महत्त्वाच्या घटना
१५६७: स्कॉटलंडची राणी मेरी पदच्युत झाल्यामुळे १ वर्षाचा जेम्स (सहावा) स्कॉटलंडच्या राजेपदी विराजमान झाला.
१७०४: ब्रिटनने जिब्राल्टरचा ताबा घेतला, जो आजपर्यंत सोडलेला नाही.
१८२३: चिलीमध्ये गुलामगिरीची प्रथा समाप्त झाली.
१९११: हायराम बिंगहॅम – ३रे यांनी पेरूतील माचुपिच्चू हे प्राचीन इंका संस्कृतीचे शहर शोधले.
१९३१ : पिटसबर्ग, पेनसिल्व्हानिया येथील एका वृद्धाश्रमास आग लागुन ४८ लोक मृत्यूमुखी पडले.
१९४३: दुसरे महायुद्ध –ऑपरेशन गोमोरा –दोस्त राष्ट्रांनी जर्मनीतील हॅम्बर्ग शहरावर तुफानी बॉम्बहल्ले सुरू केले.
हे हल्ले पुढील आठ दिवस सुरू होते. या हल्ल्यांना हॅम्बर्गचे हिरोशिमा असे म्हणण्यात येते.
१९६९: सफल मानवी चांद्रमोहिमेनंतर अपोलो ११ हे अंतराळयान पॅसिफिक समुद्रात सुखरूप उतरले.
१९७४: वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की राष्ट्राध्यक्ष रिर्चड निक्सनने स्वत:विरुद्धचा पुरावा अवैधरीत्या दडवून ठेवला होता.
१९९० : इराकने कुवेतच्या सीमेजवळ सैन्याची जमवाजमव करण्यास सुरूवात केली.
१९९१: अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचा पाया घालणारा अर्थसंकल्प संसदेत सादर केला.
१९९७: ख्यातनाम बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना पत्रकारिता, साहित्य व कला या क्षेत्रातील कामगिरीसाठी रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर
१९९७: माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान.
१९९८: परकीय चलन नियमन कायद्याच्या (FERA) जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) जारी करण्यात आला.
२०००: विप्रो आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत चेन्नईच्या विजयालक्ष्मी सुब्रह्यण्यम हिने भारताच्याच पी. हरिकृष्णला बरोबरीत
रोखल्यामुळे तिला अर्धा गुण मिळाला त्यामुळे तिच्या ग्रँडमास्टर या किताबावर शिक्कामोर्तब झाले व ती भारताची पहिला महिला ग्रॅंडमास्टर बनली.
२००१: जपानमधील टोकियो येथे झालेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत भारताच्या शिखा टंडनने फ्रीस्टाईल प्रकारात
१०० मीटर अंतर ५९.९६ सेकंदात पार केले. ही शर्यत एक मिनिटापेक्षा कमी वेळात पूर्ण करणारी ती भारताची सर्वात लहान खेळाडू आहे.
२००५: लान्स आर्मस्ट्राँगने टूर-डी-फ्रान्स ही सायकल शर्यत सलग सातव्यांदा जिंकली.
२०१४: एर अल्जेरी फ्लाइट ५०१७ हे मॅकडोनेल डग्लस एमडी-८३ प्रकारचे विमान मालीमध्ये कोसळले. ११६ ठार.
जन्मदिवस / वाढदिवस
१७८६: फ्रेंच गणितज्ञ संशोधक जोसेफ निकोलेट .
१८५१: जर्मन गणितज्ञ फ्रेडरिक शॉटकी.
१९११: हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ .
१९११: बासरीवादक संगीतकार अमलज्योती तथा पन्नालाल घोष . (मृत्यू: २० एप्रिल १९६०)
१९२८: गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल .
१९३७: भारतीय अभिनेते मनोज कुमार .
१९४५: अझीम प्रेमजी –दानशूर व्यक्ति आणि विप्रो (WIPRO) चे चेअरमन
१९४७: पाकिस्तानी फलंदाज जहीर अब्बास .
१९६९: अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि नर्तिका जेनिफर लोपेझ .
मृत्यू / पुण्यतिथी