सोयाबीन

सोयाबीन हा एक महत्वपूर्ण आणि प्रोटीनयुक्त असा आहारातील घटक आहे. त्याचे शरीराला होणारे फायदेही अनेक आहेत. अहारामध्ये सोयाबीनचा नियमीत वापर केल्याने हडांच्या कमजोरीपासून आराम मिळतो. एका अभ्यासात असेही सांगितले आहे की, सोयाबीनमध्ये आईसोफ्लेवोंस नावाचे एक रसायन असते. हे रसायन इस्ट्रोजन हार्मोन सारखे असते. महिलांना ओस्टियोपोरोसिसपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे रेसायन फायदेशीर ठरते.

सोयाबीनचे फायदे शोधन्यासाठी संशोधकांनी सुमारे २०० महिलांवर प्रयोग केले. या २०० महिलांना सहा महिन्यांपर्यंत सोयाबीन प्रोटीनयुक्त आहार दिला. त्यानंतर संशोधकांनी या महिलांच्या हाडांचे संशोधन केल्यास त्यांच्या हाडांमधे अधिक भक्कमपणा व नेहमीच्या तूलनेत अधी निरोगीपणा दिसून आला.

१) जर आपणास काही मानसीक अजार असेल तर आपल्या अहारात सोयाबीनचा जरूर समावेश करा. सोयाबीन मानसीक संतूलनावर प्रचंड प्रभावी असते.

२ )हृदयाच्या आजारवरही सोयाबीन फायदेशीर असते. हृदयाचा आजार असणाऱ्या लोकांनी सोयाबीनचा वापर अहारात करावा असा सल्ला डॉक्टरही देतात.

३)  उच्च रक्तदाबावरही सोयाबीन फायदेशीर ठरते. जे लोक सोयाबीनचे नियमीतपणे सेवन करतात त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

४) सोयाबीनपासून लेसीथिन मिळते जे आरोग्याला फारच फायदेशीर असते.

५) सोयाबीनपासून बनवलेले ताक प्यायल्याने पोटांचे विकार कमी होतात.

महत्वाची टीप : गरोदर महिलांनी सोयाबीनचे खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सोयाबीन हा एक महत्वपूर्ण आणि प्रोटीनयुक्त असा आहारातील घटक आहे. त्याचे शरीराला होणारे फायदेही अनेक आहेत. आहारामध्ये सोयाबीनचा नियमित वापर केल्याने हाडांच्या कमजोरीपासून आराम मिळतो. अंगाची काहिली करणाऱ्या या उन्हाळ्यात स्वत:ला फिट ठेवणे आणि आपल्या चेहऱ्याची खास काळजी राखणे गरजेचे असते. सोयाबीन केवळ तुमचे आरोग्य चांगले राखणार नाही तर त्वचेचीही काळजी घेईल.सोयाबीनच्या नियमित सेवनाने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. सोयाबीनच्या सेवनाने शरीरात अॅस्ट्रोजन निर्माण होते जे सुरकुत्या दूर कऱण्यास मदत करते. केस लांब, घनदाट वा काळेभोर हवे असतील तर सोयाबीनचे नियमित सेवन करा. सोयाबीनमध्ये असलेल्या प्रोटीनमुळे केस काळेभोर आणि घनदाट होतात. उन्हाळ्यात तेलकट त्वचेमुळे पिंपल्सना निमंत्रण मिळते.सोयाबीनच्या नियमित सेवनाने नखे कमकुवत होण्याची समस्याही दूर होते. सोयाबीन खाल्ल्याने नखांना मजबूती मिळते तसेच नखे चमकदार होतात. सोयाबीनची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात. यासाठी सोयाबीन पाण्यात भिजवा. त्यानंतर याचे बारीक मिश्रण करुन चेहऱ्यावर लावा. १५ ते २० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतील.