आंतरराष्ट्रीय विधवा दिन / संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन
महत्त्वाच्या घटना
१७५७: प्लासी येथे रॉबर्ट क्लाइव्हच्या ३,००० सैन्याने सिराज उद्दौलाच्या ५०,००० सैन्याचा फितुरी घडवून पराभव केला.
१८६८: क्रिस्टोफर लॅथम शॉल्स यांना टाईप-राइटर च्या शोधासाठी पेटंट मिळाले.
१८९४: पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली.
१९२७: भारतीय नभोवाणी मुंबई येथे सुरु.
१९६९: आय.बी.एम. ने जाहीर केले की जानेवारी १९९७ पासून सॉफ्टवेअर आणि इतर सेवांची किंमत वेगवेगळी होईल त्यामुळे आधुनिक सॉफ्टवेअर उद्योग सुरु झाला.
१९७९: इंग्लंडला ९२ धावांनी हरवून वेस्ट इंडीजने दुसरा क्रिकेट विश्वकरंडक जिंकला.
१९८५: दहशतवादी बॉम्बचा एअर इंडियाच्या कनिष्क बोइंग ७४७ विमानात स्फोट झाल्यमुळे ३२९ प्रवासी लोक ठार झाले.
१९९६: शेखहसीना वाजेद बांगलादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या.
१९९८: दुसर्या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली यू. एस. एस. मिसुरी ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.
२०१६: युनायटेड किंग्डम ने ५२% ते ४८% मतदान होऊन युरोपियन युनियनला सोडले
जन्मदिवस / वाढदिवस
१७६३: नेपोलियन बोनापार्ट यांची पत्नी जोसेफिन .
१८७७: भारतीय-इंग्लिश अभिनेते नॉर्मन प्रिचर्ड . (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९२९)
१९०६: नेपाळचे राजे वीर विक्रम शाह त्रिभुवन. (मृत्यू: १३ मार्च १९५५)
१९१२: इंग्लिश गणितज्ञ आणि संगणकतज्ञ अॅलन ट्युरिंग. (मृत्यू: ७ जून १९५४)
१९१६: इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड तथा लेन हटन . (मृत्यू: ६ सप्टेंबर १९९०)
१९३५: मराठी लेखक राम कोलारकर.
१९३६: ग्रीक पंतप्रधान कॉस्टास सिमिटिस .
१९४२: दिग्दर्शक जब्बार पटेल .
१९७२: फ्रेंच फुटबॉलपटू झिनेदिन झिदान .
१९८०: वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू रामनरेश सारवान.
मृत्यू / पुण्यतिथी
७९: रोमन सम्राट व्हेस्पासियन. (जन्म: १७ नोव्हेंबर ९)
१७६१: बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे . (जन्म: ८ डिसेंबर १७२१)
१८३६: स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ जेम्स मिल . (जन्म: ६ एप्रिल १७७३)
१८९१: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विल्यम एडवर्ड वेबर .
१९१४: भारतीय गुरु आणि तत्वज्ञ भक्तिविनाडो ठाकूर . (जन्म: २ सप्टेंबर १८३८)
१९३९: आधुनिक बालशिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते गिजुभाई बधेका . (जन्म: १५ नोव्हेंबर १८८५ –चितल, अमरेली, गुजराथ)
१९५३: भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामप्रसाद मुखर्जी . (जन्म: ६ जुलै १९०१)
१९७५: भारतीय भूसेना प्रमुख जनरल प्राणनाथ थापर.
१९८०: इंदिरा गांधी यांचा मुलगा संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन. (जन्म: १४ डिसेंबर १९४६)
१९८२: बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांना ऑर्गनची साथ करणारे गंधर्व नाटकमंडळीतील नामवंत कलाकार हरिभाऊ देशपांडे यांचे निधन.
१९९०: चरित्र अभिनेते हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय. (जन्म: २ एप्रिल १८९८ – हैदराबाद, आंध्र प्रदेश)
१९९४: नाटककार, साहित्यिक वसंतशांताराम देसाई.
१९९५: पोलिओची लस शोधणारे शास्त्रज्ञ डॉ. जोनस सॉक.
१९९६: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रे लिंडवॉल यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९२१)
२००५: साहित्यिक डॉ. हे. वि. इनामदार यांचे निधन.
२०१५: भारतीय नन, वकील, आणि समाजसेवक निर्मला जोशी . (जन्म: २३ जुलै १९३४)