओळखले जाते. अर्नाळा अशा मुघल, मराठे, पोर्तुगीज, आणि शेवटी पेशवे म्हणून अनेक साम्राज्याचा ताब्यात आलेली . सुलतान महमूद बेगदा मूलतः इ.स. १५१६ मध्ये हा किल्ला बांधण्यात आला . तेथे अन्न नाही पण पाणी गडावर चांगले उपलब्ध आहे. हा किल्ला आकारात आयताकृती आहे आणि जवळजवळ पाणी वेढला आहे. त्र्यंबकेश्वर, भवानी माता, कालिका माता आणि महादेव अशा अनेक मंदिरे आहेत. तीन प्रवेशद्वार आहे त्यापेकी एक प्रवेशद्वार दोन्ही बाजूंच्या मोठी बुरुज आहे जे किल्ल्याच्या उत्तर बाजूला आहे.

arnala Beach
dahanu Beach

डहाणू बोर्डी समुद्रकिनारा

डहाणू बोर्डी बीच पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात स्थित आहे. ते 17 कि.मी. अंतरावर पसरलेला आहे. तसेच ते त्याच्या व्यापक आणि नीटनेटका किनाऱ्यासाठी व अफाट चीकू फळे व गुलाब साठीही प्रसिद्ध आहे . जरी येथे उन्हाळ्यात जोरदार उब असते, पण सभ्य वा-याची झुळूक संपूर्ण समुद्रकाठाला गार करते. झरोष्ट्रियन च्या मक्का झरोष्ट्रियन पवित्र आग घरे जे भव्य मंदिर आहे पर्यटकला अतिशय लोकप्रिय आहे. असे मानले जाते कि ही आग जवळजवळ एक हजार वर्षे पासून तसीच ठेवली गेली आहे. येथे ईराणी आणि पारसी संस्कृती जपून ठेवली आहे या ठिकाणी अधिक विदेशी पर्यटक आकर्षित होतात.

जीवदानी मंदिर

विरार येथे जीवदानी टेकडीवर माँ जीवदानी मंदिर स्थित आहे . पर्वतावर स्थित विरार सर्वात लक्षणीय ठरले आहे. देवी जीवदानी तिच्या फक्त मंदिर साठी देशभरात प्रसिद्ध आहे. जमिनीवर सपाटीपासून सुमारे १३७५ पायऱ्या स्थित आहे, हा उंच डोंगर शहराच्या पूर्व भागेत आहे.विरार येथे १५० वर्षीय जीवदानी मंदिर, रविवारी व उत्सवात लाखो भाविकांना आकर्षित करता . पायथ्याशी वसलेले पापाद्खंदी धरण, हा स्थान ताजे पाणी साठी मुख्य स्त्रोत होता.

jivdani Mandir
mahalakshmi Mandir

महालक्ष्मी मंदिर

महालक्ष्मी, ही `कुलदैवता ` (हिंदू घरातील संरक्षक आहे) आहे आदिवासींची, त्यामुळे आनंद काळात, आदिवासी ह्यां खेळात तारपा नृत्याची व्यवस्था करतात . प्रत्येक वर्षी एक उत्सव आयोजित केला जातो त्याला, महालक्ष्मी यात्रा म्हणतात. ही यात्रा 15 दिवस हनुमान जयंती पासून सुरू होते.