११६६: इंग्लंडचा राजा जॉन. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १२१६)
१८१८: ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक जेम्स प्रेस्कॉट ज्यूल. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १८८९)
१८६४: १८६४ : विश्वनाथ कार –ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक. १८९६ मधे त्यांनी एक छापखाना काढून उत्कल साहित्य नावाचे
सर्वस्वी साहित्याला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक सुरू केले. (मृत्यू: १९ आक्टोबर १९३४)
१८८० : डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या –स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते. काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला
हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे. (मृत्यू: १७ डिसेंबर १९५९)
१८९९: पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी – नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक. त्यांचे
श्यामची आई हे पुस्तक प्रकाशनक्षेत्रातील सर्व विक्रम मोडणारे ठरले आहे. (मृत्यू: १ जून १९५०)
१९१०: हेल्वेस्टिका फॉन्ट निर्माते मॅक्स मिईदींगर. (मृत्यू: ८ मार्च १९८०)
१९२४: पार्श्वगायक मोहम्मद रफी पद्मश्री (१९६७). (मृत्यू: ३१ जुलै १९८० – मुंबई)
१९३२: भारतीय-इंग्लिश क्रिकेटपटू कॉलिन काऊड्रे . (मृत्यू: ४ डिसेंबर २०००)
१९४२: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार इंद्र बानिया . (मृत्यू: २५ मार्च २०१५)
१९५७: अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई .
१९५९: हिन्दी चित्रपट कलाकार अनिल कपूर .
मृत्यू / पुण्यतिथी
१५२४: वास्को द गामा –पोर्तुगीज दर्यावर्दी. अफ्रिकेला वळसा घालून युरोपातुन भारतात येण्याचा मार्ग त्याने शोधला. (जन्म: १४६९)
१९६७: बास्किन-रोबिन्स चे सहसंस्थापक बर्ट बास्कीन. (जन्म: १७ डिसेंबर १९१३)
१९७३: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक,द्रविड चळवळीचे प्रणेते पेरीयार ई. व्ही. रामस्वामी . (जन्म: १७ सप्टेंबर १८७९)
१९७७: आसामी कवयित्री व लेखिका नलिनीबाला देवी . (जन्म: २३ मार्च १८९८)
१९८७: अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन . (जन्म: १७ जानेवारी १९१७)
१९८८: भारतीय लेखक जैनेंद्र कुमार. (जन्म: २ जानेवारी १९०५)
१९९९: नायकी इंक चे सहसंस्थापक बिल बोरमन . (जन्म: १९ फेब्रुवारी १९११)
२०००: कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक जॉन कूपर. (जन्म: १७ जुलै १९२३)
२००५: तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका
भानुमती रामकृष्ण. (जन्म: ७ सप्टेंबर १९२५)
२००५ : भानुमती रामकृष्ण – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार,
गायिका व लेखिका (जन्म: ७ सप्टेंबर १९२५)