जागतिक दिवस
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
ठळक घटना
१८०४: जगातील पहिले वाफेवर चालणारे रेल्वे ईंजिन वेल्समधील पेन-इ-डॅरेन आयर्नवर्क्स या कारखान्यात तयार झाले.
१८४२: जॉन जे. ग्रीनॉने शिवणाच्या मशीनचा पेटंट घेतला.
१८४८: कार्ल मार्क्सने साम्यवादी जाहीरनामा(कम्युनिस्ट मॅनिफेस्टो) प्रकाशित केला.
१८७८: न्यू हेवन, कनेक्टिकटमध्ये पहिली टेलिफोन डिरेक्टरी वितरीत केली गेली.
१८८५: वॉशिंग्टन डी.सी.मध्ये वॉशिंग्टन स्मारकाचे उद्घाटन.
१९१५: लाहोर कट – लाहोर, बनारस व मीरत या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला.
१९१६: पहिले महायुद्ध – व्हर्दुनची लढाई सुरू.
१९४७: एडविन लँडने पोलेरॉईड कॅमेर्याचे प्रात्यक्षिक दाखवले.
१९५२: इंग्लंडमध्ये नागरिकांनी ओळखपत्र नेहमी जवळ बाळगायची सक्ती रद्ध.
१९५२: पूर्व पाकिस्तान(आताचे बांगलादेश)मध्ये पोलिसांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार केला. चार ठार. येथून बांगलादेश मुक्ति आंदोलन सुरू झाले.
१९५३: फ्रांसिस क्लार्क व जेम्स डी. वॅट्सननी डी.एन.ए.च्या रेणूची रचना शोधली.
१९६०: क्युबात फिदेल कास्त्रोने सगळ्या उद्योगांचे राष्ट्रीयीकरण केले.
१९६५: न्यूयॉर्क मध्ये नेशन ऑफ इस्लामच्या सदस्यांनी माल्कम एक्सची हत्या केली.
१९६७: जिनिव्हा येथे नि:शस्त्रीकरण शिखर परिषद याच दिवशी पार पाडली.
१९७०: स्वित्झर्लंडच्या झुरिक शहराजवळ स्विस एर फ्लाईट ३३० मध्ये आकाशात बॉम्बस्फोट होउन विमान नष्ट. ३८ ठार.
१९७२: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने चीनला भेट दिली.
१९७२: सोव्हिएत संघाचे मानवरहित अंतराळयान लुना २० हे चंद्रावर उतरले.
१९७३: इस्रायेलच्या लढाउ विमानांनी लिब्याचे नागरी विमान पाडले. १०८ ठार.
१९७४: इस्रायेलने सुएझ कालव्याचा ताबा सोडला.
१९९५: अल्जीरियातील कारागृहात उठाव. ४ रक्षक व ९६ कैदी ठार.
१९९५: स्टीव फॉसेटने गरम हवेच्या फुग्यातुन एकट्याने पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
२००७: इटलीच्या पंतप्रधान रोमानो प्रोदीने राजीनामा दिला परंतु राष्ट्राध्यक्ष जॉर्जियो नॅपोलितानोने तो नामंजूर केला.
२०१३: हैदराबाद मध्ये अनेक बॉम्बस्फोटांमध्ये किमान १७ जण ठार आणि ११९ जण जखमी झाले.
जन्म
१६८८: उलरिका एलिनोरा, स्वीडनची राणी.
१७२८: झार पीटर तिसरा, सम्राज्ञी कॅथेरिनचा पती.
१८७५: फ्रेन्च महिला जीन काल्मेंट, हिचे मृत्युच्या वेळचे वय १२२ वर्षे व १६४ दिवस होते. हा जागतिक उच्चांक आहे.
१८९४: शांतीस्वरुप भटनागर.
१८९९: निराला त्रिपाठी, कवी.
१९३७: हॅराल्ड पाचवा, नॉर्वेचा राजा.
१९५२: ज्या पिंग्वा, चिनी भाषेमधील कादंबरीकार.
१९७०: मायकेल स्लेटर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९८०: जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक, भूतानाचा राजा.
मृत्यू
१४३७: जेम्स पहिला, स्कॉटलंडचा राजा.
१५१३: पोप ज्युलियस दुसरा.
१८२९: राणी चेन्मम्माचा.
१८४६: निंको, जपानी सम्राट.
१८६२: जस्टिनस कर्नर, जर्मन कवी.
१९०१: जॉर्ज फ्रांसिस फित्झगेराल्ड, आयरिश गणितज्ञ.
१९१३: वीरेंद्रनाथ, सेनापती व बंगालचे क्रांतिकारक.
१९२६: हाइका केमरलिंघ ऑन्स, डच भौतिकशास्त्रज्ञ.