१९०९: रमाबाई रानडे यांनी पुणे सेवासदन सोसायटीची स्थापना केली.
१९२५: जॉन लोगी बेअर्ड यांनी पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले.
१९५५: पेरांबूर येथे इन्टिग्रल कोच फॅक्टरी सुरू झाली.
१९५८: गिनी देशाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९६७: थरगुड मार्शल हे अमेरिकन सर्वोच्‍च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश बनले.
१९६९: महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांची प्रतिमा व सही असलेल्या २, ५, १० व १०० रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या.
२००६: निकेल माइन्स, पेनसिल्व्हानिया येथे चार्ल्स कार्ल रॉबर्ट्सने आमिश शाळेत पाच शाळकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारले व नंतर आत्महत्या केली.
२०१७: अमेरिकेत लास वेगास मधे गोळीबारी.५९ लोकांचा मृत्यू तर ६00जखमी.