ऍन्झाक दिन – ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड
क्रांती दिन – पोर्तुगाल
फेस्ता देला लिबरेझियोन (स्वातंत्र्य दिन) – इटली
ध्वज दिन – फेरो द्वीपसमूह, स्वाझीलँड
जागतिक मलेरिया दिन
महत्त्वाच्या घटना
१६०७ : ८० वर्षांचे युद्ध – नेदरलँड्सने जिब्राल्टरजवळ स्पेनचे आरमार बुडवले.
१७९२ : क्लॉड जोसेफ रूगे दि लिलने फ्रेंच राष्ट्रगीत ला मार्सेलची रचना केली.
१८२९ : चार्ल्स फ्रीमॅन्टल पश्चिम ऑस्ट्रेलियाला पोचला.
१८४६ : मेक्सिको व टेक्सासच्या प्रजासत्ताक मध्ये सीमावाद चिघळला. चकमकी सुरू.
१८५९ : प्रसिध्द सुएझ कालव्याच्या बांधकामास सुरुवात.
१८६२ : अमेरिकन यादवी युद्ध – उत्तरेने न्यू ऑर्लिअन्स जिंकले.
१८९८ : अमेरिकेने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.
१९०१: स्वयंचलित वाहनांना नंबर प्लेट सक्तीचे करणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील पहिले राज्य बनले.
१९१५ : पहिले महायुद्ध – ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंडचे सैन्य तुर्कस्तानमध्ये उतरले.
१९२६ : ईराणमध्ये रझा शाह पहलवी सत्तेवर.
१९४५ : दुसरे महायुद्ध – मिलानमधून नाझींची हकालपट्टी.
१९५३: डी. एन. ए. रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रीक यांचा शोधनिबंध नेचर मासिकात प्रकाशित झाला.
१९६६: एका भूकंपामुळे ताश्कंद शहराचा मोठ्या प्रमाणावर विनाश झाला.
१९८२ : रंगीत दूरदर्शन प्रक्षेपणाला सुरुवात
१९८३: पायोनिअर-१० हे अंतराळयान सूर्यमालेच्या पलीकडे गेले.
१९८९: श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या ३,३०,००० तमिळ जनतेला मताधिकार देण्याचा निर्णय घेतला.
२०००: वादग्रस्त आलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरपर्यंत वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली.
२००५ : जपानच्या आमागासाकी शहराजवळ रेल्वे अपघात. १०७ ठार.
२०१५: ७.८ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे नेपाळ देशात ९१०० जण मारले गेले.
जन्मदिवस / जयंती
१२१४: फ्रान्सचा राजा लुई (नववा) यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १२७०)
१२२८ : कॉन्राड दुसरा, जर्मनीचा राजा.
१२८४ : एडवर्ड दुसरा, इंग्लंडचा राजा.
१५४५ : यी सुन शिन, कोरियन दर्यासारंग.
१५९९ : ऑलिव्हर क्रॉमवेल, ब्रिटीश राजकारणी, अघोषित राजा.
१८७४ : गुग्लियेमो मार्कोनी, इटलीचा संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ, रेडिओ संशोधक (मृत्यू: २० जुलै १९३७)
१९१८: हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च १९९३)
१९४०: हॉलिवूडमधील अभिनेता अल पचिनो यांचा जन्म.
१९६१: अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक करण राझदान यांचा जन्म.
१९६१: भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि लेखक दिनेश डिसोझा यांचा जन्म.
१९६४: भारतीय राजकारणी आर. पी. एन. सिंग यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी
१७४० : थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे.
१८४० : सिमिओन-डेनिस पोइसॉन, फ्रेंच गणितज्ञ.
१९९९: साहित्यिक पंढरीनाथ रेगे यांचे निधन.
२००२: लाटव्हियाच्या योगशिक्षिका इंद्रा देवी. (जन्म: १२ मे १८९९)
२००३: ब्रिटिश शिल्पकार लिन चॅडविक. (जन्म: २४ नोव्हेंबर १९१४)
२००५: भारतीय साधू आणि शिक्षक स्वामी रंगनाथानंद . (जन्म: १५ डिसेंबर १९०८)
२००५ : स्वामी रंगनाथानंद, भारतीय तत्त्वज्ञानी; अध्यक्ष, रामकृष्ण मिशन.