१२९७: स्टर्लिंग ब्रिजच्या लढाईत स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव.
१७७३: बेंजामिन फ्रँकलिनने रुल्स बाय विच ए ग्रेट एम्पायर मे बी रिड्युस्ड टू ए स्मॉल वन हा निबंध प्रकाशित केला.
१७९२: होप हिरा चोरला गेला.
१८९३: स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले.
१९०६: म. गांधींनी द. आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला.
१९१९: अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले.
१९४१: अमेरिकेने पेंटागॉन बांधायला सुरुवात केली.
१९४२: आझाद हिंद सेनेने जन गण मन राष्ट्रगीत म्हणून गायले.
१९४४: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने डार्मश्टाट शहरावर केलेल्या बॉम्बफेकीमुळे ११,५०० नागरिक ठार.
१९६१: विश्व प्रकृती निधी (World Wildlife Fund) ची स्थापना.
१९६५: भारतीय सैन्याने लाहोर जवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.
१९७२: नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित तरुण तुर्क, म्हातारे अर्क या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी
येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला. थिएटरमधील पहिला प्रयोग ५ आक्टोबर १९७२ रोजी मुंबईच्या रविंद्र नाट्यमंदिरात झाला.
१९९७: नासाचे मार्सग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोहोचले.
२००१: अमेरिकेत ठिकठिकाणी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २९९६ लोक ठार झाले. यावेळी अध्यक्ष जॉर्ज बुश यांना तातडीने अज्ञातस्थळी हलवले गेले.
अमेरिकेचे जर एखाद्या देशाशी अणूयुद्ध झालेच तर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षिततेसाठी अमेरिकेत ७५ हून अधिक ठिकाणी जमिनीखाली विषेश व्यवस्था
तयार ठेवण्यात आलेली आहे. पेंटॅगॉन या अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात सुमारे दहा कोटी डॉलरचे नुकसान झाले.
२००७: रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी केली. याचे नाव सगळ्या बॉम्बचा बाप असे ठेवण्यात आले आहे.

१८८८: अर्टिजेंनाचे राष्ट्राध्यक्ष दॉमिंगो फॉस्तिनो सार्मियेंतो.
१९२१: तामिळ साहित्यिक सब्रुमण्यम भारती. (जन्म: ११ डिसेंबर १८८२)
१९४८: पाकिस्तानचे प्रणेते बॅ. मुहम्मद अली जिना . (जन्म: २५ डिसेंबर १८७६)
१९६४: हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक गजानन मुक्तिबोध . (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७)
१९७१: सोव्हिएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह . (जन्म: १५ एप्रिल १८९४)
१९७३: चिलीचे राष्ट्राध्यक्ष साल्वादोर अॅलेंदे.
१९७३: भारतीय तत्त्वज्ञ आणि गुरू नीम करळी बाबा.
१९७८: बल्गेरियाचे कवी जॉर्जी मार्कोव्ह यांना फाशी देण्यात आली.
१९८७: महादेवी वर्मा –हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्या (१९३३) व कुलगुरू
यामा या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. (जन्म: २६ मार्च १९०७)
१९९३: चित्रपट सृष्टीतील अभिनेते अभी भट्टाचार्य.
१९९८: क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला. (जन्म: १० ऑक्टोबर १९०९ – अहमदनगर, महाराष्ट्र)
२०११: भारतीय सैनिक व पायलट अंजली गुप्ता.