१८१९: अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले.
१८९६: ग्लासगो अंडरग्राऊंड रेल्वे सुरु झाली.
१९०३: किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्न केला.
१९२९: प्रभात चा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
१९३९: फिनलंडवर आक्रमण करण्यासाठी सोव्हिएत युनियन ला लीग ऑफ नेशन्समधून काढून टाकले.
१९४१: दुसरे महायुद्ध – जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.
१९६१: टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९६२ : नासाचे मरिनर २ (चित्रीत), जगातले पहिले अवकाशयान झाले जे शुक्र ग्रहाच्या जवळुन यशस्वी रीत्या उडाले.
१७९९: अजॉर्ज वॉशिंग्टन –अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २२ फेब्रुवारी १७३२)
१९४३: कॉर्नफ्लेक्सचे निर्माते जॉन हार्वे केलॉग . (जन्म: २६ फेब्रुवारी १८५२)
१९६६:शंकरदास केसरीलाल ऊर्फ ‘शैलेन्द्र’–गीतकार (जन्म: ३० ऑगस्ट १९२३)
१९७७: गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर –गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते. गीतरामायणामुळे त्यांना ’महाराष्ट्राचे वाल्मिकी’
म्हणून ओळखले जाते. (जन्म: १ आक्टोबर १९१९)
२००६: अटलांटिक रिकॉर्ड्सचे सहसंस्थापक अत्लम एर्टेगुन . (जन्म: ३१ जुलै १९२३)
२०१३: भारतीय चित्रकार सी एन करुणाकरन.