१२१६: इंग्लंडचा राजा जॉन मृत्यूमुखी पडल्यामुळे त्याचा ९ वर्षाचा मुलगा हेन्री हा राजेपदी आरुढ झाला.
१८१२: नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोच्या सीमेवरुन माघार घेतली.
१९३३: जर्मनी लीग ऑफ नेशन्स (League of Nations) मधून बाहेर पडले.
१९३५: इथिओपियावर आक्रमण केल्यामुळे राष्ट्रसंघाने (League of Nations) इटलीवर आर्थिक निर्बंध घातले.
१९४४: दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजा फिलीपाइन्सला पोचल्या.
१९७०: भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपुर्द.
१९९३: पुण्याजवळील महारेडिओ दुर्बिण (GMRT) प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सर सी. व्ही. रामन पदक जाहीर.
१९९४: रुद्रवीणावादक उस्ताद असद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर.
२०००: पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्यशासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
२००५: मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी सद्दाम हुसेन यांच्याविरुद्ध खटला सुरू झाला.
२०१४: महाराष्ट्र व हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणूकांचे निकाल जाहीर. हरीयाणात भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत तर महाराष्ट्रात
भारतीय जनता पक्षाला बहुमताला २० जागा कमी.
२०१५: कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकीत लिबरल पार्टीने नऊ वर्ष सत्तेवर असलेल्या कंज़र्वेटिव पार्टीचा धुव्वा उडवला.
२०१५: कॅलिफोर्निया विश्वविद्यालयातील वैज्ञानिकांच्या संशोधनातून पृथ्वीवर ४.१ अरब वर्ष पूर्व जीवन अस्तित्वात असल्याचे संकेत.सध्याच्या आकडेवारीनुसार
३०० करोड़ वर्ष आधी असल्याचे अनुमान.
१२१६: इंग्लंडचा राजा जॉन. (जन्म: २४ डिसेंबर ११६६)
१९३४: विश्वनाथ कार – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक. १८९६ मधे त्यांनी एक छापखाना काढून उत्कल साहित्य
नावाचे सर्वस्वी साहित्याला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक सुरू केले. (जन्म: २४ डिसेंबर १८६४)
१९३७: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड . (जन्म: ३० ऑगस्ट १८७१)
१९८६: मोझांबिक देशाचे पहिले राष्ट्रपती समोरा महेल. (जन्म: २९ सप्टेंबर १९३३)
१९५०: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक विष्णू गंगाधर तथा दादासाहेब केतकर . (जन्म: ९ एप्रिल १८८७)
१९९५ बाल कलाकार म्हणून पुढे आलेल्या व नंतर सहाय्यक अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी पावलेल्या सलमा बेग ऊर्फ बेबी नाझ
२००३: बोत्सिया व हर्जेगोविना देशाचे पहिले अध्यक्ष अलिजा इझेटबेगोविच. (जन्म: ८ ऑगस्ट १९२५)
२०११: भारतीय लेखक कक्कणदन. (जन्म: २३ एप्रिल १९३५)