जागतिक कोड त्वचारोग दिन,
स्वातंत्र्य दिन : मोझांबिक
महत्त्वाच्या घटना
१९१८ : कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला.
हा निर्णय पुरोगामी चळवळीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
१९३४: महात्मा गांधीना पुणे महापालिकेने मानपत्र दिले. त्या वेळी त्यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्न झाला.
१९४०: दुसरे महायुद्ध: फ्रांसने औपचारिकरित्या जर्मनीला आत्मसमर्पण केले.
१९४७: द डायरी ऑफ अॅनी फ्रँक प्रकाशित झाली.
१९७५ : पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सल्ल्यावरुन राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांनी भारतात आणीबाणी जाहीर केली.
१९७५: मोझांबिक देशला पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९८३ : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करुन भारत विजेता.
१९९३: किम कॅंपबेल यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
२००० : मॅडम तूसाँ यांच्या मेणांच्या पुतळ्यांचा जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले.
हा सन्मान मिळवणारा तो पहिला हिन्दी अभिनेता ठरला.
जन्मदिवस / वाढदिवस
१८६४: नोबेल पारितोषिक विजते जर्मन रसायनशास्त्रज्ञ वॉल्थर नेर्न्स्ट .
१९००: भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल व्हाइसरॉय लुई माउंट बॅटन. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९७९)
१९०३: इंग्लिश लेखक,इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार जॉर्ज ऑरवेल. (मृत्यू: २१ जानेवारी १९५०)
१९०७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ जे.हान्स डी. जेन्सेन .
१९११: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ विल्यम हॉवर्ड स्टाईन .
१९२४: संगीतकार मदन मोहन . (मृत्यू: १४ जुलै १९७५)
१९२८: द स्मर्फ चे निर्माते पेओ . (मृत्यू: २४ डिसेंबर १९९२)
१९२८: नोबेल पारितोषिक विजेते रशियन भौतिकशास्त्रज्ञ अलेक्सेई अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह.
१९३१: भारताचे ७वे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग केन्द्रीय अर्थमंत्री व संरक्षणमंत्री, उत्तर प्रदेशचे भूतपूर्व मुख्यमंत्री आणि मंडा संस्थानचे ४१ वे राजे (मृत्यू: २७ नोव्हेंबर २००८)
१९७४: हिंदी चित्रपट अभिनेत्री करिश्मा कपूर .
१९७५: रशियन बुद्धीबळपटू व्लादिमिर क्रामनिक .
१९७८: हिंदी चित्रपट अभिनेता आफताब शिवदासानी
१९८६: अभिनेत्री सई ताम्हणकर .
मृत्यू / पुण्यतिथी
११३४: डेन्मार्कचे राजा नील्स .
१९२२: बंगाली कवी सत्येंद्रनाथ दत्त.
१९७१: स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ जॉन बॉइड ऑर .
१९७९ : अण्णासाहेब – मगर पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष
१९९५: नोबेल पारितोषिक विजेते आयरिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्टथॉमस सिंटन वॉल्टन .
१९९७: फ्रेंच संशोधक जॅक कुस्टेऊ यांचे निधन.
२०००: मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या रवीबाला सोमण-चितळे.
२००९: अमेरिकन गायक मायकेल जॅक्सन . (जन्म: २९ ऑगस्ट १९५८)
२००९ : मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक.
२००९ : मायकेल जॅक्सन – अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार, निर्माता, अभिनेता (जन्म: २९ ऑगस्ट १९५८)