ठळक घटना

१७३७: बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.

१८५४: क्रिमियन युद्ध – फ्रान्सने रशियाविरुद्ध युध्द पुकारले.

१९१०: हेन्री फाब्रे यांनी फाब्रे हायड्राविओन हे पहिले सागरी विमान उडविले.

१९३०: तुर्कस्तानमधील कॉन्स्टँटिनोपाल आणि अंगोरा शहरांची नावे बदलुन अनुक्रमे इस्तंबुल आणि अंकारा अशी करण्यात आली.

१९४२: रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे इंडियन इंडिपेन्डन्स लीग ची स्थापना.

१९७९: अमेरिकेतील थ्री माईल आयलंड या बेटावर असलेल्या अणूभट्टीतून किरणोत्सारी पदार्थांची गळती.

१९९२: उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांना राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.

१९९८: सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्‌ड कॉम्प्युटिंग (C-DAC ) या संस्थेने विकसित केलेला परम-१०००० हा महासंगणक देशाला अर्पण करण्यात आला.

जन्म/वाढदिवस

१८६८: रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की . (मृत्यू: १८ जून १९३६)

१९२५: अभिनेता राजा गोसावी. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९९८)

१९२७: भारतीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्त्या विना मझुमदार . (मृत्यू: ३० मे २०१३)

१९६८: इंग्लिश क्रिकेटपटू नासिर हुसैन .

मृत्यू/पुण्यतिथी

१९४१: ब्रिटिश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ . (जन्म: २५ जानेवारी १८८२)

१९६९: अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक ड्वाईट आयसेनहॉवर . (जन्म: १४ ऑक्टोबर १८९०)

१९९२: स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू आचार्य सम्राट आनंदऋषीजी .

२०००: शांताराम द्वारकानाथ तथा राम देशमुख .