महत्त्वाच्या घटना
१८८१: युनायटेड किंग्डमचे यू. एस. एस. जीनेट जहाज आर्क्टिक समुद्रात नष्ट झाले.
१९८३ : पायोनियर १० हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.
१८८६: कॅनडातील व्हॅनकूवर शहर आगीत मोठ्या प्रमाणात बेचिराख झाले.
१९३४: अॅडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी यांची इटलीतील व्हेनिस येथे भेट झाली..
१९५६: पहिली युरोपियन चॅम्पियन कप फूटबॉल स्पर्धा रियल माद्रिदने जिंकली.
१९७८: इस्त्रायली सैन्याने लेबनॉनमधुन माघार घेतली.
१९८३: पायोनियर १० हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.
१९९७: दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीत ५९ जण मृत्युमुखी पडले, तर सुमारे १०० जण जखमी झाले.
२०००: स्पेनमधील माद्रिद येथे एकाच वेळी १५ स्पर्धकांविरुध्द खेळतांना ग्रॅडमास्टर विश्वनाथन आनंद याने बारा लढतीत विजय मिळविला,
तर तीन लढती अनिर्णित राखण्यात यश मिळविले. या लढती तीन तास सुरु होत्या.
जन्मदिवस / वाढदिवस
१८२२: जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल श्मिट यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १८९४)
१८३१: प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो, असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक गणितज्ञ जेम्सक्लार्क मॅक्सवेल यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर १८७९ – केम्ब्रिज, यु. के.)
१८७९: भारतीय स्वातंत्र्यसैनिक,अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९४५)
१९०५: इंग्लंडचे क्रिकेटपटू कुमार श्री दुलीपसिंहजी यांचा जन्म, यांच्या स्मरणार्थ भारतात दुलीप ट्रॉफी खेळली जाते. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५९ – मुंबई)
१९०९: केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते इ. एम. एस. नंबूद्रीपाद यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च १९९८)
१९२३: गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रेम धवन यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे २००१ – मुंबई)
१९३७: द इंडिपेंडंट चे सहसंस्थापक आंद्रेस व्हिटॅम स्मिथ यांचा जन्म.
१९६५: भारतीय क्रिकेटपटू मनिंदर सिंग यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी
१९६१: के. एम. कृष्णन, भौतिकशास्त्रज्ञ.
१९८०: दादू इंदुरीकर, वगसम्राट.
१९६७: भारतीय शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर . (जन्म: २ ऑक्टोबर १८९१)
१९६९: आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, मराठी साहित्यिक, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, पत्रकार, आमदार आणि वक्ता. (जन्म: १३ ऑगस्ट १८९८)
२०१२: पाकिस्तानी गझल गायक मेहंदी हसन . (जन्म: १८ जुलै १९२७)
२०१३: ड्यूईश इंक. कंपनी चे संस्थापक डेव्हिड ड्यूईश यांचे निधन.