जागतिक रंगमंच दिवस

ठळक घटना

१६६७: शिवरायांना सोडुन गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने धर्मांतर केले व यांचे नाव महंमद कुली खान ठेवले.

१७९४: अमेरिकन नौदलाची स्थापना.

१८५४: क्रिमियन युद्ध – इंग्लडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.

१९५८: निकीता क्रुश्चेव्ह सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.

१९६६: २० मार्च रोजी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत पिकल्स नावाच्या कुत्र्याला सापडला. त्यानंतर हा चषक १९८३ मधे पुन्हा चोरीला गेला, तो आजतागायत सापडलेला नाही.

१९७७: तेनेरिफ द्वीपावरील धावपट्टीवर पॅन अ‍ॅम आणि के. एल. एम. या दोन बोईंग ७४७ प्रकारच्या विमानांची टक्कर होऊन ५८३ जण ठार .

१९९२: पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान.

२०००: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर.

०१५:पूर्व प्रधानमंत्री .कै अटल बिहारी वाजपेयी यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याकडून भारत रत्न पुरस्कार प्रदान राष्ट्रपति

जन्म/वाढदिवस

१७८५: फ्रान्सचा राजा लुई (सतरावा) . (मृत्यू: ८ जून १७९५)

१८४५: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विलहेम राँटजेन . (मृत्यू: १० फेब्रुवारी १९२३)

१८६३: रोल्स-रॉइस लिमिटेड चे निर्माते हेन्री रॉयस . (मृत्यू: २२ एप्रिल १९३३)

१९०१: डोनाल्ड डक चे हास्यचित्रकार कार्ल बार्क्स . (मृत्यू: २५ ऑगस्ट २०००)

मृत्यू/पुण्यतिथी

१८९८: भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते सर सय्यद अहमद खान . (जन्म: १७ ऑक्टोबर १८१७)

१९५२: टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक काइचिरो टोयोटा . (जन्म: ११ जून १८९४)

१९६७: नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की . (जन्म: २० डिसेंबर १८९०)

१९६८: पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारीन. (जन्म: ९ मार्च १९३४)

१९९२: साहित्यिक, गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. शरच्‍चंद्र वासुदेव चिरमुले .

१९९७: संगीत नाटकातील अभिनेते व गायक भार्गवराम आचरेकर .

२०००: हिन्दी चित्रपट अभिनेत्री वेरा सुंदर सिंग तथा प्रिया राजवंश यांची चेतन आनंद यांच्या मुंबईतील रुईया पार्क येथील बंगल्यात हत्या झाली.