वसंत पुरुषोत्तम काळे (मार्च २५, इ.स. १९३२ – जून २६, इ.स. २००१; मुंबई, महाराष्ट्र), व.पु. काळे नावाने प्रसिद्ध, हे मराठी भाषेतील सुप्रसिद्ध लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार होते. व. पु काळे यांचे विचार साहित्य रसिकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. वपुंना महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान, ‘पु.भा.भावे’ पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार आणि अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले