५४: नीरो १७व्या वर्षी रोमन सम्राट बनला.
१७७३: चार्ल्स मेसियर यांनी व्हर्लपूल गॅलेक्सीचा शोध लावला.
१८८४: ग्रिनिच जवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानून आंतरराष्ट्रीय मान्यता त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.
१९२३: तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल वरून अंकारा येथे हलवली.
१९२९: पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले.
१९४४: दुसरे महायुद्ध – लाल सैन्याने लाटवियाची राजधानी रिगा जिंकली.
१९४६: फ्रान्सने नवीन संविधान अंगीकारले.
१९७०: फिजीचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९८३: अमेरिटेक मोबाइल कम्युनिकेशन्स (आताची ए.टी. अँड टी) या कंपनीने अमेरिकेतील पहिली सेलफोनची यंत्रणा सुरू केली.
2013: मध्य प्रदेशच्या दातिया जिल्ह्यातील रतनगढ मंदिराजवळ असलेल्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत स्त्री-बालकांसह ११० ठार, १००पेक्षा अधिक जखमी.
२०१४: चक्रवात हुदहुदचा भारताच्या आंध्र प्रदेश आणि ओडिसाच्या सीमा प्रदेशाला तडाखा,२५ लोकांचा मृत्यू तर लाखों प्रभावित.

१२४०: दिल्ली च्या पहिल्या महिला सुलतान रझिया सुलतान .
१२८२: जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचे स्थापक निचिरेन . (जन्म: १६ फेब्रुवारी १२२२)
१९११: मार्गारेट नोबल ऊर्फ भगिनी निवेदिता –स्वामी विवेकानंदांच्या शिष्या, भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्या मूळच्या आयरिश होत्या.
२५ मार्च १८९८ रोजी स्वामी विवेकानंदांनी त्यांना विधिवत ब्रम्हचारिणी व्रताची दीक्षा दिली व त्यांचे नाव निवेदिता ठेवले. (जन्म: २८ आक्टोबर १८६७)
१९३८: पॉपॉय कार्टून चे निर्माते ई. सी. सेगर . (जन्म: ८ डिसेंबर १८९४)
१९४५: द हर्शे चॉकलेट कंपनी चे संस्थापक मिल्टन हर्शे . (जन्म: १३ सप्टेंबर १८५७)
१९८७: आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार –पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक, त्यांनी सुमारे ४०० हून
अधिक चित्रपटांत गाणी गायिली. चलती का नाम गाडी सारख्या निखळ विनोदी चित्रपटाबरोबरच दूर गगन की छाँव में सारखे गंभीर चित्रपटही काढले. (जन्म: ४ ऑगस्ट १९२९)
१९९५:डॉ. रामेश्वर शुक्ल तथा अंचल–हिन्दी साहित्यिक (जन्म: १ मे १९१५ – किशनपूर, फतेहपूर, उत्तर प्रदेश)
२००१: डॉ. जाल मिनोचर मेहता –कुष्ठरोगतज्ञ, नामवंत शल्यचिकित्सक, पुणे जिल्हा रेड क्रॉसचे अध्यक्ष, पद्मश्री (१९८२), सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे संचालक,
२००३: नोबेल पारितोषिक विजेते केनेडियन भौतिकशास्त्रज्ञ बर्ट्राम ब्रॉकहाउस .
२०१६: थायलंड चे राजे नरेश राज राम नवम् भूमिबल अतुल्यतेज ( ९जून १९४६ )
२०१८: अन्नपूर्णा देवी मैहर घराण्याच्या प्रसिद्ध हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतकार, पद्म भूषण सम्मानित (जन्मतारीख: २३ एप्रिल, १९२७)