ठळक घटना
१४५५: गटेनबर्ग बायबल प्रकाशित. पाश्चिमात्य देशांतील हे पहिले मुद्रित पुस्तक होय.
१६६०: चार्ल्स अकरावा स्वीडनच्या राजेपदी.
१८९३: रूडॉल्फ डिझेलने डिझेल ईंजिनचा पेटंट मिळवला.
१९०३: क्युबाने आपला ग्वान्टानामो बे हा प्रदेश अमेरिकेला ‘तहहयात’ भाड्याने दिला.
१९०४: पनामाने १,००,००,००० अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.
१९१९: इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशीस्ट पार्टीची स्थापना केली.
१९४१: डॉ.ग्लेन टी. सीबॉर्गने किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथमतः निर्मिती केली.
१९४५: दुसरे महायुद्ध – ईवो जिमाची लढाई – काही अमेरिकन मरीन्स माउंट सुराबाचीवर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला. हे करीत असतानाचे त्यांचे छायाचित्र जगप्रसिद्ध झाले.
१९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केले.
१९४५: दुसरे महायुद्ध – पोलंडच्या पोझ्नान शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली.
१९४५: दुसरे महायुद्ध – रॉयल एर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फॉर्झैम शहरा बेचिराख केले.
१९४७: आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्थाची स्थापना.
१९९१: पहिले अखाती युद्ध – दोस्त राष्ट्रांची सौदी अरेबियातून इराकवर खुश्की मार्गाने चाल.
१९९७: रशियाच्या अंतराळ स्थानक मिरमध्ये आग.
जन्म
१४१७: पोप पॉल दुसरा.
१८७६: देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ’संत गाडगे महाराज.
१९०८: विल्यम मॅकमेहोन, ऑस्ट्रेलियाचा २०वा पंतप्रधान.
१९१३: जादूगार प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार.
१९६५: मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर अशोक कामटे.
मृत्यू
११००: झ्हेझॉँग, चीनी सम्राट.
१४४७: पोप युजेनियस चौथा.
१४६४: झेंगटॉँग, चीनी सम्राट.
१७३०: पोप बेनेडिक्ट तेरावा.
१७६६: स्तानिस्लॉ लेस्झिन्सकी, पोलंडचा राजा.
१८४८: जॉन क्विन्सी ऍडम्स, अमेरिकेचा ६वा राष्ट्राध्यक्ष.
१८५५: कार्ल फ्रीडरिक गॉस, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
१८७९: आल्ब्रेख्ट ग्राफ फॉन रून, प्रशियाचा पंतप्रधान.
१९६९: मधुबाला, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
१९९८: क्रिकेटपटू रमण लांबा यांचे निधन.
२००४: विजय आनंद, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.