जागतिक कविता दिन

जागतिक कटपुतली दिन

आंतरराष्ट्रीय रंग दिन

आंतरराष्ट्रीय जंगल दिन

घटना

१८०४: नेपोलियनचा फ्रेंच नागरी कायदा स्वीकृत.

१९७७: भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.

१९८०: अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.

२००६: सोशल मीडिया साइट ट्विटरची स्थापना झाली.

१५५६: ख्रिश्चन धर्मात सुधारणांची आवश्यकता आहे असे सांगणार्‍या आर्चबिशप थॉमस क्रॅनमर यांना शिक्षा म्हणून जिवंत जाळण्यात आले.

१६८०: शिवाजी महाराजांनी कुलाबा रायगड किल्ल्याची बांधणी सुरू केली.

१८५८: इंग्रज सेनापती सर ह्यू रोझ यांनी झाशीस वेढा दिला.

१८७१: ऑटो व्हॉन बिस्मार्क हे जर्मनीचा चॅन्सेलर बनला.

१९३५: शाह रझा पेहलवी यांनी पर्शियाचे नाव ईराण करावे असे आवाहन केले.

१९७७: भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.

१९८०: अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.

१९९०: नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.

२०००: फ्रेंच गयानातील कोअरु येथून एरियन ५०५ या वाहकाद्वारे भारताचा इन्सॅट ३ बी हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला.

२००३: जळगाव महानगरपालीकेची स्थापना.

२००६: सोशल मीडिया साइट ट्विटर ची स्थापना झाली.

जन्म/वाढदिवस

१७६८: फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फोरियर . (मृत्यू: १६ मे १८३०)

१८४७: कालजंत्रीकार बाळाजी प्रभाकर मोडक . (मृत्यू: २ डिसेंबर १९०६)

१८८७: देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक मानवेंद्रनाथ रॉय . (मृत्यू: २६ जानेवारी १९५४)

१९१६: भारतरत्न शहनाईवादक बिस्मिल्ला खान . (मृत्यू: २१ ऑगस्ट २००६)

१९२३: सहज योग च्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव . (मृत्यू: २३ फेब्रुवारी २०११)

१९७८: राणी मुखर्जी, भारतीय अभिनेत्री.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

१९७३: कोशकार यशवंत रामकृष्ण दाते . (जन्म: १७ एप्रिल १८९१)

१९७३: आतुन कीर्तन वरुन तमाशा या नाटकाचा प्रयोग करत असतानाच नटवर्य शंकर घाणेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.

१९८५: ब्रिटिश अभिनेता सर मायकेल रेडग्रेव्ह  (जन्म: २० मार्च १९०८)

२००१: दक्षिण कोरियन कंपनी ह्युंदाई चे स्थापक चुंग जू-युंग . (जन्म: २५ नोव्हेंबर १९१५)

२००३: भारतीय लेखक शिवानी . (जन्म: १७ ऑक्टोबर १९२३)

२००५: चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक दिनकर द. पाटील . (जन्म: ६ नोव्हेंबर १९१५)

२०१०: अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ . (जन्म: २९ मार्च १९२६)