१८७२: हॅमिल्टन क्रिसेंट, ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामधे जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला.
१९१७: कलकत्ता येथे आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्युटची स्थापना.
१९६१: १९५९ मध्ये प्रकाशित आल्हाद चित्रच्या सांगत्ये ऐका या बोलपटाने पुणे येथील विजयानंद सिनेमागृहात ५५१ दिवस चालण्याचा विक्रम केला.
१९६६: बार्बाडोसला युनायटेड किंगडमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९९५: ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म संपल्याची अधिकृत घोषणा.
१९९६: ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान. हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्‍च पुरस्कार आहे.
१९९८: एक्सॉन आणि मोबिल यांच्यामध्ये ७३.७ बिलियन अमेरिकन डॉलर्स चा करार झाल्यामुळे एक्सॉनमोबिल ही जगातील सर्वात मोठी कंपनी तयार झाली.
२०००: पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन एन्डेव्हर या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.

१९००: सुप्रसिद्ध लेखक कवी आणि नाटककार ऑस्कर वाईल्ड. (जन्म: १६ ऑक्टोबर १८५४)
१९७०: जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर निना रिकी . (जन्म: १४ जानेवारी १८८३)
१९८९: कॅमेरून देशाचे पहिले अध्यक्ष अहमदिऊ आहिदो . (जन्म: २४ ऑगस्ट १९२४)
१९९५:वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे –साहित्यिक (लघुकथा, लोककथा, बालवाड़्मय, चरित्र, अनुवाद),
विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक (जन्म: १६ जुलै १९१४)
२०१०: सामाजिक कार्यकर्ता राजीव दिक्षीत. (जन्म: ३० नोव्हेंबर १९६७)
२०१२: भारताचे १२ वे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल. (जन्म: ४ डिसेंबर १९१९)
२०१४: अरुणाचल प्रदेशचे ७वे मुख्यमंत्री जर्बोम गॅमलिन. (जन्म: १६ एप्रिल १९६१)