घटना
१६७०: तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू.
१७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात आली.
१९३६: कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले रेडिअम हे पहिले किरणोत्सारी मूलद्रव्य बनले.
१९४४ : ‘चलो दिल्ली’ चा नारा देत आझाद हिंद सेनेनी दिल्लीकडे कूच केली.
१९४८: श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.
१९६१: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान.
१९८८ : रशियाने नेहरु फुटबॉल चषक जिंकला
२००३: युगोस्लाव्हियाचे सर्बिया अँड मोंटेनिग्रो असे नामकरण करण्यात आले आणि नवी राज्यघटना अस्तित्त्वात आली.
२००४: मार्क झुकरबर्गने फेसबुकची स्थापना केली.
जन्म
१८९३: मराठी कोशकार आणि लेखक चिंतामण गणेश कर्वे.
१९०२: धाडसी अमेरिकन वैमानिक चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग.
१९०६ : प्लुटो हा ग्रह शोधणारे क्लाईड विल्यम टॉमबॉ.
१९२२ : स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी.
१९३८: लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक व गुरू पं. बिरजू महाराज.
१९७४: चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर.
मृत्यू
१६७० : कोंडाणा किल्ला लढविताना नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले.
१८९४: सॅक्सोफोन या वाद्याचे जनक अॅडोल्फ सॅक्स.
१९७४: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस.
२००१: क्रिकेटपटू, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित पंकज रॉय.
२००२: चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक भगवान आबाजी पालव ऊर्फ मास्टर भगवान.