जन्मदिवस / वाढदिवस
१७८६: मेक्सिको देशाचे पहिले राष्ट्रपती ग्वाडालुपे व्हिक्टोरिया. (मृत्यू: २१ मार्च १८४३)
१८९०: पंचांगकर्ते ल. गो. तथा नानाशास्त्री दाते. १८९९: बॉलपोइंट पेनचे संशोधक लस्झो बियो . (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९८५)
१९०१: नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ एनरिको फर्मी. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९५४)
१९२५: समाजसेवक डॉ. शरदचंद्र गोखले. (मृत्यू: १५ जानेवारी २०१३)
१९२८: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा. (मृत्यू: २८ सप्टेंबर २०१२)
१९३२: विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मेहमूद. (मृत्यू: २३ जुलै २००४)
१९३२: मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू हमीद दलवाई . (मृत्यू: ३ मे १९७७)
१९३३: मोजाम्बिक देशाचे पहिले राष्ट्रपती समोरा महेल. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९८६)
१९३६: इटली देशाचे पंतप्रधान सिल्व्हियो बेर्लुस्कोनी .
१९३८: नेदरलँड्स देशाचे पंतप्रधान विल्यम कॉक.
१९४३: नोबेल पारितोषिक विजेते पोलंड देशाचे राष्ट्राध्यक्ष लेक वॉलेसा.
१९४७: भारताचे ३८वे सरन्यायाधीश एस. एच. कपाडिया . (मृत्यू: ४ जानेवारी २०१६)
१९५१: चिली देशाच्या पहिल्या स्त्री राष्ट्राध्यक्ष मिशेल बाशेलेट.
१९५७: इंग्लिश क्रिकेटपटू व पंच ख्रिस ब्रॉड .
१९७८: अमेरिकन कसरतपटू मोहिनी भारद्वाज.
मृत्यू / पुण्यतिथी
८५५: रोमन सम्राट लोथार (पहिला) .
१५६०: स्वीडनचा राजा गुस्ताव (पहिला).
१८३३: स्पेनचा राजा फर्डिनांड (सातवा). (जन्म: १४ ऑक्टोबर १७८४)
१९१३: डिझेल इंजिनचे संशोधक रुडॉल्फ डिझेल. (जन्म: १८ मार्च १८५८)
१९८७: अमेरिकन उद्योगपती हेन्री फोर्ड दुसरा.
१९९१: आग्रा घराण्याच्या ११व्या पिढीतील गायक उस्ताद युनूस हुसेन खाँ . (जन्म: १५ नोव्हेंबर १९२७)
२०१७: टॉम ऑल्टर ,भारतीय फिल्म आणि रंगमंच अभिनेते ( जन्म: २२ जून, १९५० )