घटना
१९३२ : दादासाहेब फाळके यांचा ’अयोध्येचा राजा (चित्रपट)’ हा पहिला मराठी बोलपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
१९४२: दुसरे महायुद्ध – इंग्लंडने थायलँडविरुद्ध युद्ध पुकारले.
१९५२: इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचे निधन झाले आणि एलिझाबेथ (दुसरी) गादीवर बसली.
२००१ : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास आणि तंबाखूपासून बनविण्यात आलेल्या सर्व उत्पादनांची जाहिरात करण्य़ावर बंदी घालणार्या ‘तंबाखू उत्पादने’ विधेयकाला केंद्रीय
मंत्रिमंडळाची मंजुरी.
२००१ : पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डाक विभागातर्फे टपाल तिकीट प्रसिद्ध.
२००३ : संत तुकाराम महाराज यांचे चित्र असलेल्या नाण्याचे प्रकाशन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा हस्ते करण्यात आले.
जन्म
१९११: अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन.
१९१२ : एव्हा ब्राउन, ऍडोल्फ हिटलरची सोबतीण.
१९५२: ऑस्ट्रेलियन हॉकीपटू, हॉकी प्रशिक्षक, क्रिकेटपटू आणि राजकारणी डॉ. रिक चार्ल्सवर्थ.
१९८३: क्रिकेटपटू एस. श्रीशांत.
मृत्यू
१९३१: भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडिल, कायदेपंडित मोतीलाल गंगाधर नेहरू यांचे निधन.
१९३९ : सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे महाराज.
१९७६ : ऋत्विक घटक, चित्रपट निर्माते.
२००१ : बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री.