१९३०: प्रभातचा उदयकाल हा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आधी या चित्रपटाचे नाव स्वराज्याचे तोरण असे होते.
परंतु तो सेन्सॉरमधे अडकल्यामुळे त्यात बरीच काट छाट करावी लागली व त्याचे नावही बदलले.
१९४१: दुसरे महायुद्ध – हंगेरी व रुमानियाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
१९९१: मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे २३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
२००१: जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तय्यबा च्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला.
पाचही अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.
२००२: ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा फाळके पुरस्कार जाहीर.
२०१६: सायरस मिस्त्री यांना टी सी एस च्या संचालक मंडळ आणि अध्यक्ष पदावरून काढण्यात आले.
२०१६: अँडी मरे आणि अँजेलीक्यू केरबर यांना आयटीएफ (इंटरनॅशनल टेनिस फेडेरेशन) ने २०१६ जागतिक विजेते घोषित केले.
१७८४: सॅम्युअल जॉन्सन –ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, पत्रकार व विचारवंत (जन्म: १८ सप्टेंबर १७०९)
१९२२: आइसलँड देशाचे पहिले पंतप्रधान हेंस हाफस्टाइन . (जन्म: ४ डिसेंबर १८६१)
१९३०: फ्रिट्झ प्रेग्ल –सेंद्रीय पदार्थांच्या पृथक्करणासाठी १९२३ मधील रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ (जन्म: ३ सप्टेंबर १८६९)
१९६१: अॅना मेरी रॉबर्टसन ऊर्फ ग्रँडमा मोझेस यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी पेंटिंगच्या छंदाची सुरूवात केली
आणि त्यात प्रसिद्धी मिळवली. अमेरिकन ग्रामीण जीवनावरील त्यांची पेंटिग्ज आजही प्रसिद्ध आहेत. (जन्म: १८६०)
१९८६: स्मिता पाटील –अभिनेत्री. त्यांचे निशांत, मंथन, भूमिका, जैत रे जैत, गमन, चक्र, उंबरठा इत्यादी चित्रपट लोकप्रिय झाले.
पद्मश्री (१९८५), दोन राष्ट्रीय पुरस्कार व एक फिल्मफेअर अॅवॉर्ड (जन्म: १७ आक्टोबर १९५५ –पुणे)
१९९४: विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे –सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार, वारणा सहकारी साखर
कारखान्याचे संस्थापक, यशवंतराव चव्हाण यांचे निकटचे सहकारी (जन्म: १७ आक्टोबर १९१७ – कोडोवली, पन्हाळा, कोल्हापूर)
१९९६: श्रीधर पुरुषोत्तम तथा शिरुभाऊ लिमये –स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक
२००६: अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे संस्थापक लामर हंट यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १९३२)