१९३९: सर फ्रँक व्हीटल आणि हॅन्स ओहायन निर्मित Heinkel He 178 या जगातील पहिल्या टर्बो जेट विमानाचे उड्डाण झाले.
१९५७: मलेशियाची राज्यघटना अमलात आली.
१९६६: नाट्यसंपदा निर्मित, वसंत कानेटकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित अश्रूंची झाली फुले या नाटकाचा पहिला प्रयोग गिरगाव येथील साहित्य संघ मंदिर येथे झाला.
१९९१: युरोपियन महासंघाने इस्टोनिया, लाटव्हिया लिथुआनिया या देशांच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.
१९९१: मोल्डोव्हाने सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

१८७५: बॅंक ऑफ कॅलिफोर्निया चे संस्थापक विलियम चॅपमन राल्स्टन . (जन्म: १२ जानेवारी १८२६)
१९५५: जगन्नाथ रघुनाथ आजगावकर –संतचरित्रकार, १९०७ ते १९३५ या काळात त्यांच्या महाराष्ट्र कविचरित्र या ग्रंथाचे नऊ खंड प्रकाशित झाले होते. (जन्म: १६ ऑगस्ट १८७९)
१९७६: मुकेश चंद माथूर तथा मुकेश–पार्श्वगायक. तीस वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी १०,००० हून अधिक गीतांना आवाज दिला.
ऊर्दू, पंजाबी, तमिळ, बंगाली, मराठी, गुजराथी या भाषांतही त्यांनी गाणी गायली. अनुनासिक स्वर आणि गायकीत
ओतप्रोत भरलेलाअ ’दर्द’ ही त्यांच्या गायनशैलीची वैशिष्ट्ये होती. (जन्म: २२ जुलै १९२३)
१९७९ : लॉर्ड लुई माउंटबॅटन –भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल (जन्म: २५ जून १९००)
१९९५: मधू मेहता –हिन्दुस्तान आंदोलनाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते
१९९७: राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक बासू भट्टाचार्य .
२०००: मनोरमा वागळे –रंगभूमी, चित्रपट व मालिकांमध्ये विविध भूमिका केलेक्या अभिनेत्री.
२००६: चित्रपट दिग्दर्शक हृषीकेश मुकर्जी . (जन्म: ३० सप्टेंबर १९२२)