जागतिक ध्वनी दिन

ठळक घटना

१८५३ : भारतातील पहिली रेल्वेगाडी बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गावर धावण्यास सुरुवात झाली.

१९२२: मुळशी सत्याग्रह सुरू झाला.

१९४८: राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना झाली.

१९७२: केप कॅनव्हेरॉल, फ्लोरिडा येथून अपोलो-१६ या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले.

१९९५: निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना ऑनेस्ट मॅन ऑफ इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१९९९: चालकरहित निशांत विमान जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे चाचणी करण्यात आली.

२०१६: जगातील सुप्रसिद्ध कोहिनूर हिरा ब्रिटन कडून परत आणण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

२०१६: इक्वाडोर मधे 7.8 तीव्रतेचा भूकंप , 400 हून अधिक मृत्यूमुखी,2500 हून अधिक जखमी
जापानच्या क्यूशू मधे भकपाच्या दोन झटक्यात ५० जणांचा मृत्यू

जन्म/वाढदिवस

१८४८ : कंडुकुरी वीरेसलिंगम, आंध्र प्रदेशमधील समाजसुधारक.

१८६७: विल्बर राइट आपला भाऊ ऑर्व्हिल राइट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते . (मृत्यू: ३० मे १९१२)

१८८९: विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार चार्ली चॅपलिन . (मृत्यू: २५ डिसेंबर १९७७)

१९२४: भारतीय राजनयिक मदनजीत सिंग यांचा जन्म.

१९३४: केंद्रीय पेट्रोलियम मंत्री तसेच रेल्वे राज्यमंत्री राम नाईक.

१९४२: विल्यम्स एफ -1 रेसिंग टीमचे स्थापक फ्रॅंक विल्यम्स .

१९६१: भारतीय वकील आणि राजकारणी जर्बोम गॅमलिन.

१९६३: पाकिस्तानी क्रिकेटपटू सलीम मलिक.

१९७२: स्पॅनिश लॉनटेनिस खेळाडू कोंचिता मार्टिनेझ .

१९७८: मॉडेल आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री लारा दत्ता .

१९९१: चित्रपट आणि नाटक अभेनेते आशिष खाचणे.

मृत्यू/पुण्यतिथी

१७५६: फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जॅक्स कॅसिनी. (जन्म: ८ फेब्रुवारी १६७७)

१८५०: मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम च्या संस्थापिका मेरी तूसाँ. (जन्म: १ डिसेंबर १७६१)

१९६६: शांतीनिकेतन मधील जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस. (जन्म: ३ डिसेंबर १८८२)

१९९५: अभिनेते आणि वकील रमेश टिळेकर.

२०००: कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू तसेच शाहू महाराजांचे चरित्रकार अप्पासाहेब पवार .