जागतिक योग दिन / जागतिक मानवतावादी दिन
उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस.
दक्षिण गोलार्धातील सर्वात छोटा दिवस.
स्थानिक रहिवासी दिन – कॅनडा.
राष्ट्र दिन – ग्रीनलँड.
आंतरराष्ट्रीय योग दिनमहत्त्वाच्या घटना
१६७४ : कवीभूषण यांनी ” शिवराय भूषण ” हे काव्य पूर्ण केले.
१७८८: न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे ९ वे राज्य बनले.
१८९८: अमेरिकेने स्पेनकडून ग्वाम हा प्रांत ताब्यात घेतला.
१९४८: चक्रवर्ती राजगोपालाचारी पहिले भारतीय गव्हर्नर जनरल झाले.
१९४९: राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना.
१९५७: एलेन फेअरक्लो यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
१९६१ : अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खार्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणारे यंत्र विकसित केले.
१९८९: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाचा ध्वज जाळण्याची कृती आणि वाचा स्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली.
१९९१: भारताचे ९ वे पंतप्रधान म्हणून पी. व्ही. नरसिंह राव यांनी सूत्रे हाती घेतली.
१९९२: विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजविज्ञानाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणार्या डॉ. रघुनाथ माशेलकर यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पारितोषिक जाहीर.
१९९५: पर्यावरणक्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ रश्मी मयूर यांना अमेरिकेतील द युनिटी इन योग इंटरनॅशनल या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला.
१९९८: फ्रँकफर्ट बुद्धिबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने फ्रिट्झ-५ या संगणकाचा सहज पराभव केला.
१९९९: विश्वकरंडक स्पर्धेत १००० धावा पूर्ण करणारा मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया) हा चौथा खेळाडू ठरला.
२००६: नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे निक्स व हायड्रा असे नामकरण करण्यात आले.
२०१५: जागतिक योग दिनाची सुरवात.
जन्मदिवस / वाढदिवस
१७८१: फ्रेंच गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ सिमिओन-डेनिसपॉइसॉन.
१९०५ : जेआँ-पॉल सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: १५ एप्रिल १९८०)
१९१२: भारतीय लेखक व नाटककार विष्णू प्रभाकर .(मृत्यू: ११ एप्रिल २००९)
१९१६ : सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९ वे नौदल प्रमुख (मृत्यू: २१ जानेवारी १९९८)
१९२३: मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे.
१९४१: भारतीय बिशप अलॉयसियस पॉल डिसोझा.
१९५२: न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेरमी कोनी यांचा जन्म.
१९५३: पाकिस्तानच्या ११व्या पंतप्रधान बेनझीर भुट्टो .(मृत्यू: २७ डिसेंबर २००७)
१९५८: भारतीय अभिनेत्री रीमा लागू . (मृत्यू: १८ मे २०१७)
१९६७: ईबे (eBay) चे स्थापक पियरे ओमिदार .
मृत्यू / पुण्यतिथी
१८७४: स्वीडीश भौतिकशास्त्रज्ञ अँडर्सयोनास अँग्स्ट्रॉम.
१८९३: स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे संस्थापक लिलँड स्टॅनफोर्ड.
१९२८: सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार द्वारकानाथ माधव पितळे उर्फ नाथमाधव. (जन्म: ३ एप्रिल १८८२)
१९४०: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष डॉ. केशव बळीराम हेडगेवार. (जन्म: १ एप्रिल १८८९)
१९५७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ योहानेस स्टार्क .
१९७०: इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुकार्नो. (जन्म: ६ जून १९०१)
१९८४: मराठी चित्रपट नाट्य अभिनेते अरुण सरनाईक. (जन्म: ४ ऑक्टोबर १९३५)
२००३: अमेरिकन कादंबरीकार लिऑन युरिस. (जन्म: ३ ऑगस्ट १९२४)
२०१२: लेखक पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर . (जन्म: १२ जून १९१७)
२०१२: भारतीय छायाचित्रकार आणि पत्रकार सुनील जना . (जन्म: १७ एप्रिल १९१८)
२०१३: भारतीय पत्रकार डिकी रुतनागुर . (जन्म: २६ फेब्रुवारी १९३१)