जागतिक कविता दिन
जागतिक कटपुतली दिन
आंतरराष्ट्रीय रंग दिन
आंतरराष्ट्रीय जंगल दिन
घटना
१८०४: नेपोलियनचा फ्रेंच नागरी कायदा स्वीकृत.
१९७७: भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.
१९८०: अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.
२००६: सोशल मीडिया साइट ट्विटरची स्थापना झाली.
१५५६: ख्रिश्चन धर्मात सुधारणांची आवश्यकता आहे असे सांगणार्या आर्चबिशप थॉमस क्रॅनमर यांना शिक्षा म्हणून जिवंत जाळण्यात आले.
१६८०: शिवाजी महाराजांनी कुलाबा रायगड किल्ल्याची बांधणी सुरू केली.
१८५८: इंग्रज सेनापती सर ह्यू रोझ यांनी झाशीस वेढा दिला.
१८७१: ऑटो व्हॉन बिस्मार्क हे जर्मनीचा चॅन्सेलर बनला.
१९३५: शाह रझा पेहलवी यांनी पर्शियाचे नाव ईराण करावे असे आवाहन केले.
१९७७: भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.
१९८०: अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.
१९९०: नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.
२०००: फ्रेंच गयानातील कोअरु येथून एरियन ५०५ या वाहकाद्वारे भारताचा इन्सॅट ३ बी हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला.
२००३: जळगाव महानगरपालीकेची स्थापना.
२००६: सोशल मीडिया साइट ट्विटर ची स्थापना झाली.
जन्म/वाढदिवस
१७६८: फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फोरियर . (मृत्यू: १६ मे १८३०)
१८४७: कालजंत्रीकार बाळाजी प्रभाकर मोडक . (मृत्यू: २ डिसेंबर १९०६)
१८८७: देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक मानवेंद्रनाथ रॉय . (मृत्यू: २६ जानेवारी १९५४)
१९१६: भारतरत्न शहनाईवादक बिस्मिल्ला खान . (मृत्यू: २१ ऑगस्ट २००६)
१९२३: सहज योग च्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव . (मृत्यू: २३ फेब्रुवारी २०११)
१९७८: राणी मुखर्जी, भारतीय अभिनेत्री.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
१९७३: कोशकार यशवंत रामकृष्ण दाते . (जन्म: १७ एप्रिल १८९१)
१९७३: आतुन कीर्तन वरुन तमाशा या नाटकाचा प्रयोग करत असतानाच नटवर्य शंकर घाणेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.
१९८५: ब्रिटिश अभिनेता सर मायकेल रेडग्रेव्ह (जन्म: २० मार्च १९०८)
२००१: दक्षिण कोरियन कंपनी ह्युंदाई चे स्थापक चुंग जू-युंग . (जन्म: २५ नोव्हेंबर १९१५)
२००३: भारतीय लेखक शिवानी . (जन्म: १७ ऑक्टोबर १९२३)
२००५: चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक दिनकर द. पाटील . (जन्म: ६ नोव्हेंबर १९१५)
२०१०: अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ . (जन्म: २९ मार्च १९२६)