घटना

१६१०: गॅलिलियो यांनी गुरूचा चौथा उपग्रह कॅलीस्टोचा शोध लावला.

१८८९: नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या शारदा नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.

१९१५: इटलीतील अवेझानो येथे भूकंप. २९८०० लोकांचे निधन.

१९३०: मिकी माऊसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.

१९५३: मार्शल टिटो युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष झाले.

१९५७: हिराकुंड धरणाचे उद्घाटन झाले.

१९६४: कोलकता येथे झालेल्या मुस्लिमविरोधी दंग्यात १०० जण ठार.

१९६७: पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री. चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.

१९९६: पुणे-मुंबई दरम्यान शताब्दी एक्सप्रेस हि रेल्वेगाडी सुरु झाली.

२००७: के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

जन्म

१९१९: आंध्रप्रदेशचे ११वे मुख्यमंत्री एम. चेन्ना रेड्डी यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १९९६)

१९२६: हिंदी आणि बंगाली चित्रपट दिगदर्शक आणि निर्माते शक्ती सामंत यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल २००९)

१९३८: प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार पं. शिवकुमार शर्मा यांचा जन्म.

१९४८: जोधपूरचे राजा गज सिंघ यांचा जन्म.

१९४९: भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्म.

१९८२: पाकिस्तानी क्रिकेटपटू कमरान अकमल यांचा जन्म.

१९८३: भारतीय चित्रपट अभिनेता इम्रान खान यांचा जन्म.

मृत्यू

१८३२: लॉर्डस या जगप्रसिद्ध क्रिकेट मैदानाचे संस्थापक थॉमस लॉर्ड यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १७५५)

१९७६: सुप्रसिद्ध तबलावादक अहमद जाँ. थिरकवा यांचे निधन.

१९८५: हिंदी चित्रपटातील चरित्र अभिनेता मदन पुरी यांचे निधन.

१९९७: उद्योजक व वेदाभ्यासक मल्हार सदाशिव तथा बाबूराव पारखे यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १९१२)

१९९८: संगीत दिगदर्शक आणि नृत्य दिगदर्शक शंभू सेन यांचे निधन.

२००१: संस्कृत पंडित आणि लेखक श्रीधर गणेश दाढे यांचे निधन.

२०११: ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचे निधन. (जन्म: १४ मार्च १९३१)

२०१३: क्रिकेटपटू रुसी सुरती यांचे निधन. (जन्म: २५ मे १९३६)