जन्मदिवस / वाढदिवस
१८२२: अमेरिकेचे १९ वे राष्ट्राध्यक्ष रुदरफोर्ड हेस. (मृत्यू: १७ जानेवारी १८९३)
१८८४: भारतीय इतिहासकार आणि लेखक रामचंद्र शुक्ला. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९४१)
१९१३: शास्त्रीय गायिका सरस्वतीबाई राणे. (मृत्यू: १० ऑक्टोबर २००६)
१९१३: हैती देशाचे पहिले पंतप्रधान मार्टिअल सेलेस्टीन . (मृत्यू: ४ फेब्रुवारी २०११)
१९१६: धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला –अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक, सार्वजनिक अर्थकारण व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अधिकारी व्यक्ती
१९२८: अमेरिकन पत्रकार व लेखक ऑल्विन टॉफलर.
१९३५: अरुण सरनाईक – मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादक (मृत्यू: २१ जून १९८४)
१९३७: इंग्लिश लेखिका व अभिनेत्री जॅकी कॉलिन्स.
मृत्यू / पुण्यतिथी
१६६९: डच चित्रकार रेंब्राँ . (जन्म: (जन्म: १५ जुलै १६०६)
१८४७: महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. छत्रपती शाहू (दुसरे) यांचे ते थोरले चिरंजीव होत.
पेशवाईच्या अस्तानंतर माऊंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी पुन: त्यांना छत्रपतींच्या गादीवर बसवले. पाठशाळा आणि संस्कॄत व मराठीबरोबरच
इंग्रजी भाषेच्या अध्यापनाला त्यांनी उत्तेजन दिले. (जन्म: १८ जानेवारी १७९३)
१९०४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकर फ्रेडेरीक ऑगस्टे बर्थॉल्ड . (जन्म: २ ऑगस्ट १८३४)
१९२१: संगीतसूर्य, केशवराव भोसले –संगीत सौभद्र मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते. हाच मुलाचा बाप, सन्याशाच्या मुलगा
त्यांनी स्थापन केलेल्या ललितकलादर्श संगीत नाटक मंडळींतर्फे सौभद्र, शारदा, राक्षसी महत्त्वाकांक्षा इ. नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. (जन्म: ९ ऑगस्ट १८९०)
१९४७: मॅक्स प्लँक –नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ (जन्म: २३ एप्रिल १८५८)
१९६६: अनंत अंतरकर –हंस, मोहिनी, नवल आणि सत्यकथा या मासिकांचे संपादक (जन्म: १ डिसेंबर १९११)
१९८२: सोपानदेव चौधरी –कवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र. काव्यकेतकी, अनुपमा, सोपानदेवी हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. (जन्म: १६ आक्टोबर १९०७)
१९८९: संगीतकार, गायक व नट संगीतभूषण पं. राम मराठे . (जन्म: २३ ऑक्टोबर १९२४)
१९९३: अभिनेते जॉन कावस.
२००२: वृत्तपट निवेदक भाई भगत .
२०१५: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता एडिडा नागेश्वर राव. (जन्म: २४ एप्रिल १९३४)